कल्पक कल्पना- सादरीकरणाच्या,सजावटीच्या

Submitted by श्रद्धादिनेश on 24 July, 2012 - 06:50

मी बनवलेल्या कलाक्रुतिंना तुम्हा सगळ्यांनी खुप प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल धन्यवाद. मी बनवलेल्या दुसर्या केकसाठी नविन धागा उघडण्याच्या तुमच्या सल्ल्याबद्दलही आभार. पण लाजोताईंसारख्या केकगुरु इथे असताना माझी तरी केकसाठी नविन धागा उघडायची हिम्मत नाही होणार आणि स्वता: मीच पुढचा केक कधी बनवेन ह्याचा मलाच पत्ता नाही. त्यापेक्शा मला असे वाटतेय की आपण आपल्याकडच्या काही नविन कल्पना इथे वाटून घेतल्यात तर. ज्या नविन, सोप्प्या असतील आणि कशाही संदर्भात असतील जसे एखाद्या पाकक्रुतीचे सादरीकरण, मुलांच्या शाळेतील एखाद्या प्रोजेक्ट्चे प्रेझेंटेशन, घरातील वस्तू अरेंज करण्याबद्दल जे छानही दिसेल आणि उपयोगीही असेल इ. इ. आपण आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सल्ल्यासाठीही मदत मागू शकू, जसे आज काल प्लेस्कूल पासून पालकांनाही बर्याच क्रिएटिव्ह गोष्टी घरुन बनवून आणायला सांगतात. त्यासाठीही मदत होऊ शकते.

बघा तुम्हा सगळ्यांना ही कल्पना कशी वाटते. आधीच अश्या प्रकारचे काही इथे असल्यास तिथेच कंटिन्यू करु किंवा ह्या धाग्याला काही दुसरे नाव सुचवायचे असेल तर सुचवा.
तुर्तास माझा सहभाग म्हणून मी लेकीच्या वाढदिवसच्या पार्टीच्या काही कल्पना इथे देते ज्या मुलांनी खुपच एन्जॉय केल्यात.

ह्या वेळी मुलीचे बरेच मित्र-मैत्रिणी असणार होते त्यामुळे पार्टी मुलांना मध्यवर्ती ठेउनच करायची असा विचार केला. काय करावे असा विचार करता करता 'अँग्री बर्डस' ची थिम ठेवावी असे डोक्यात आले. माझ्या मुलीला तर ते आवडतातच पण माझ्या मैत्रिणीच्या २ वर्षाच्या मुलाचेही ते चांगलेच फेवरेट आहेत. म्हणजे सगळ्या वयोगटाला ही थिम अपिल होईल हा अंदाज केला. मी त्यादिवशी कामात असल्यामुळे खुप व्यवस्थित फोटो घेऊ शकले नाही. जसे जमले तसे इथे देत आहे.

ह्म्म्म्म्...मग सगळी जमवा जमव चालू केली. आधी सगळं हाताने बनवायचा विचार होता पण रोजचं एकुण शेड्युल बघता एक ना ध्ड भाराभर चिंध्या व्हायचे चान्सेस वाटू लागले. शेवटी गुगल महाराजांना पाचारण केलं आणि त्यांच्या मदतीने इमेजेस तयार करुन सरळ प्रिंट्स काढून घेतल्या व त्या घरात सजावटीसाठी वापरल्या...
DSC01648.jpgDSC01659.jpg

हे अशी आमंत्रण पत्रिका गेली...
AHBD5_0.jpg

ज्यांच्याकडे 'अँग्री बर्डस' कपडे होते ते घालून आले..नव्हते त्यांच्यासाठी टॅग्स बनवले होते लावायला जे गोंधळात राहुनच गेले Happy
DSC01656.jpg

प्लेन फुगे घेऊन त्यावर चोच आणि डोळे रंगवून 'अँग्री बर्डस' बनवायचा प्लॅन होता. पण बॅनर आणि फुगे क्रॉफर्डला आयते मिळाले...
DSC01667.jpg

आणि बच्चे कंपनीसाठी टोप्याही...घरी सुद्धा बनवता येतील छान छान
DSC01662.jpg

मुलांसाठी 'स्टॉम्प द पिग', एग हंट, बर्डीला चोच लावणे, टॅलेंट शो, कलरिंग असे वेगवेगळे खेळ ठेवले...
DSC01679.jpgDSC01674.jpgDSC01699.jpgDSC01710.jpg
ज्यांच्याकडे अंगण आहे ते खोक्यांचा वापर करुन अ‍ॅक्चुअल गेम स्ट्र्क्चर बनवू शकतात. आम्ही केक वरच्या स्ट्र्क्चर वरच समधान मानलं

आम्हाला पण खुप आवडलं रंगवायला Happy
DSC01712.jpgDSC01713.jpg

टॅलेंट शो
DSC01727.jpgDSC01729.jpgDSC01735.jpg

आणि मेन्यू...मुलांसाठी केक पॉप्स, मार्शमेलो विथ जेली चॉकलेट, वॅफल स्टीक्स, जेली, चायनीज भेळ, केक असा मेन्यू होता शिवाय चॉकलेट्स्.मोठ्यांसाठी असलेले पुलाव, सुप, काठी रोल आणि रबडी गुलाबजामही होतेच. अर्थात मुलांनी चायनीज भेळ वरच ताव मारला...

पदार्थांना थिमप्रमाणे टोपण नाव दिले..ह्यात बर्डस नेस्ट (चायनीज भेल), बर्डी दाना (पुलाव) मिसींग आहेत.
DSC01645.jpgDSC01646.jpgDSC01650.jpgDSC01755.jpgDSC01756.jpgDSC01723.jpg

सरते शेवटी राहीला केक जो परत घरीच बनवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांनी खुप अ‍ॅप्रिशिएट केला...
2012-07-21-00.43.jpg2012-07-21-01.43.jpgDSC01632.jpgDSC01642.jpgDSC01647.jpgDSC01703.jpg

इथे मला हे सर्व आवर्जून द्यावसं वाटलं कारण मुलांना हे सगळं खुपच आवडलं अगदी त्यांच्या आयांनीही आम्हाला एक वेगळी संध्याकाळ अनुभवायला मिळाली असे सांगून पावती दिली. ह्यातच अनेक नवनवीन कल्पना आणून अजून छान अशी बच्चा पार्टी एन्जॉय करता येईल Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रदधादिनेश,
खुप छान केल आहेस तु सगळ डेकोरेशन ,गेम ,खाण्याच्या मेनु ची नाव ही मस्त ..केक घरी केलास ना.मस्त एक्दम.तुझी लेक तर जाम खुष झाली असेल..

वा केक खासंच
आणि कल्पकता तर तुमचे पाय कुठे आहेत ______/\_______

मायबोलीकरानी आपल्या आयडीयाज शेअर कराव्यात उपयोगी पडतात Happy

मी सुद्धा मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला गुगलुनच तयारी केली होती घरीच बनवले हे सगळे
Aahana Decoration.JPG

केक विकत आणलाय Happy

Aahana Cake.JPG

केदार, सापडले तुमचे फोटो, बलून डेकोरेशन खासचं. मलाही असे काही करायचे होते पण समजलेच नाही कसे करायचे ते. ते फुगे कसे बांधलेत एकत्र ते सांगा ना.

आणि हा धागा काढून टाकून प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवण्याची अ‍ॅडमिनना विनंती करतेय.

केदार, सापडले तुमचे फोटो, बलून डेकोरेशन खासचं. मलाही असे काही करायचे होते पण समजलेच नाही कसे करायचे ते. ते फुगे कसे बांधलेत एकत्र ते सांगा ना. >>>> मी पण तुनळी वर शोधलाय बलूनआर्च नावाने मिळेल, सोपी माडणी आहे. जमते फक्त हवा भरायला पंप हवाय नाहीतर काहीच खरे नाही Biggrin मी ते बलून एका चांगल्या नायलॉन दोरी वर गुंडाळलेत. आणि गुगलून बरेच ऑप्शन मिळतात !

पुन्हा एकदा माफ करा

वा केदार बलून डेकोरेशन मस्तच जमलय. मलाही माझ्या भाच्याच्या पहिल्या वाढदिवसाला असच करायच होते पण जमलं नाही. पंपाने एवढे फुगे फुगवेपर्यंत हालत वाईट होते. आम्ही फुगे व्हॅक्युम क्लीनरच्या हवा सोडण्याच्या (blower) नळीने फुगवले. Proud पटापट झाले Happy

मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून केलेले डेकोरेशन. ससा आणि कासव ही गोष्ट आणि त्याचे गाणे भाच्याचे खूप आवडते म्हणून ती थीम Happy
03i.JPG01.JPG02.JPG
आणि हा केक अर्थात विकतचा.. पण श्रद्धा आता असं वाटतेय तुझी ही कला आधी माहित असती तर तुझ्याकडूनच बनवून घेतला असता. तू नक्कीच याहून मस्त केला असता. Happy
04.JPG

भाच्याच्या वाढदिवसाचि तयारी मस्त केली होतित, काय करता आपण?, माझ्या ऑफिस मध्येपण एल एस रहेज्याचे बरेच कलिग आहेत?

नीलू Happy अजून तेवढे प्रयोग केले नाहीत पण कल्पना छान दिलीत. हि ससा-कासवाची कल्पना मस्तच आहे. थोडा विचार करयला पाहीजे ह्यावर. धन्स, डोक्याला एक नविन खाद्य दिल्याबद्दल Happy

मस्त सजावट,>>> धन्यवाद
ती फुलं कशी केलीक? कागदाची आहेत का ? >>> ह ती कमळे करायला १५ मिनिटे लागतात,
त्या साठी आपल्या आवडी प्रमाणे वेगवेगळया रंगाचे पतंगाचे कागद आणायचे ८ ते १० आणि एकावर एक ठेवून आपण जापानी पंखा तयार करतो तसं फोल्ड करायचं आणि नंतर पाहिजे असतील तसे दोन्ही टोकांना कट द्यायचे , मग सेंटर ला तार बाधून एक एक कागद अलगद सोडवून मधोमध आणायचा झालं फुल तयार (मी कमळाचे रंग डोक्यात ठेऊन फुलं टायर केली ) सिंगल कलर मध्ये सुद्धा फुल चांगले दिसते कमी खर्चात, कमीवेळेत बड्डेसाठी डेकोरेशन तयार Happy

नंतर फोटो उपलोड करतो स्टेप बाय स्टेप Happy

ओके आणि ते पांढरं फूल ? >>>> ते तर एकदम सोपे चण्याच्यापुड्या बनवतात तश्या बनवून घ्यायच्या खालच्या निमुळत्या टोकावर १/२ इंच अंतरावर स्टेपल मारायचे आणि ग्लूगनने ऐका पुठ्यावर गोल चिकटवायचे

आणखी एक संपत आलेल्या ग्लीटर्सच्या ट्यूब शिंपडायच्या