मी बनवलेल्या कलाक्रुतिंना तुम्हा सगळ्यांनी खुप प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल धन्यवाद. मी बनवलेल्या दुसर्या केकसाठी नविन धागा उघडण्याच्या तुमच्या सल्ल्याबद्दलही आभार. पण लाजोताईंसारख्या केकगुरु इथे असताना माझी तरी केकसाठी नविन धागा उघडायची हिम्मत नाही होणार आणि स्वता: मीच पुढचा केक कधी बनवेन ह्याचा मलाच पत्ता नाही. त्यापेक्शा मला असे वाटतेय की आपण आपल्याकडच्या काही नविन कल्पना इथे वाटून घेतल्यात तर. ज्या नविन, सोप्प्या असतील आणि कशाही संदर्भात असतील जसे एखाद्या पाकक्रुतीचे सादरीकरण, मुलांच्या शाळेतील एखाद्या प्रोजेक्ट्चे प्रेझेंटेशन, घरातील वस्तू अरेंज करण्याबद्दल जे छानही दिसेल आणि उपयोगीही असेल इ. इ. आपण आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सल्ल्यासाठीही मदत मागू शकू, जसे आज काल प्लेस्कूल पासून पालकांनाही बर्याच क्रिएटिव्ह गोष्टी घरुन बनवून आणायला सांगतात. त्यासाठीही मदत होऊ शकते.
बघा तुम्हा सगळ्यांना ही कल्पना कशी वाटते. आधीच अश्या प्रकारचे काही इथे असल्यास तिथेच कंटिन्यू करु किंवा ह्या धाग्याला काही दुसरे नाव सुचवायचे असेल तर सुचवा.
तुर्तास माझा सहभाग म्हणून मी लेकीच्या वाढदिवसच्या पार्टीच्या काही कल्पना इथे देते ज्या मुलांनी खुपच एन्जॉय केल्यात.
ह्या वेळी मुलीचे बरेच मित्र-मैत्रिणी असणार होते त्यामुळे पार्टी मुलांना मध्यवर्ती ठेउनच करायची असा विचार केला. काय करावे असा विचार करता करता 'अँग्री बर्डस' ची थिम ठेवावी असे डोक्यात आले. माझ्या मुलीला तर ते आवडतातच पण माझ्या मैत्रिणीच्या २ वर्षाच्या मुलाचेही ते चांगलेच फेवरेट आहेत. म्हणजे सगळ्या वयोगटाला ही थिम अपिल होईल हा अंदाज केला. मी त्यादिवशी कामात असल्यामुळे खुप व्यवस्थित फोटो घेऊ शकले नाही. जसे जमले तसे इथे देत आहे.
ह्म्म्म्म्...मग सगळी जमवा जमव चालू केली. आधी सगळं हाताने बनवायचा विचार होता पण रोजचं एकुण शेड्युल बघता एक ना ध्ड भाराभर चिंध्या व्हायचे चान्सेस वाटू लागले. शेवटी गुगल महाराजांना पाचारण केलं आणि त्यांच्या मदतीने इमेजेस तयार करुन सरळ प्रिंट्स काढून घेतल्या व त्या घरात सजावटीसाठी वापरल्या...
हे अशी आमंत्रण पत्रिका गेली...
ज्यांच्याकडे 'अँग्री बर्डस' कपडे होते ते घालून आले..नव्हते त्यांच्यासाठी टॅग्स बनवले होते लावायला जे गोंधळात राहुनच गेले
प्लेन फुगे घेऊन त्यावर चोच आणि डोळे रंगवून 'अँग्री बर्डस' बनवायचा प्लॅन होता. पण बॅनर आणि फुगे क्रॉफर्डला आयते मिळाले...
आणि बच्चे कंपनीसाठी टोप्याही...घरी सुद्धा बनवता येतील छान छान
मुलांसाठी 'स्टॉम्प द पिग', एग हंट, बर्डीला चोच लावणे, टॅलेंट शो, कलरिंग असे वेगवेगळे खेळ ठेवले...
ज्यांच्याकडे अंगण आहे ते खोक्यांचा वापर करुन अॅक्चुअल गेम स्ट्र्क्चर बनवू शकतात. आम्ही केक वरच्या स्ट्र्क्चर वरच समधान मानलं
आम्हाला पण खुप आवडलं रंगवायला
टॅलेंट शो
आणि मेन्यू...मुलांसाठी केक पॉप्स, मार्शमेलो विथ जेली चॉकलेट, वॅफल स्टीक्स, जेली, चायनीज भेळ, केक असा मेन्यू होता शिवाय चॉकलेट्स्.मोठ्यांसाठी असलेले पुलाव, सुप, काठी रोल आणि रबडी गुलाबजामही होतेच. अर्थात मुलांनी चायनीज भेळ वरच ताव मारला...
पदार्थांना थिमप्रमाणे टोपण नाव दिले..ह्यात बर्डस नेस्ट (चायनीज भेल), बर्डी दाना (पुलाव) मिसींग आहेत.
सरते शेवटी राहीला केक जो परत घरीच बनवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांनी खुप अॅप्रिशिएट केला...
इथे मला हे सर्व आवर्जून द्यावसं वाटलं कारण मुलांना हे सगळं खुपच आवडलं अगदी त्यांच्या आयांनीही आम्हाला एक वेगळी संध्याकाळ अनुभवायला मिळाली असे सांगून पावती दिली. ह्यातच अनेक नवनवीन कल्पना आणून अजून छान अशी बच्चा पार्टी एन्जॉय करता येईल
३ वेळा प्रदर्शित झालाय का हा
३ वेळा प्रदर्शित झालाय का हा धागा???
मस्तच गं श्रद्धा. छान कल्पना
मस्तच गं श्रद्धा. छान कल्पना आहे, सजावट पण भारीच. केक सही दिसतोय. १०० पैकी १०१ मार्क्स. आयडीया आणी केकक्वीन लाजो काय म्हणतीय ते बघु.:फिदी:
इथले आणखीन अनूभवी लोक त्यांचे अनूभव शेअर करतीलच.
मस्त धागा उघडलास..... लक्ष
मस्त धागा उघडलास..... लक्ष ठेवते या धाग्यावर
इथे खुप कल्पक लोक आहेत, चांगल्या चांगल्या कल्पना माहीती होतील
बाकी प्रचि,थीम व तु बनवलेला केक सर्वच एकदम यम्मी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होय. तीन वेळा झालाय हा
होय. तीन वेळा झालाय हा धागा...
धन्यवाद पार्टी शेअर केल्याबद्दल!!!
सलाम तुम्हाला... सगळं अगदीच छान जमलयं!!!
__/\__ :ड
सह्हीईईईई !!!!!
सह्हीईईईई !!!!!
वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह सुंदरच
वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह सुंदरच आहे सगळे............मस्तच.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
__________/\_________ श्रध्दा तुझ्या मेहनतीसाठी.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्रेट.. लकी आहे सोहा
ग्रेट.. लकी आहे सोहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच सजावट केली आहे. केक तर
छानच सजावट केली आहे.
केक तर अफलातून. पुन्हा-पुन्हा पाहिला.
कुंपणासाठी किटकॅटचे बार लावले आहेत का ?
(दुसरा धागा अप्रकाशित कराल का ? नाहीतर प्रतिक्रिया देणारे गोंधळणार.)
सहीच झालेली दिसत आहे पार्टी
सहीच झालेली दिसत आहे पार्टी ... चान्गल्या टीप्स आहेत.
सह्हीच अॅरेंज केली पार्टी
सह्हीच अॅरेंज केली पार्टी हं. थीम मस्त सगळीकडे वापरलियेस. केक, खाऊ तर खूपच आवडले. केकवरचं चॉकलेट बार्सचं मचाण मस्त आहे. बच्चेकंपनी एकदम खुश झाली असणार नक्कीच.
जबरदस्त आहे
जबरदस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान धागा श्रद्धा आणि
छान धागा श्रद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि अँग्रीबर्ड्स केक पण बोलेतो एकदम झक्कास!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग मी कसली केकगुरू... मी तर फक्त केककरू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या धाग्याला 'पार्टीप्लॅनिंग आणि सजावटीच्या कल्पक कल्पना' असं काहितरी नांव देता येइल का? कारण 'पदार्थ सजावट आणि मांडणी' असा एक धागा ऑलरेडी आहे.
केककरू...हाहाहाहा.....नाही
केककरू...हाहाहाहा.....नाही नाही केकगुरुच. आता मी पण भाव खाऊ शकते ना तुमच्याकडून शाबासकी मिळाली म्हणून, अगदी मनापासून बोलतेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टुनटुन, व्हिनस, योगेश कुळकर्णी , आस ,योगुली, र्षा_म, रुणुझुणू, अवना , मामी, झकासराव..अभार तुम्हा सगळ्यांचे. तुमच्याकडच्याही कल्पना इथे शेअर करा प्लिज.
दुसरे धागे उडवण्याची विनंती केली आहे.
लाजोताई, छान बदल सुचवलात!
श्रद्धादिनेश खूप खूप अभिनव
श्रद्धादिनेश खूप खूप अभिनव कल्पना! अँग्री बर्ड्सची थीम व त्याला साजेसे मेन्यू नावे, डेकोरेशन सुपर्ब!
बाळगोपाळांची संख्या खूप होती!! धम्माल केली असणार! केकवरील गवताचे आयसिंग सिंपली ग्रेट!!! खूपच खरेखुरे वाटतेय...
कुठल्याही पार्टीच्या वेळी मनात असंख्य कल्पना असतात. सगळं काही एकदम करायचा मोहही होऊ शकतो. बेस्ट करण्याच्या फंदात सगळंच घरी करू असा उत्साह गृहीणी दाखवतात. पण बर्थडे बॉय्/गर्लच्या जोडीला होस्ट म्हणून गृहीणीही उत्सवमूर्ती असते, तिने कार्यक्रमावेळी थकून न जाता फ्रेश दिसावे हेच ती विसरून जाते. तुम्ही कित्तीही कल्पक असलात तरी सगळंच घरी करण्याच्या फंदात न पडता शक्य असेल ते डेकोरेशनचं साहित्य विकत आणावं इतर गोष्टींसाठी हा व्हॅल्यूएबल टाईम युटीलाईज होतो. त्यामानाने श्रद्धादिनेश, तुमची गूगलच्या प्रिंट्सची कल्पना बेस्टच!!
आणखी पूर्वी केलेल्या बर्थडेजचं- मुलीचा पहीला, पाचवा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जोडीदाराचा, घरातील वृद्ध मंडळींचा वाढदिवस स्पेशल रीतीने साजरा केला असेल तर त्याच्याही टिप्स द्या.
लाजो तुम्ही तर केक गुरूच! साधनाही मस्त करते केक्स! आम्ही केक गुरू तर सोडा पण साधे केक करू गटात पण मोडत नाही
मावे नसल्यामुळे. आम्ही आपले केक चरू गटातले!!! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्रद्धा अतिशय सुरेख, तुझी
श्रद्धा अतिशय सुरेख, तुझी मेहनत दिसतेय. बरंच प्रिपरेशन करावं लागलं असणार तुला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठल्याही पार्टीच्या वेळी
कुठल्याही पार्टीच्या वेळी मनात असंख्य कल्पना असतात. सगळं काही एकदम करायचा मोहही होऊ शकतो. बेस्ट करण्याच्या फंदात सगळंच घरी करू असा उत्साह गृहीणी दाखवतात. पण बर्थडे बॉय्/गर्लच्या जोडीला होस्ट म्हणून गृहीणीही उत्सवमूर्ती असते, तिने कार्यक्रमावेळी थकून न जाता फ्रेश दिसावे हेच ती विसरून जाते. तुम्ही कित्तीही कल्पक असलात तरी सगळंच घरी करण्याच्या फंदात न पडता शक्य असेल ते डेकोरेशनचं साहित्य विकत आणावं इतर गोष्टींसाठी हा व्हॅल्यूएबल टाईम युटीलाईज होतो.<<<<<<<
+++ १००%
dreamgirl, अगदी बरोबर लिहीले
dreamgirl, अगदी बरोबर लिहीले आहे तुम्ही. कल्पना खरंच खुप असतात पण त्या यशस्वीपणे पुर्णत्त्व्वास नेणे महाकठीण. माझे असे नेहमीच होते. जर कामं पुर्ण करत बसले तर पाहूणे येईपर्यंत आम्ही आपले अवतारातच. मग घाइघाईत अर्धवट तयारी. त्यात पुन्हा नव-नविन मेन्यू स्वतःच बनवायची हौस दांडगी त्यामुळे जास्तित-जास्त वेळ किचनमधे. तरी घरात सासु-सासरे, नवरा सांगेन ती मदत करतात पण क्रिएटिव्ह हँड कमी पडतो. प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणे दिसावी असे वाटत असल्याने सगळीकडेच लक्श घालावं लागतं. आणि हो परत फोटो पण स्वतःच काढायचे
ह्यावेळी एक दिवस आधी सुट्टी घेऊन सगळी तयारी केली होती म्हणून एवढं तरी जमलं. तरीही बर्याचशा गोष्टी राहूनच गेल्या. अर्थात घरातल्यांच्या, मैत्रिणीच्या मदतीने सगळं निभावून गेलं. काय होतं ना एक क्षण असा येतो की सगळं ब्लँक होउन जातं. अशावेळी हे बाकीचे हात निभावून नेतात. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्या पार्ट्यांचं प्लॅनिंग २० एक दिवस तरी आधी पासून चालू करावं. म्हणजे कच्चा आराखडा...काय काय करायचं वगैरे. जेवण शक्य असेल तर बाहेरुन मागवावं. एखादा युनिक पदार्थ घरी करावा. कामं प्लॅन करुन खात्रिच्या माणसांना वाटुन द्यावीत. या कामात मित्र-मैत्रिणींची खुप मदत होते. मला तर २-३ दिवस आधीपासून करायच्या कामांची यादी करायची सवय आहे. त्यात अगदी 'सकाळी बटाटे उकडणे, समारंभाच्या कपड्याची तयारी करणे' अशा गोष्टीही असतात
अगदी एक्सेलमधे चेकलिस्ट बनवून ठेवते. मला खुप फायदा होतो त्याचा.
ज्याना शक्य असेल ना त्यानी असे प्लॅन्स ठरवल्यावर क्रॉफर्ड मार्केटला फेरी मारावी. त्या-त्या वेळी चालू असणार्या विषयांवर जसे इथे अँग्री बर्ड्स आहेत, छोटा भिम आहे, डिस्ने कॅरॅक्टर्स आहे इ निवडावे. म्हणजे क्रॉफर्ड आणि गुगल आपले सजावटीचे अर्धे कष्ट कमी करतात. काही स्पेसिफीक थिम्स घेतल्या जसे मॅडागास्कर किंवा आईस एज तर मॅन्युअल काम खुप करावं लागेल.
असेच तुमचेही अनुभव शेअर करत रहा. मला जसे सुचतील तसे टाकतच राहीन.
बाकी केक चरू मस्तच![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आभार दक्षिणा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढी मेहनत करता तेव्हा स्वतः
एवढी मेहनत करता तेव्हा स्वतः पण छान सुंदर तयार व्हायलाच पाहिजे ना पार्टीला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण खूप मेहनत घेतलीय तुम्ही.
ड्रीमगर्ल मीपण केकचरू.
ड्रीमगर्ल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मीपण केकचरू.
मी केक(ऑर्डर)करू.
मी केक(ऑर्डर)करू.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद झंपी नेमकं तेच राहून
धन्यवाद झंपी
नेमकं तेच राहून जातं दर वेळी, ह्यावेळी जमवलं होतं पण.
हे चरु..करु मस्तं जमलंय!!!