Submitted by आनंदयात्री on 28 August, 2012 - 23:11
आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याची शंका येते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच नात्यावर!
एकीकडे असं काही नसण्याची आशा
आणि दुसरीकडे असण्याचं भयसूचक वास्तव
न स्वीकारण्याची इच्छा!
आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याचा समज पक्का होतो,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच असण्यावर!
'एकत्र घालवलेल्या सेकंदांचं आणि आठवणींत घालवलेल्या तासांचं
आता काय करायचं', या विचारातून आलेली हतबलता!
आपलं माणूस जेव्हा आपलंच असल्याची खात्री पटते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच स्वभावावर,
आणि गवसतं - संपण्याच्या वाटेवरून जीव वाचल्यागत
परत आलेलं आणि बरंच काही शिकलेलं - स्वतःचंच इवलंसं मन!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/08/blog-post_16.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
आहाहा.....तोडलस मित्रा मस्त
आहाहा.....तोडलस मित्रा
मस्त मस्त उतरवलीयस मनाची घालमेल...
आपलं माणूस जेव्हा आपलंच असल्याची खात्री पटते,
झक्क्क्क्क्क्कासच!
सहीच्.....सुंदर आहे........
सहीच्.....सुंदर आहे........
आवडली पलं माणूस जेव्हा आपलंच
आवडली
पलं माणूस जेव्हा आपलंच असल्याची खात्री पटते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच स्वभावावर,
आणि गवसतं - संपण्याच्या वाटेवरून जीव वाचल्यागत
परत आलेलं आणि बरंच काही शिकलेलं - स्वतःचंच इवलंसं मन! >> हे खुप आवडले
आवडलीच
आवडलीच
खासच
मस्तच ! शेवटचं कडवं आवडलंच,
मस्तच ! शेवटचं कडवं आवडलंच, पण 'आपलं नसल्याचा समज पक्का' हे कडवं विशेष आवडलं.
छानच !
छानच !
मस्तच
मस्तच
http://www.maayboli.com/node/20287 माझी बघं बरं आपली माणसं
खूप छान!! मस्तच
खूप छान!! मस्तच
मस्तच रे!!! आवडली हे सांगणे न
मस्तच रे!!!
आवडली हे सांगणे न लगे
मस्तच... लांब लांब ओळी पाहून
मस्तच... लांब लांब ओळी पाहून घाबरलोच होतो..... पण भन्नाट लिहलीयेस
धन्यवाद दोस्तहो!
धन्यवाद दोस्तहो!
मस्त खयाल >>> एकत्र
मस्त खयाल
>>> एकत्र घालवलेल्या सेकंदांचं आणि आठवणींत घालवलेल्या तासांचं
आता काय करायचं', या विचारातून आलेली हतबलता! <<<
अधिक आवडले
धन्यवाद