नमस्ते दोस्तहो!
'सत्यमेव जयते' च्या आज प्रसारित होणार्या शेवटच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा..
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
सत्यमेव जयते भाग ११- http://www.maayboli.com/node/36434
सत्यमेव जयते भाग १२ - http://www.maayboli.com/node/36590
नेहमी प्रमाणे १ ला मी
नेहमी प्रमाणे १ ला मी
अखेरचा एपिसोड....खूप मन लावून
अखेरचा एपिसोड....खूप मन लावून आमीर खान टीमने हा भाग तयार केल्याचे स्पष्ट जाणवत होते. खुद्द आमीरच इतका भावुक झाल्याचे जाणवत होते यामुळे की या कार्यक्रमामुळे सरकारी असो वा खाजगी आस्थापने असोत कुठेनाकुठे निश्चित पातळीवर बदल घडवून आणण्याजोगी कार्यवाही झाली वा होत आहे; याचे प्रत्यंतर त्याच्या रीपोर्टिंग टीमला आले असेल.
आजचा कार्यक्रम तर "संविधान" केन्द्रीभूत ठरवून त्या अनुषंगाने एक नागरिक म्हणून समाजाप्रती आपले काय कर्तव्य राहील तसेच संविधानातीलच आवाहनाला अनुसरून 'फ्रॅटर्निटी - बंधुभाव - भाईचारा' च्या दिशेने या देशातील जे कार्यकर्ते अथकपणे विविध क्षेत्रात स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या उन्नतीसाठी जे कार्य करीत आहेत त्यातील प्रातिनिधिक म्हटले जाऊ शकणार्यांचे आदर्श कार्य प्रत्यक्ष त्या भागात जाऊन आमीर टीमने दाखविले आणि त्या आदर्श व्यक्तीनांही स्टुडिओत आणून त्यांचा यथोचित शब्दात गौरवही करण्यात आला हे या शेवटच्या भागाचे एक वैशिष्ट्य.
दुर्दैवाच्या फेर्यामुळे नशिबी वेश्याव्यवसाय करणार्या स्त्रियांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार्या हैद्राबादच्या महिलेपासून ते अगदी थेट विप्रोचे प्रेमजी अझीम यांच्यापर्यंत आमीरने त्यांचा शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा जो आढावा घेतला तो फारच प्रभावी वाटला.
"संविधान" चे PREAMBLE आदरपूर्वक स्टेजवर लावले असल्याने आमीर खानने त्या पृष्ठाचा योग्य तो आदर राखण्याच्या हेतूने आज जाणीवपूर्वक तिथे पाहुण्यांसाठी तसेच स्वत:साठीही बैठकव्यवस्था ठेवली नव्हती हे आणखीन् एक विशेष.
आमीरने सुरुवातीस संविधानासंदर्भात केलेले दीर्घ भाषण तसेच शेवटी सर्वांनाच देशाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत केलेले आवाहन अगदी शाळाशाळात पोहोचविले जावे असेच वाटले.
सलाम आमीर खान आणि त्याच्या सर्व साथिदारांना !
अधून मधून पाहिला आजचा भाग.
अधून मधून पाहिला आजचा भाग. तस्लिमा हुज्रुक महाराष्ट्राला नव्या नाहीत. चाकाची खुर्ची हे त्यांचं पुस्तक चांगलंच गाजलेलं आहे. त्यांच्या कार्याचा आढावा अगदीच धावता.. उडता झाला. दखल घेतली हे देखील कमी नाही. आजवर कुठल्याही वाहिनीवर त्यांचं कार्य दिसलेलं नाही. बिहारमधे डोंगरातून रस्ता काढणारा मनुष्य लक्षणीय. अहमदनगर जिल्ह्यात देखील एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगरातून रस्ता केलेला आहे.
रात्री संपूर्ण भाग पाहता येईल. एकंदरीत ही तेरा भागांची मालिका उल्लेखनीय ठरली. सर्व गुणदोषांसहीत आमीरखान गुणवत्ता यादीत पास झाल्याचे म्हणता येईल. टीव्ही या मालिकेचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो हे या निमित्ताने संपूर्ण देशाच्या लक्षात आले असेल. लगेचच देशवासियांमधे बदल होतील ही अपेक्षा नाहीच. पण कुठेतरी काही काही गैरसमज निवळायला देखील मदत झालेली असेल. एका विशिष्ट समाजाचे लोक फक्त गुन्हेगारच असतात हा एक समज निवळायला देखील मदत व्हायला हरकत नाही. माणसं सर्वत्र सारखीच आहेत. जितकी काळजी आपल्याला देशाची किंवा समाजाची आहे तितकीच ती सर्वांना आहे. त्याचबरोबर जितके बेफिकीर आपण आहोत तितकेच सगळे आहेत हे देखील लक्षात येतंय.
आमीरखानचं या मालिकेबद्दल अभिनंदन !
किरण.... "त्यांच्या कार्याचा
किरण....
"त्यांच्या कार्याचा आढावा अगदीच धावता.. उडता झाला...."
~
खरे आहे. पण किरण, मला वाटते की दीड तासाच्या कालावधीमध्ये जास्तीतजास्त अशा कार्यकर्त्यांना देशातील जनतेसमोर 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून आणण्याचा आमीर टीमचा प्रयत्न असल्याने नक्कीच त्यांच्यासमोर हरेक व्यक्तीला किती वेळ प्रदान करता येईल याचा आलेख समोर असणारच.
या निमित्ताने का होईना नसीमाताईंच्या कार्याची हा कार्यक्रम पाहाणार्या जगभरातील करोडो लोकांना अल्पशी का होईना ओळख होईल.
~ आणखीन् कौतुकाची एक बाब म्हणजे ~ 'सत्यमेव जयते' ला आर्थिक पाठबळ मिळाले होते ते 'रीलायन्स फौंडेशन' आणि नीता अंबानी यांचे. असे असूनही आजच्या कार्यक्रमात आमीरने उद्योग क्षेत्रात अंबानी ग्रुपच्या तोडीचे असलेले अझीम प्रेमजी यांच्या फौंडेशनने बिहारच्या ग्रामीण भागात केलेल्या मोफत शैक्षणिक प्रसाराची माहिती दिली. अशाच स्वरुपाचे कार्य नीता अंबानीही महाराष्ट्र आणि गुजराथमध्ये करीत असूनही त्याना स्टेजवर न आणण्याचे औचित्य आमीरने दाखविले ही एक प्रशंसनीय प्रथा ठरावी.
अशोक पाटील
>>तस्लिमा हुज्रुक > डॉ. नसीमा
>>तस्लिमा हुज्रुक > डॉ. नसीमा हुरझूक/ हुरजूक.
नेहमीप्रमाणेच आजचा भागही
नेहमीप्रमाणेच आजचा भागही खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण!
शेवटचे गाणे विशेष आवडले.
सर्वसामान्यांमधून उभी राहिलेली ही व्यक्तिमत्वे! आमीर सारख्या 'सेलिब्रेटी'कडून आपल्या कार्याची दखल घेतली जाते आहे याचे समधानही त्यांच्या चेहर्यांवर दिसले.
सर्व १३ भाग अविस्मरणीय!
धन्यवाद अश्विनीमामी.
धन्यवाद अश्विनीमामी.
खूपच सुरेख होता आजचा
खूपच सुरेख होता आजचा भाग.
टेलिव्हीजनच्या इतिहासात या मालिकेने नक्कीच आपला ठसा उमटवला आहे.
'सत्यमेव जयते' आणि आमिर खानच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक !
(हे सर्व भाग नेटवर आहेतच, पण एखादा संच निघाला तर विकत घ्यायला आवडेल.)
आत्ताच हा भाग पाहून झाला. इतर
आत्ताच हा भाग पाहून झाला. इतर भागांप्रमाणेच महत्वाचा होता.
इथे अगदीच तुरळक प्रतीसाद आहेत - त्याचप्रमाणे लोकांच्या प्रत्यक्ष कृतीचे होऊ नये अशी सदाशा.
कालच्या आकाशवाणीवरील
कालच्या आकाशवाणीवरील श्रोत्यांच्या फोन/इमेलद्वारा आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही.
मुंबईच्या एका महिलेने सुनीता कृष्णन यांच्या संस्थेतल्या मुलीला आपली सून म्हणून निवडायची इच्छा व्यक्त केली.
एका तरुणाने या कार्यक्रमांच्या सीडी बनवून आपल्या गावतल्या लोकांना त्या दाखवून तिथे काही विधायक कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आज मी आमीर खानला फोन करून त्याच्याशी बोलतोय. कधीतरी आमीर खान मला फोन करून माझ्या कामाबद्दल विचारेल असा त्याचा आशावाद.
सत्यमेव जयतेचा दुसरा सीझन घेऊन येईन - इति अमीर. अनेक प्रेक्षकांचीही मागणी आहे.
प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा आणि उपोषणे करण्यापेक्षा जनजागृती, चर्चा आणि प्रत्यक्ष कृती हा मार्ग जास्त परिणामकारक असे एका महिलेने सांगितले.
स्वातंत्र्यदिनी सकाळी ११ ला
स्वातंत्र्यदिनी सकाळी ११ ला 'सत्यमेव जयते का सफर' हा विशेष भाग प्रक्षेपित होईल.
धन्यवाद, भरत मयेकर हा भाग
धन्यवाद, भरत मयेकर
हा भाग पहायचा प्रयत्न करण्यात येईल.
शेवटच्या भागात दाखवलेल्या
शेवटच्या भागात दाखवलेल्या अहमदाबाद येथील सर्वोदय ट्रस्टच्या तृप्तीबेन देसाई आमच्या शाळेच्या (गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच ए एल हायस्कुल) माजी विद्यार्थीनी आहेत हे समजल्यानंतर अभिमानाने ऊर भरुन आला!
वत्सलाताई शक्य झाल्यास शाळेशी
वत्सलाताई
शक्य झाल्यास शाळेशी संपर्क साधून मायबोलीकरांचा त्यांच्या कार्याला असलेला सॅल्युट तृप्तीबेनपर्यंत पोहोचवता येईल का ? खरंच अवघड, धैर्याची कसोटी पाहणारं आणि सामाजिक दृष्ट्याही गुंतागुंतीचं काम केलंय त्यांनी. आज त्याला गोमटी फ़ळे लागलीत.