मी जात होतो माझ्याच धुंदीत
वातानुकुलीत गाडीच्या मस्तीत
आला पाऊस मोठ्ठा,किती हवा छान
पाण्याचा कहर आणि वाऱ्याला नाही भान
मोट्ठे होते डबके अन चिखलाचे फवारे
पक्षी दडलेले आणि वासरांना भरले कापरे
तेंव्हाच दिसले पिल्लू एक चिंब ओले
पहायला किती गम्मत त्याने दिलेले शहारे
पण पाहुनी डोळ्यात आर्जव
आला कंठ भरून, कणव आली मनी
घेतले पिल्लूस उचलुनी कवेत
मग आणले माझ्या सदनी
झाला हलकल्लोळ घरात भारी
कसला विद्रूप हा प्राणी
म्हणे मुले अन पत्नी किती
प्रकारचे जंतू,जखम त्याचे कानी
आणावे का कोणी गाडीतून कोणाला
न शोभणारे ध्यान आपुल्या घराला
नव्हते का आणायचे पोमेरीअन बाळाला
म्हणत सर्व सगे, देवून टाक ते काळाला
खाऊ पिऊ कधी घालणार नाही
कोणी त्याची जखम फुंकणार नाही
तुला सुद्धा टाकू कायमचे वाळीत
अशी धमकी होती सतत छळीत
झालो पिल्लू आणि मी दोघेही पोरके
बसलो पुसत एकमेकाचे डोळे सारखे
उठलो एका रात्री मी अचानकच
अन घेतले झट्कन् पिल्लूस उचलून
पाहत होते केविलवाण्या नजरेने
पण केले हृदय वज्राहुनी कठीण
अन आलो पिल्लूस वाटेवरती सोडून
तेंव्हा पासून नाही लागली मला नीट झोप
काय करत असेल पिल्लू माझ्यावाचून
सतावतो हा विचार सदोदित मला खूप
उत्कृष्ट कविता.
उत्कृष्ट कविता.
भावना फार छान उतरल्या आहेत.
भावना फार छान उतरल्या आहेत.
छानेय कविता..
छानेय कविता..