आयुष्य-रेषा

Submitted by तन्मय शेंडे on 30 August, 2012 - 20:11

!! आयुष्य-रेषा !!

आधी होती वेडी वाकडी
हजार वेळा गिरवली
तेव्हा कुठे जमली !!

पाटी वरून भिंतीवर उमटली
रंगात रंगली
भूमितीत भेदली !!

नजरेनी छेडली
आयुष्य पणाला लागली
सुबक असूनही अर्धवट राहिली !!

कधी इकडे कधी तिकडे भिडली
मनाच्या समुद्रात कोरली
शेवटच्या पानात बंदिस्त झाली !!

सीमेची मर्यादा हिनेच दाखवली
कधी ठळक कधी धूसर झाली
वाटूनही नाही ओलांडली !!

महाभारत - महायुद्ध हिच्यामुळे झाली
सैनिकांनी गिरवून गिरवून ठळक केली
पण नकाशात कधीच नाही स्थिरावली !!

बाजारात जाऊन काळवंडली
पायाखालचा ठिपका झाली
देशभक्ती फक्त हिच्या पुढेच नाचली !!

आयुष्याच्या आलेखावरती
बिंदू जोडत होती
सरते शेवटी एकटीच सरळ धावत गेली !!
सरते शेवटी एकटीच सरळ धावत गेली .............................

- तन्मय
३०/०८/२०१२

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users