संभाजी ब्रिगेड आणि रायगडावरील वाघ्या कुत्रा

Submitted by चिखलु on 1 August, 2012 - 12:23

सकाळ मधील बातमी
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे. वस्तुतः वाघ्या कुत्र्याला कोणताच ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळे हा पुतळा तेथून हटविण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडचे प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. शासनाने येत्या सहा जूनपूर्वी हा पुतळा तेथून हटवावा, ही आमची लोकशाही मार्गाने केलेली मागणी आहे. शासनाने या मागणीबाबत टाळाटाळ केली तर ब्रिगेडलाच तो हटवावा लागेल.''

आधी दादाजी कोंडदेव आणि आता वाघ्या कुत्रा. यामुळे नक्की काय साध्य झाले?

तळ टीप: कृपया चर्चा करावी, वाद विवाद नको.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

माझ्या माहितीनुसार जेव्हा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा कुठल्याही तत्कालीन संस्थानिकांनी मदत करण्यास नकार दिला (इंग्रजांच्या भितीने?). तेव्हा त्यांना मदत मिळाली ती बडोद्याच्या गायकवाडांकडून. त्यात एक अट अशी होती की, शिवाजीच्या समाधीबरोबरीने त्यांच्या (गायकवाडांच्या) लाडक्या आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या कुत्र्याचीदेखिल समाधी बांधली जावी. तशी ती बांधली गेलीही.

पुढे, नेहेमीप्रमाणेच दंतकथा प्रचलीत होत गेल्या - कुत्र्याचे नाव वाघ्या - तो म्हणे शिवाजी महाराजांचा अत्यंत लाडका कुत्रा - त्याने शिवाजीवर अग्नीसंस्कार होताच त्या आगीत उडी घेऊन जीव दिला इत्यादि इत्यादि. कशालाच काही आधार नव्हता.

अर्थात, कुत्र्याची समाधी हटवण्याचे काहीही कारण नव्हते, हेदेखिल खरे.

काहीतरी कुरापत काढून मिडियात चमकणे याउप्पर कोणतेही कारण दिसत नाही.

असो.

सुमित, ते बडोद्याचे गायकवाड नव्हते असे वाचल्याचे आठवते.. बहुतेक इथलेच कुणी तरी मायनर संस्थानिक होते असे ऐकून आहे. थोरल्या महाराजांनी कधी कुत्रा पाळल्याचे वाचनात नाही. अन ते चितेत उडी वै दंतकथाच आहे.

इब्लिस
ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल धन्स. एकंदर हि सगळी माहितीच नवीन आहे माझ्यासाठी, म्हणजे आत्ता तू जे वर लिहिले आहेस ते सुद्धा नवीनच आहे माझ्यासाठी.
मुद्दा हा आहे कि, आत्ता तो पुतळा आंदोलन वगैरे करून हलवायची काही गरज होती का? त्याऐवजी किल्ल्याची स्वच्छता किवा अजून असा काहीतरी चांगले करता आला असतं.

मेअमे,

>> त्यानी काय करायचे हे ते ठरवणार ना?

हो, पण जे करायचंय ते चार भिंतींच्या आत. सार्वजनिक ठिकाणी दंडेली कशाला? होळकरांनी मोठ्या युक्तीने कुत्र्याला पुढे करून शिवाजीमहाराजांची समाधी बांधवली. हा कुत्रा म्हणजे होळकरांच्या चाणाक्षपणाचे प्रतीक आहे. तो कशाला हटवायला पाहिजे?

आ.न.,
-गा.पै.

ब्रिगेडने आपला आगलावेपणा आणि विध्वंसक वृत्ती पुन्हा दाखवलीच.
अर्थातच त्यांना कुत्र्याच्या स्मारकामागेही ब्राह्मणी कावाच दिसतो.
राम गणेश गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकाची ह्या दंतकथेमागची प्रेरणा असावी. तसे पहायला गेले तर गडकरी हे कायस्थ. तेव्हा त्यांना बामनी काव्यात सामील करण्यामागे काय तर्कशास्त्र आहे हे ब्रिगेडचे विचारवंतच जाणोत!

पण ७०-८० वर्षांपूर्वी बांधलेले स्मारक, एक दंतकथा असली तरी तसे प्राचीनच म्हटले पाहिजे.
असला विध्वंस करण्यापेक्षा आपल्या लाडक्या आबा वा दादा वा साहेबांना मस्का लावून तिथला फलक बदलून ह्या दंतकथेचे वर्णन करणारा फलक लावावा. पाहिजे तर त्यातील मजकूरात संबंधित भटाबामनांना मनसोक्त शिव्याशाप द्यावेत जेणेकरून कुणाला हा ४०० वर्षे जुना इतिहास न वाटता तो फक्त ८० वर्षे जुना आहे हे कळेल आणि गैरसमज होणार नाही.

पण असले सनसनाटी, विध्वंसक काम केल्याशिवाय ह्यांचे आत्मे थंडावत नाहीत हा इतिहास आहे.

ह्या कृत्याबद्दल कुणाला काही शिक्षा होईल वा ह्या स्मारकाची दुरुस्ती होईल अशी मला तरी आशा नाही.

History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
- कॅल्विन (कॅल्विन अँड हॉब्स)
वॉटरसन इतका सार्वकालिक ठरेल असे वाटले नव्हते. कुत्र्याऐवजी वॉटरसनचा पुतळा लावावा. म्हणजे आणखी २०० वर्षांनी जेव्हा तिथे परशुराम ब्रिगेड / एकलव्य ब्रिगेड / अशोक ब्रिगेड जाईल, तेव्हा ज्या इतिहासापासून बोध घ्यावा असा एक तरी इतिहास तिथे त्यांना दिसेल.

मराठे शाहीला फितुरीचा कलंक आहेच तोच मार्ग ब्रिगेडवाले चोखाळत आहे.
हि लोक बाजी घोरपड्यांदी औलाद आहे.

'ही तर एका शिल्पकाराची हत्या'
2 Aug 2012, 0126 hrs IST
' वाघ्या ' च्या नासधूसीमुळे शिल्पकार संतप्त

>> संदीप शिंदे , ठाणे

रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची नासधूस केल्यानंतर या कुत्र्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबत दावेप्रतिदावे केले जात आहेत. मात्र , या पुतळ्याच्या रूपात ' तो साकारणारे शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग तथा नानासाहेब करमरकर यांची हत्या करण्यात आली ' अशी संतप्त प्रतिक्रिया ठाण्यातील शिल्पकारांनी नोंदवली आहे.

नानासाहेब करमरकर हे महाराष्ट्रासह देशातल्या असंख्य शिल्पकारांचे श्रद्धास्थान. त्यांच्या तालमीत अनेक शिल्पकार तयार झाले. शिवराय , महात्मा गांधी , रवींद्रनाथ टागोर , स्वामी नित्यानंद , ग्वाल्हेरचे सिंधीया महाराज यांच्यासारख्या अनेक ऐतिहासिक व्यक्तींचे करमरकरांनी केलेले पुतळे आणि वेगवेगळी शिल्पे आज देशभरातल्या वास्तूंची शान वाढवत आहेत. अलिबागच्या सासवणे येथील करमरकर शिल्पालयाला भेट दिल्यानंतर त्यांच्या कामातील दिव्यत्त्वाची प्रचिती येते.

१९३० च्या दशकात वाघ्याचे शिल्प साकारण्यासाठी करमरकरांनी प्रचंड मेहनत घेतली होती. शिवाजी महाराजांकडे जर्मन जातीचा कुत्रा असल्याचा उल्लेख काही इतिहास अभ्यासकांनी केलेला आहे. कोलकत्याच्या शांती निकेतनचे तत्कालीन व्हाइस प्रेसिडेण्ट विनायक मोसाजी यांच्या नागपूर येथील घरी जर्मन कुत्रा असल्याचे समजल्यानंतर नानासाहेबांनी १५ दिवस तिथे मुक्काम ठोकून या कुत्र्यांच्या बारीकसारीक हालचाली टिपल्या. त्यानंतर महिनाभर वाघ्याच्या पुतळ्याचे स्केच तयार करून नंतर या शिल्पाला १९३६ साली आकार दिला. वाघ्याच्या केसापासून नखापर्यंत प्रत्येक अवयव साकारताना करमरकरांनी आपले कसब पणाला लावले होते. मात्र , या जगप्रसिध्द शिल्पकाराच्या मेहनतीचा काही मंडळींनी दोन मिनिटांत ' चक्काचूर ' केला. ही एका शिल्पकाराची हत्या असल्याची संतप्त भावना प्रख्यात शिल्पकार सदाशिव कुलकर्णी , सुहास बहुलकर , प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली.

पुतळा शिल्पालयात नेला असता...

रायगडावरून वाघ्याचा पुतळा हटवावा की नको या वादात आम्हाला पडायचे नव्हते. हा पुतळा करमरकरांची एक आठवण होती. तो आम्ही स्वखर्चाने करमकरांच्या शिल्पालयात नेला असता. तशी मागणीही आम्ही केली होती. आता वाघ्याच्या नखाची प्रतिकृती तरी या मंडळींपैकी कुणाला करता येईल का , असा सवालही शिल्पकारांनी उपस्थित केला आहे.

व्वा काय चाललंय या राज्यात.३०० लोक येवून इतिहास फोडू शकतात आणि पोलीस त्यांच्या पुढे हतबल होतात. राष्ट्रवादी काँग्रेजच्या राज्यात अजून काय होणार. मराठे आणि ब्राम्हण यांच्या वादात मराठेच मराठ्यांचा इतिहास फोडून काढताहेत. कोण हे संभाजी ब्रिगेडवाले ! हे तर B ग्रेड लोक, समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहताहेत. यांनी कधी इतिहास वाचला तरी आहे का? या B ग्रेड लोकांना आजकाल कुत्रापण विचारत नाही, त्याचा राग यांनी वाघ्यावर काढला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाघ्याचा उखडलेला पुतळा शोधण्यासाठी पोलीस, पुरातत्व विभाग आणि महसूल खात्याच्या कर्मचार्‍यांनी शोधमोहीम सुरू केली. सायंकाळी हा पुतळा शिवसमाधीच्या उजव्या बाजूला असलेल्या पोलिंद तलावाजवळ झुडपात फेकलेला आढळला. त्यानंतर वाघ्याचा पुतळा पुन्हा समाधीस्थळावर बसविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अजुन काही काळाने शिवाजी महाराज म्हणुन प्रसिद्ध केली गेलेली व्यक्ती कधीकाळी अस्तित्वात होती का याचे पुरावे नाहीत आणि जे पुरावे काही लोक दाखवताहेत ते लोक आणि पुरावे दोन्ही विश्वासार्ह नाहीत, सबब शिवाजी महाराज हे नाव आता पुसा सगळीकडुन यासाठी आंदोलन होईल.....

आता वाघ्याच्या नखाची प्रतिकृती तरी या मंडळींपैकी कुणाला करता येईल का , असा सवालही शिल्पकारांनी उपस्थित केला आहे.

ज्या ऐतिहासिक व्यक्तींवर आजवर विविध सो कॉल्ड ब्रिगेड्स व तत्सम लोकांनी हल्ले केलेत त्या लोकांनी केलेल्या एकुण कामाच्या नखाएवढेही काम या हल्लेखोर लोकांना जमले नाहीय, ते शिल्पकाम कुठुन करणार?? मुळ लोकांनी त्यांच्या कार्यात पुर्ण आयुष्य घालवले.. एवढा वेळ आहे आजच्या झटपट प्रसिद्ध पावु इच्छिणा-या लोकांकडे?? ते फक्त तोडमोडच करणार...

खरोखरच या सगळ्या गोष्टीचां विचार केवळ स्थानिक जातिय वाद असंकरुन चालणार नाहे. ब्रिगेड हे राश्ट्रवादीच्च एक अनौरस रुपडं. जेव्हां जेंव्हा रा.का. राजकिय संकटात असते तेव्हा शक्तिप्रदर्शनाचे विविध मार्ग ब्रिगेडच्या माध्यमातुन चो़खाळले जातात. वरील घतना त्यापैकीच एक. सध्या एकंदरीत आघाडीत अस्लेले बिघाडी, रा.का चे सरकार वर दबावाचे राजकारण हा यातलाच एक भाग आहे.
आपल्या सर्वाम्च्या प्रतिक्रिया या फारच भाबड्या आणि अवास्तव आहेत. समाधीची नासधुस करणार्यांना, काही महत्वाच्या गोष्टींची जाणीवच नाहेय.
१. हे ब्राह्मण-मराठा असा वाद : आजवर कह्रोखरच कीती ट़क्के मराठा समाज प्रग्तीपथावर आला आहे.
२. या सर्व प्रकारात मुख्य अशी २४ घराणी ती ही प. महाराष्ट्र वगळता इतरत्र नाही यांचीच अधिकाधिक प्रगती होताना दिसते.
३. या सर्व सो कॉल्ड मराठा राज्य प्रमुखांना त्यांच्या इतिहासाबद्दल फारशी आस्था, काऴजी बहुदा नसावि, अन्यथा जुन्या किल्ले, गडकोट यांची जशी काळजी शिंदे(सिंदिया),होळकर, राजस्थानातील सरदार आणि राज घराणी आजही घेतात तशी इथे ही घेतली गेली असती.
४.संरक्षीत वास्तु घोशीत करायच्या आणि त्याची जबाबदारी केंद्राच्या माथी मारायची हा आमच्या राज्यकर्त्यांचा आवडता खेळ.एतरत्र असच असुनही स्थानिकच फार काळ्जी घेतात.
५.संवर्धनाबद्दल म्हणाल तर आहे ते ही नीट सांभाळाल तर खुप फायदा होइल हे याम्ना कोण समजावणार.
६.जिथे राजांच्या समाधि/सदरेवर उभे राहुन फोटो काधले जातात आणि जाब विचारला तर स्वतःची पक्षीय मुजोरगीरी मीस्व्तः अनेकदा अनुभवली आही, तिथे राजांच्या नावाच काय घेउन बसलात.
७. कुत्र्या बाबत म्ह्णाल तर योग्य संदर्भाचा फलक लावता आला अस्ता( पण तिथे ही कदाचित संस्थानिकांचे इंग्रजांसमोरचे बोट्चेपे धोरण उघडेपडले अस्ते)म्हणुन हा खटाटोप

घारु अण्णा

ब-याच अंशी सहमत आहे. मुद्दा क्रम ५ ला जोरदार अनुमोदन.
या लोकांबरोबरच अफजलखानाची समाधी तोडण्यासाठी आंदोलन करणा-यांनाही जागा दाखवून देण्यात यावी. अफजलखानाची समाधी स्वतः शिवाजी महाराजांनी बांधली हा इतिहास दडवून विद्वेष पसरवणे आणि कुत्रावरून तोडफोड होणे हे थांबायला हवे. त्याऐवजी काल झालेला पाऊस आणखी लांबला असता तर पुण्याला कुठून पाणी देणार होतात ते जाहीर करावे.

इतिहासाचे खरे प्रेम कशाला म्हणतात याचा साक्षीदार किल्ले रायगडच आहे.
गेली अनेक वर्षे सांगली व परिसरातुन "रोज" किमान २ व कमाल कितीही, शिवभक्त नित्यनेमाने रायगडावर येतात व महाराजांची समाधी, शिल्प व अन्य मंदिरांची साफसफाई व पूजा करतात. त्यासाठी गडावरील सर्व देवतांच्या मापाचे हार (महाराज या दैवतासह) असलेली टोपली सांगलीच्याच रायगड पुष्प भांडार मधून मोफत मिळते ती उचलायची व "स्वखर्चाने" रायगड पायी चढायचा (रोपवे नाही). असा नित्यक्रम असतो.
परम आदरणीय शिवभक्त संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्री शिवप्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम आजही अव्याहतपणे सुरु आहे. इतका की आज जर तुम्ही नाव नोंदवायला गेलात तर २ वर्षे पुढची तारीख मिळते...आधीचे बूकींग फुल असते. सगळे बिनबोभाट...कुठे गाजावाजा नाही की जाहीरातबाजी नाही.
आजही गडावर पुरातत्व खात्याने जे तिकीट लावले आहे ते सांगलीचे आहोत म्हटल्यावर माफ असते.
याचाच परिंणाम असा आहे की (हे सोपे नाही मित्रानो..विचार करून पहा) आजपर्यंत कधीही कोणीही शिवरायांच्या समाधीवर शिळा अथवा सुकलेला हार पाहिलेला नाही!!!!!!!!!!!!!!!!!

जय भवानी!! जय शिवराय!!!!

साधनाबाईंशी सहमत.
उद्या मराठ्यांचा इतिहास संभाजीमहाराजांपासूनच सुरू झाला शिवाजी एक दंतकथा आहे असेही लोक म्हणतील.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा प्रशासनाने पुन्हा बसवला आहे. या प्रकरणी ७३ जणांना अटक करण्यात आली आहे.
शेजारच्या झाडीत तो लपून ठेवला होतो
जय शिवाजी, जय भवानी

सज्जन्गडर्यांना अनुमोद. +१
मी स्वतः गुरुजींना भेटलो आहे. या उपक्रमातुन स्पुर्ती घेउन राजगडावरही हा प्रयत्न सुरु आहे.
किरण धन्यवाद.
मी रायगडला दरवर्षी किमान ४ वेळा तरी जातो. राज्याभिषेक तिथी आणि तारखेप्रमाणे मी दोन्हीला कधेना कधी उपस्थीत असतो.तारखेप्रमाणे राज्याभिषेकाला ही सगळी ब्रिगेडी मंडळी असतात्.रायगडावर सगळ्यात जास्त कचरा याच वेळी होतो. त्या दिवशी संध्याकाळी महाड आणि विषेशतः पुण्याच्या दिशेनी जाणार्या सगळया धाब्यांवर फुल्ल गर्दी अर्थात्च मटण आणि दारुचाहे पुर असतो. यांना कधी एकदा गडावरुन उतरतो आणि निघतो असं झालेलं असतं.एकदा का मंत्री गेले की यांच सुरु होतं.
दारु मटण याला विरोध नाही पण आपण ज्या कार्यक्रमासाठी आलोय त्याचं किमान पावित्र्य पाळावं याची जाण तरी असावे.
गेल्यावर्षी राजगडला, पद्मावतिच्या देवळाबाहेर मट्ण आणि उरलेल्या दारुच्या बाटल्या देवळात, आणि नीट न उतरलेले किम चौघे देवळात बुटांसकट पसरलेले असं दृष्य होतं , शेवट बेळगावहुन आलेल्या एका ग्रुपनी यांना हाकलंल चक्क गडावरुन, आणि स्थानिकांकडे चौकशी केली तर हे म्ह्णे नेहेमीचे आहेत शिवजयंतीला ज्योत घेउन जाणारे ब्रिगेडचे लो़ आहेत अशी माहीती मिळाली... अधिक काय बोल्णार

ही असली विघातक निच कृत्ये करणार्‍या लोकांना आणि वर बाष्कळ बडबड करणार्‍या अनेकांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे.

- काय तर म्हणे वस्तू विकली की अधिकार संपतो, तो काय भाजीपाला वाटला की काय ?

लाज लज्जा, भाव भावना सगळे कोळून प्यायलेल्या (?) लोकांपुढे कितीही सुज्ञ चर्चा केली तरी त्याचा काही उपयोग नाही असेच वाटू लागले आहे. बहुतांश मानसिकता ही अत्यंत विकृत घाणेरडी आणि बत्थड होत चालली आहे.

असली हलकट कृत्ये करणार्‍या मुर्ख टाळक्यांना हज्जारदा हत्तीच्या पायी देऊन मग त्यांचा कडेलोट देखील केला असता महाराजांनी. Angry Angry Angry

खरे तर पातळी सोडून लिहित नाही मी कधी, पण एवढा संताप होत आहे की हे लिखाण त्यापुढे सौम्यच वाटावे.

काय केले म्हणजे हे असले विरोधी विचार बंद होणार आहेत आणि समाजात सुसंवाद चालू होणार आहे ?

समाजतली दुही हा पहिल्यापासुन शापच आहे नाही तरी मराठी राज्याला. मधला काही काळ बरा होता तर आता परत सुरूवात झाली आहे.

- काय तर म्हणे वस्तू विकली की अधिकार संपतो, तो काय भाजीपाला वाटला की काय ?

भाजीपाला काय किंवा काहीही काय, विकलं की अधिकार संपतो... भाजीला एक नियम आणि दगडाला दुसरा असे का बुवा?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15321025.cms

शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हलवल्याप्रकरणी पोलीसांनी ७३ "B" ग्रेड गाढवांना अटक केली आहे. व धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं तोडफोड केल्याचा गुन्हा या सर्वांवर दाखल करण्यात आला आहे. आणि वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा रायगडवर होता त्या ठीकाणी बसवण्यात आला आहे.

जय भवानी | जय शिवाजी
जय वाघ्या.

बर्याच पोस्टी मिसल्या. सगळ्या वाचून काढल्या. आगलाव्या पोस्त कमीच आहेत ते एक बरं.
बाळू जोशींची कुठली पोस्त उडवली ते नाही कळला, तुम्ही मला वी पु कळवली तरी चालेल किवा इमेल करा
मे अ म : गा.पै. ने योग्य उत्तर दिलेच आहे
अरभाट : अनुमोदन . वॉटरसन इतका सार्वकालिक ठरेल असे वाटले नव्हते. +१
ब्रिगेड ने रायगडा चे संवर्धन कसे करता येईल त्याचा विचार जास्त करावा. +१
साधना: अजुन काही काळाने शिवाजी महाराज म्हणुन प्रसिद्ध केली गेलेली व्यक्ती कधीकाळी अस्तित्वात होती का याचे पुरावे नाहीत आणि जे पुरावे काही लोक दाखवताहेत ते लोक आणि पुरावे दोन्ही विश्वासार्ह नाहीत, सबब शिवाजी महाराज हे नाव आता पुसा सगळीकडुन यासाठी आंदोलन होईल.....>>>+१००
घारूआण्णा : खूपच विचार करून लिहिले आहे तुम्ही
सज्जनगड : धन्यवाद. श्री शिवप्रतिष्ठान चे फोन नंबर दिले तर बरे होईल. अशा संस्था बर्याचदा स्वतःची प्रसिद्धी न करता काम करतात.
महेश : समाजतली दुही हा पहिल्यापासुन शापच आहे नाही तरी मराठी राज्याला. मधला काही काळ बरा होता तर आता परत सुरूवात झाली आहे. >>>> अगदी अगदी
मे अ म: फारच तिरसट पोस्टी आहेत तुमच्या. पण बाकीच्यांनी शांततेत प्रतिसाद दिले आहेत बर्यापैकी, आभारी आहे.
आता धागा बंद करा.>>>तुमच्या भाषेत उत्तर द्यायचे झाल्यास, हे ठरवणारे तुम्ही कोण? दिवे घ्या

Pages