धूम्र वलय

Submitted by संजयb on 10 July, 2012 - 02:37

मन माझे वेध घेई
तूझ्या आठवांचा
परी सापडेना ठेवा
प्रितीच्या क्षणांचा

मन:पटला वरी आता
तू अंधूकशी पाठमोरी
तूझ्या वदनाच्या रेखा
कधीच लोपल्या पूसल्या

तरी एक वेदना
सूर होवूनी उदास
मनात फिरते
अंधूक अंधूक
एक धूम्र वलय

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मन माझे वेध घेई
तूझ्यामाझ्या आठवांचा
परी सापडेना ठेवा
चार प्रितीच्या क्षणांचा

मन:पटला वरी तू
अंधूकशी पाठमोरी
तूझ्या वदनाच्या रेखा
पार लोपल्या पूसल्या

तरी वेदना ती एक
सूर होवूनी उदास
मनामनात फिरते
धूम्र वलय ते खास

असे बदल केल्यास एक सुंदर अष्टाक्षरी होईल. चांगली झालीये कविता

डॉ. साहेबांना अनुमोदन....>>+१

दुसर्‍या कडव्यात 'पाठमोरी' ला यमक हवे