काळ्या मसाल्याची आमटी

Submitted by स्नेहश्री on 4 July, 2012 - 00:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आज मस्त पाऊस पडत आहे.
काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.
पाऊस घरात Njoy करणार्‍यांसाठी ही आमच्या काकुच्या गावची बुरंबाड- कोकणातील खास पाककृती.

साहित्यः-
शिजवलेली डाळ.. (कोणतीही.. हरभरा, तुर, मुग, मसुर.. तुमच्या आवडीप्रमाणे)
१ कांदा भाजुन.. मी गॅसवर भाजते (चुल असल्यास उत्तम)
फोडणी चे साहित्य..(तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद).
मीठ
काळ्या मसाल्यासठी:-
१+१/२ चमचा बडीशोप
६/७ मिरीचे दाणे
१ चमचा खसखस
४/५ लवंगा
१ इंच दालचिनी
तमालपतत्राच १ पान

मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.
व एकत्र पुड करावी.
इतरः
पहिल्या वाफेचा भात.. शक्यतो पटणी/ लाल तांदुळाचा वा आंबेमोहोराचा.

क्रमवार पाककृती: 

१) कांदा भाजुन मिक्सर मध्ये बारिक करुन घ्यावा. जिरे, मोहोरीची फोडणी करुन प्रथम त्यात बारीक केलेला कांदा घालावा.
२) नंतर वरुन डाळ घालावी
३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.
४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि छान उकळी काढवी.
५) धुवांधार पाऊस, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम आमटी......वा!!!!! क्या बात है...!!!!

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.. साधाराण ४ जणांना
अधिक टिपा: 

कोरडे मसाले मी भाजुन ठेवते. व पुड करुन ठेवते.. आयत्या वेळेला पुड परत मिक्सर मधुन फिरवयची म्हणजे ताज्या मसाल्याचा फील येतो.

माहितीचा स्रोत: 
मंगलाकाकु..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केली या पद्धतीने आमटी. मस्त चव आली होती. आमटीमधे मी शेवग्याच्या शेंगा पण घातल्या होत्या.

सोप्या रेसिपीसाठी धन्यवाद. Happy

गॅसवर कांदा भाजायचा एक सोपा उपाय सांगतो. घरी जर एखादे माहिती मडके वा पात्र असेल तर त्याला गॅसवर ठेवायचे. पाच मिनिटात मडके वा पात्र गरज होते. मग त्यामधे कांदा ठेवून झाकण बंद करुन घ्यावे. कांदा मऊ भाजल्या जातो.

नंदिनी वेलकम
.. बी.. तो गोडा मसाला नाही आहे ग/ रे. तो गरम/ताजा मसाला आहे. मसाला भाजल्यामुळे रंग काळा येतो म्हणुन काळ्या मसाल्याची आमटी म्हणतात.

कुठल्याही आमटीत्/ भाजीत गूळ घालून त्याची मूळ झनझणीत चव बिघडविण्याची ही पुणेरी पद्धत कधी बन्द होणार आहे कुणास ठाऊक? आणि टोमॅटो देखील. ह्या टोमॅटो घालण्याच्या पद्धतीवर तर कविवर्य सुरेश भटांनी टीका करणारा एक आख्खा लेखच लिहिला होता...

कुठल्याही आमटीत्/ भाजीत गूळ घालून त्याची मूळ झनझणीत चव बिघडविण्याची ही पुणेरी पद्धत कधी बन्द होणार आहे कुणास ठाऊक? आणि टोमॅटो देखील. ह्या टोमॅटो घालण्याच्या पद्धतीवर तर कविवर्य सुरेश भटांनी टीका करणारा एक आख्खा लेखच लिहिला होता...>>>>>>>>>>>>>> गुळ आणि टोमॅटो कुठे आहे?

काळ्या मसाल्यात कारळे पण घालतात ना? >>>>> ????? आम्ही नाही घालत..

Pages