दोन प्रवासी

Submitted by rasika_mahabal on 21 August, 2012 - 14:59

गोष्ट आहे दोन व्यक्तिंची
पहिला व दुसरा ही नावे त्यांची

त्यातील एक असे खुप महत्त्वाकांक्षी
आयुष्यातील छोट्या सुखांना तो त्याकरता बक्षी
दुसरा नसे यत्किंचीतही महत्त्वाकांक्षी
आनंद त्याचा वारा, समुद्र व त्यावरील पक्षी

मैत्री जमली दोघांची घनिष्ठ
बघु कोण होते त्यामधील कनिष्ठ

निघाले एक दिवस दोघे लक्ष घेऊन काशी
पहिल्यास होती ती गाठायची जरी राहिलेत ते उपाशी
दुसरयास येणारा प्रत्येक क्षण ठेवायचा होता मनाशी
एकच लक्ष पण विरुध्द व्यक्तिमत्त्वाचे हे दोन प्रवाशी

दुसरा आनंदे जेव्हा उमले कळी
किंवा कुठुनशी सरपटतांना दिसे अळी
आकाशी उठे निरनिराळ्या छटांची जाळी
पहिल्यास कळे ह्यातील धुंदी जेव्हा बघे तो दुसरयाच्या भाळी

नसे उरत दुसरयास वेळेचे भान
जिथे बघी तो फुले पाने किंवा रान
बस तिथेच मारी तो ठाण
नव्हती पहिल्यास ह्यातील काहीच जाण

पहिला म्हणी दुसरयास निघु इथुन लवकर
हे सर्व करण्यास पाहिजे तर येउ नंतर
काशी येण्यास पार करायचे आहे बरेच अंतर
ध्येयपुर्तीची मस्ती असते खुप चिरंतर

सारखाच घेत बसलो आपण जर विसावा
तर अंत नाही ह्या प्रवासा
स्वप्नपुर्तीची उन्मत्तता न येई तुझ्या निवासा
छोट्या गोष्टींतुनच मिळत असे तुला दिलासा

अजुन विचार करताय कोण होते श्रेष्ठ कोण होते कनिष्ठ?

पहिला एकटा असता तर भलेही गाठली असती त्याने गंगोत्री
दुसरा एकटाच बघत बसला असता रम्य रात्री
पहिला मुकला असता पण छोट्या सुखांस
आलीच नसती काशी दुसरयाच्या नशिबास

एकमेकांना पुरक होते हे दोन सोबती
एक दुसरयाच्या नादाने सर्वी सुख त्यांना लाभती
एकाच ध्येयाचे एकत्र हे प्रवासी
असतील तुमच्याही घरात असे दोन रहिवासी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसिकाजी,
अभिनंदन.

----- कविता अतिशय छान आहे. गोष्टीरूप काव्य लिहीणे हे मुळातच फार अवघड असते. आणि अखेरीस त्यातून मांडलेल्या कथेचा अन्वयार्थ स्पष्ट करणे हे काम देखिल जिकीरीचे असते. येथे एक बोधकथा घेऊन आपण ती काव्यरूपात अतिशय छान मांडली आहे. हि कविता वाचुन मला माझी 'दोन पक्षी' नावाची लघुकथा आठवली. व डॉन किग्झोटे मधील सँको-पांझा व डॉन ही जोडी देखिल आठवली. एक बोधकथा लिहित असता त्या छोट्या आकृतीबंधाची मर्यादा पडते त्यामुळे सहाजीकच एखादा मोठा आशय स्पष्ट करणे याचे ते लिहीणार्‍यास एक आव्हानच असते. मग काव्याची चौकट तर त्याहून ही अधिक लहान असते. पण आपण ते सहज साधले आहे. म्हणूनच हि कविता विशेष आवडली.

पुलेशु.

सुधाकर..

आशयघन कविता...........आवडली........ Happy