मित्रांनो,
सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांची संख्या आता ५५ झाली आहे.
यांच्याव्यतिरिक्तही ज्यांना गझल शिकायची, लिहायची इच्छा आहे, पण नाव नोंदवायचं राहून गेलंय, अश्यांनी २६ तारखेपर्यंत आमच्याकडे आपल्या रचना पाठवा. आपण त्या कार्यशाळेत जरूर समाविष्ट करून घेऊ.
मायबोली वर आयोजित केलेली ही दुसरी कार्यशाळा थोडी वेगळी आणि मनोरंजक करू असं म्हटलं होतं.
पहिल्या कार्यशाळेत आपण ’तरही’ गझल लिहिल्या होत्या. म्हणजे एक ओळ (मिसरा) दिली होती.
त्याचे वृत्त (बहर), यमक (काफिया), स्वरचिन्ह (अलामत) व अंत्ययमक (रदीफ) समजावून सांगण्यात आले होते.
दिलेल्या ओळीने सुरूवात करून, तीच जमीन वापरून किमान ५ व कमाल कितीही असे शेर लिहून गझल लिहायची होती.
ह्यावेळी मात्र आपण काही बंधनं शिथील करणार आहोत. ह्या कार्यशाळेत आम्ही तुम्हाला फक्त अंत्ययमक काय असावं हे सांगणार. वृत्त आणि काफिया काय असावा हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. आहे ना मजा?
मग तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.
गझल कार्यशाळा २००८ साठी आपण निवडलेला रदीफ आहे : 'नाही'.
मग आता इतकंच करायचं -
'नाही' रदीफ वापरून किमान पाच शेर लिहायचे. म्हणजे फक्त १० ओळी!
गझल पूर्ण झाली, की ती आम्हाला kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर पाठवायची.
ती गझल तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे निर्दोष करण्यासाठी संयोजक समितीचे सदस्य तुमच्याबरोबर असतीलच.
हे कसं, काय याची प्राथमिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे :
गझलची तोंडओळख - १
गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)
गझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. )
"गझल - काही उदाहरणे"
त्यातून काही अडलं तर आम्ही आहोतच.
* एक स्पर्धक एकापेक्षा अधिक रचना पाठवू शकतो. मात्र अशा रचना वेगळ्या वृत्तात व वेगळा काफिया वापरून लिहिलेल्या असल्या पाहिजेत.
* ह्या कार्यशाळेत हझल (हास्य-गझल) स्वीकारली जाणार नाही
* तसेच स्वरकाफिया असलेल्या गझल स्वीकारल्या जाणार नाहीत.
* कृपया तुम्ही लिहीत असलेली रचना आम्हाला खाली दिलेल्या ई-पत्त्यावरच पाठवावी.
ती रचना निर्दोष आहे असं ठरल्यावर संयोजक समिती कार्यशाळेत प्रकाशित करेल.
तोवर तुम्ही ती कार्यशाळेतल्या कुठल्याही दुव्यावर वा अन्यत्र कुठीही प्रकाशित करू नये.
* तसंच या आधीच अन्य ठिकाणी प्रकाशित झालेल्या रचना कार्यशाळेत देऊ नयेत अशी नम्र विनंती.
* तुमची मतं, तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. काहीही प्रश्न / शंका / सूचना असतील त्या आम्हाला अवश्य कळवा. त्यावर लगेच कार्यवाही केली जाईल.
लक्षात असू द्या :
२६ सप्टेंबर : गझल पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नाव नोंदवायचं राहून गेलं? हरकत नाही. २६ तारखेपर्यंत तुमची गझल आम्हाला पाठवा. आपण ती कार्यशाळेत समाविष्ट करून घेऊ
यापुढील पत्रव्यवहार या पत्त्यावर करायचा आहे : kaaryashaalaa08@maayboli.com
मग करताय ना सुरुवात?
स्वरकाफिय
स्वरकाफिया
>>>>स्वर-काफिया मात्र 'बोलका', 'शांतता', 'केवढा' असा असेल. ह्यात शेवटच्या अक्षराचा 'आ' हा स्वर तेवढा सामाईक आहे.
हे आत्ता इथे चालणार नाहीये. पण एरवी असा प्रकार चालू शकतो का?
सुधिर, मराठ
सुधिर,
मराठीत स्वरकाफ़िया वापरलेला जास्ती पहाण्यात नाही... उर्दू, हिंदी मध्ये काही प्रमाणात अश्या गझल दिसतात.. पण शेवटी ती ही एक घेतलेली सूट आहे तेव्हा निदान शिकताना तरी ती घेऊ नये असे आम्हाला वाटते...
ज्या जाणकारांची गझलेच्या तंत्र आणि मंत्र ह्या दोन्हीवर चांगली हुकुमत आहे त्यांना कधी कधी ’स्वरकाफ़िया’ वापरलेला पाहिला आहे...
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
आधी
आधी कुठल्यातरी वृत्तामध्ये गझल पाठ्वायचं बंधन होतं ना..?
(म्हणजे मला तसं वाचल्याचं आठवतंय)..ते आता शिथिल केलंय का?
मलाही
मलाही 'स्वरकाफिया' विषयी विचारायचे होते. वरील संदेशांवरून मला जे समजले ते लिहितोय, कृपया चुकत असेल तर दुरुस्त करा.
'बो लका', 'शां तता', 'के वढा'
या काफियांमध्ये एकाही व्यंजनाचे यमक जुळत नाही. पण त्या व्यंजनांतून स्वर वेगळे काढले (लका : अआ, तता : अआ, वढा : अआ) तर ते स्वर यमक साधतात. म्हणून वरील उदाहरणे ही स्वरकाफियाची आहेत.
याउलट ती खालीलप्रमाणे असती -
'चालका ', 'हाल का', 'बालका'
- तर त्यातील 'लका' हा अक्षरसमूह व्यंजनांसह यमक साधतो, म्हणून हा शुद्ध (?) काफिया झाला.
दुसरे म्हणजे, वरील स्वरकाफियाच्या उदाहरणातील अलामत नक्की कोणती (ओ, आ, ए)? की 'अआ' हा स्वरकाफिया आणि 'अ' ही अलामत होते?
गजानन.. काफ
गजानन..
काफियाच्या न बदलणार्या शब्दा आधी जे स्वर-चिन्ह असेल ते अलामत...म्हणून मग ईथे 'अ' ही अलामत येईल..
बरोबर का??
गिरीश, या
गिरीश, या कार्यशाळेत आपण वृत्ताचं बंधन ठेवलेलं नाही.
(ते पहिल्या कार्यशाळेच्या दुव्यावर वाचलं असेल तुम्ही कदाचित.)
GD, स्वरकाफियाबद्दल तुम्ही जे लिहीलंय ते अगदी बरोबर आहे.
'चालका / बालका / हाल का' या उदाहरणांमध्ये 'लका' ही सामायिक अक्षरं. त्याआधीच्या अक्षरांमधला (चा/बा/हा) जो सामायिक स्वर ('आ'), ती झाली अलामत.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
धंन्यवाद म
धंन्यवाद
मी महीती म्हणूनच विचारलं होतं.बरीच नवी माहीती मिळत आहे.गझल मात्र अजून जुळत नाही.
कार्यशाळा
कार्यशाळा समिती, ५१ हा आकडा शुभ मानतात ना आपल्यामधे. तेंव्हा मग मला सामिल करून घ्या ना
कार्यशाळा,
कार्यशाळा, खुलाशाबद्दल धन्यवाद.
अरे बापरे,
अरे बापरे, हे भलतच दिस्तय! अजुनपर्यन्त इकडे लक्षच गेल नव्हत!
पण एकन्दरीत अवघडच वाट्टय हं!
आपल्याला बोवा इतरान्च वाचायला आवडेल!
...;
---------------------------------
जन्मत: यस्जीवर मी घुसलेलो
बाहेरची पाहिली वाट मी नाही
आपला, लिम्बुटिम्बु
बी, तुमचं
बी, तुमचं नाव नोंदवून घेत आहे. कार्यशाळेत सहभागी होणारे तुम्ही पंचावन्नावे सदस्य आहात.
लिंबूटिंबू, इतकंही अवघड नाहीये. प्रयत्न करून पाहणार का?
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
jo_s 'अजून
jo_s
'अजून जुळत नाही' म्हणता म्हणता 'जुळतंय' की..
पूर्ण
पूर्ण गझलेची कल्पना एकच हवी का?
******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.
नाही.
नाही. अजिबातच नाही.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
मी ई-मेल
मी ई-मेल पाठवली आहे. मिळाली का?
कार्यशाळेची दारं उघडी असल्यास मला (लेट फी भरून) प्रवेश मिळेल का?
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
हो हो.
हो हो. मिळाली.
तुमचं नाव नोंदवून घेतलं आहे, आणि तुम्हाला तशी मेल केल्ये.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
कार्यशाळा,
कार्यशाळा, इथली माहिती वाचून शिकता येतय! धन्यवाद! प्रयत्न जरुर करणारच!
फक्त या सेशन मधे सहभागी होता येत नाही (येत्या आठवड्यात आमची वार्षिक सर्वसाधारण सभा हे, त्याच्या कामात बुडलोय! )
पण तुमचेच चालुद्या, लक्ष आमुचे आहे
शब्दान्ची ओन्जळ, गुम्फली अजुन माळ नाही
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मी लिखाण
मी लिखाण सुधारून (याला गझल म्हणायची हिंमत होत नाहिये ) परत मेल केले आहे. अजून काहीतरी वेगळे वृत्त वापरुन लिहिले आहे तेही पाठवू का? (मी अजून काही पाठवून तुम्हाला छळतेय कि काय असे मला वाटतेय म्हणून विचारतेय कारण जे नविन लिहिलेय ते मलाच हेवी वाटतंय). पाठव म्हणालात तर पाठवते
कार्यशाळा
कार्यशाळा आणि त्यातील विद्यार्थी,
गजल मधील शेर, काफिया, रदीफ, अलामत हे जमून जात आहे पण खरी कसोटी वृत्तांचे अनुक्रम आणताना लावायची वेळ येत आहे. हा अनुक्रम प्रकार फारच त्रासदायक होतो आहे. आशय बाजूला राहतो आणि अक्षर्/शब्द बसविता बसविता नाकी नऊ येत आहेत.
बी, तू असे
बी, तू असे म्हणतोयस तर आमच्यासारख्या १ली फ मधल्या विद्यार्थिनीची काय कथा. पण स्वतःलाच लगे रहो म्हणायचं आणि लिहायचं (व सारखं सारखं खोडायचं). अरे त्या कार्यशाळा ची मला दया येतेय स्वतःचंच लिखाण पाहून
मला कुठे
मला कुठे खोडायचं हेही कळत नाहीये इतकी परिस्थिती दयणीय आहे.. पण सरावाने हा प्रश्न बहुतेक मिटेल असे दिसते आहे.
कार्यशाळा, ह्या पहिल्या दोन ओळी जरा तपासता का? ओढूनताणून वृत्तात बसविण्याचा प्रयत्न केला.
नयनी अश्रु उभे, हे दु:ख नाही
स्मरता गे तुज, तैसे सुख नाही
------------------------
न य नी अ |श्रु उ भे, हे |दु: ख ना ही
ल ल गा गा|ल ल गा गा| ल ल गा गा
स्म र ता गे| तु ज तैसे |सु ख ना ही
ल ल गा गा| ल ल गा गा| ल ल गा गा
वृत्त : ल ल गा गा
रदिफ : नाही
काफिया : दु:ख/सुख
अलामत आहे: उ
---------------
"अश्रु" आणि "दु:ख" या २ शब्दांचे लघु गुरु पाडताना माझा जरा गोंधळ झाला आहे.
ओके ओके,
ओके ओके, सापडल >>>>>....[अरेच्च्या? हे ल ल गा गा काय अस्ते? त्याच्या माहितीची लिन्क मिळेल काय?]
आता बघतोच ल ल गा गा
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अरे त्या
अरे त्या कार्यशाळा ची मला दया येतेय स्वतःचंच लिखाण पाहून >>>>
अगदी अगदी...
काही च्या काही गझल नावाचा सेक्शन पण काढायला पाहिजे.. म्हणजे मग विना संकोच पोस्टता येईल..
माझी
माझी मिळाली का मेल?
******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.
मधुरा, मेल
मधुरा, मेल मिळाली आहे. लवकरच उत्तर पाठवू तुम्हाला.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
अहो
अहो कार्यशाळा समिती, माझ्या ओळी तपासा ना कृपया.
बी, विसर्ग
बी, विसर्ग हा नेहमी गुरू असतो. त्यामुळे दु:ख हा शब्द 'गा ल' झाला, ल ल नव्हे.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
धन्यवाद
धन्यवाद का.शा.
अजून प्रयत्न करतो. तुम्ही २६ ही तारीख पुढे ढकलता का? निदान ३० तरी करा कारण काही विद्यार्थी आत्ताआत्ताशी सामिल झाले आहेत शाळेत.
मेललय .....
मेललय ..... बुंदी किंवा विटा पाडणं सोप्पं असणार सोडा
कार्यशाळा
कार्यशाळा संयोजक,
मी गझल पाठवली आहे.. त्यावर एक प्रतिक्रियाही मिळाली आहे, धन्यवाद.. कृपया त्या नंतरच्या माझ्या मेलला उतार द्याल का? मी काही बदल करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आणखी सविस्तर चर्चा झाली तर जास्त सोपे जाईल..
Pages