देव कंटाळला

Submitted by प्रकाश कर्णिक on 17 August, 2012 - 06:12

आपण जेंव्हा म्हणतो धाव माझ्या देवा
असतो खेळत जुगार देव कोठेतरी तेंव्हा
वारा नसतो वहात अन हालत नसते पान
सर्वत्र असतो अंधार अन काहीच नसते छान

देवाला पण हवी असते कधीतरी फुरसत
का म्हणून त्याने रहावे कामात व्यग्र सतत
होतो खूप प्रलय तेंव्हा नाही का येत धावून मग
आपण का धरावे गृहीत माणसासाठी केले त्यानी हे जग

का म्हणतो माणूस मीच आहे सर्व श्रेष्ठ
देवाला सेवेला का ठेवले सांगा बरे स्पष्ट
त्याला काही का काम नाही मुंग्या चिमण्यांचे
प्रत्येक वेळीस माणसाने देवास का वेठीस धरायचे

आता पुरे झाले देव म्हणे मला नको बोलवू सतत
आहे बरेच काम राहिले माझे नको मागू मदत
केले आहे प्रांगण एवढे मोठे अन सुंदर
अरे माणसा खेळू दे सर्वाना, होऊ नको बिलंदर

माझीच सर्व मुले तुम्ही होऊ नको स्वार्थाने अंध
नाहीतर माणसा मला करावे लागेल अस्तिव तुझे बंद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव कश्याला माणसाचे अस्तित्व बंद करेल, माणुस स्वत:च ते सर्व करतोय.

आपण जेंव्हा म्हणतो धाव माझ्या देवा
असतो खेळत जुगार देव कोठेतरी तेंव्हा>>>हे नाही आवडल.

प्रथम तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.
तुमच्या साठी पहिल्या पंक्ती खालील प्रमाणे-

आपण जेंव्हा म्हणतो धाव माझ्या देवा
असतो खेळत लपंडाव देव कोठेतरी तेंव्हा

उत्पत्ती आणि विनाश हे अटळ असते. मानव या विश्वात येउन फार काळ लोटला नाही आणि त्याचे अस्तित्व काही कालांतराने संपणार आहे हेही निश्चित आहे.