Submitted by छाया देसाई on 9 August, 2012 - 18:53
हे गृहस्वामिनी कुलस्वामिनी
तू माझी देवता
यशोदे पदरी तुझ्या दिव्यता
कारागृही मी बंद देवकी
प्रसवुनी परीसा मी एकाकी
पदरी घेइ तेजा अनंता
तुझीच ही योग्यता
यशोधरा मायेची जननी
परी दूर माया उन्मनी
अमृतपान्हा प्राशून कान्हा
तृप्त ,तुझी सफलता
लाड गोड पुरवी कृष्णाचे
कवळ मधूर भरवी प्रेमाचे
लाघवास लाघवी ह्रद्द
घे तुझ्यावरी अक्षता
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा