Submitted by किंकर on 5 August, 2012 - 19:56
चालताना सागर किनारी ,वाळूत उमटती पाऊलखुणा
लाट त्यावरून जाता, पुसट होतसे ठसा पुन्हा
पारदर्शी लाट अलगद,पसरी पडदा धूसर नितळ
घाव त्याचा कातर करी, गतस्मृतींचा कभिन्न कातळ
चुकवता त्या अलवार लाटा , घेती नव्याने वळण पाऊले
परिस्थितीने सहज बनविले, अज्ञाताच्या हातचे बाहुले
बदलता मार्ग नव्याने, दूर राहिला सागर किनारा
कडे कपारीतील झुळूक, वाहून आणते गंधित वारा
त्या वाऱ्याने त्याचे, पुन्हा केले असे भिरभिरे
आसवातल्या धुलीकणांनी, नजर त्याची लागू चुरचुरे
थबकला सहजच त्या वळणावर,
अन नेत्रातून टपकला मोती,
पायी त्याच्या अलगद पसरली
शिंपल्याची रास होती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<<थबकला सहजच त्या
<<<<थबकला सहजच त्या वळणावर,
अन नेत्रातून टपकला मोती,
पायी त्याच्या अलगद पसरली
शिंपल्याची रास होती >>>>
वा ! कवितेचा शेवट छान आहे !
खुपच छान पण शेवटचे कडवे
खुपच छान
पण शेवटचे कडवे द्विपदीतच का नाही लिहीले?
प्रज्ञा१२३ , सुधाकर -
प्रज्ञा१२३ , सुधाकर - प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
छान ,मस्त
छान ,मस्त
वैभव - धन्यवाद !
वैभव - धन्यवाद !
सुंदर!
सुंदर!
शोभा१२३ - मनपूर्वक आभार .
शोभा१२३ - मनपूर्वक आभार .