उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ३ : एम.जी.रोड...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...
आम्ही गंगटोक स्थलदर्शनमध्ये आज २ मॉनेस्ट्री पाहणार होतो. एक शहराच्या अगदी जवळच असलेली जोरगाँग आणि दुसरी दक्षिण सिक्किम मधील रुमटेक. ह्या दोन्ही मॉनेस्ट्रींबद्दल थोडीफार माहिती आणि फोटो.
प्रचि १ :
प्रचि २ :
गंगटोकच्या ईंदिरा गांधी बायपास रोडवरुन गणेशटोककडे जाण्याच्या वाटेवरच जोरगाँग मॉनेस्ट्री आहे. आकाराने लहान असली तरी प्रथम दर्शनी 'रुप मनोहर' उठुन दिसते. आकर्षक रंगसंगतींमध्ये सजवलेल्या दारं-खिडक्या आणि कमानी हे तिबेटियन संस्कृतीत सर्वत्र दिसते. तिबेटचे १४ वे दलाई लामा यांनी खुद्द २१ वर्षांपुर्वी या मॉनेस्ट्रीची मुहुर्तमेढ रोवली होती.
प्रचि ३ :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
आतमध्ये प्रवेश केल्यावर लक्ष्यात आले की रंगकाम सुरु आहे. बुद्धमुर्ती देखील नव्याने बनवण्यात येत होती. या खेरिज आतमध्ये खेंपो बोधीसत्व, गुरु पद्मसंभव आणि चोग्याल त्रायसाँग यांच्या मुर्ती आहेत.
प्रचि ७ :
प्रचि ८ :
धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांनी ८ व्या शतकात भारतात अनेक तिबेटी तरुण पाठवुन बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक संतांना तिबेट मध्ये बोलावणे धाडले होते. पुढे त्यांनी तिबेटमध्ये 'सम्ये' बुद्ध विद्यापिठाची स्थापना केली जिथे बुद्ध धर्मावरील सर्व लिखाण संस्कृत मधुन तिबेटियन भाषेत भाषांतरीत केले गेले.
प्रचि ९ :
खेंपो बोधीसत्व हे धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन भारतातुन तिबेटमध्ये गेलेले पहिले बुद्ध संत होते. त्यांनी तिबेटमधील भिक्षुंमध्ये सुरु केलेली 'विनय परंपरा' आजही तिबेटसह सिक्किम, नेपाळ आणि भुतानमध्ये सुरु आहे.
प्रचि १० :
गुरु पद्मसंभव हे भारतातील ८व्या शतकात होउन गेलेले एक थोर बुद्ध संत होते. तिबेट मधील धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन ते तिबेट मध्ये गेले आणि तिथे त्यांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला. ते तंत्र विद्येचे देखील जाणकार होते. पुढे ते नेपाळ, सिक्किम आणि भुतान येथे गेले आणि या प्रदेशांत त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.
प्रचि ११ :
या तीन धर्मगुरुंना 'खें - लोप - चो - सम' असे संबोधले जाते.
खें - खेंपो बोधीसत्व,
लोप - गुरु पद्मसंभव
आणि
चो - चोग्याल त्रायसाँग.
प्रचि १२ :
प्रचि १३ :
*****************************************************************************************************************
रुमटेक मॉनेस्ट्री ही गंगटोक वरुन १४ किलोमिटर अंतरावर आहे. बुद्ध महायान पंथात एकुण ४ उपशाखा आहेत. त्यातील एक आहे काग्यु. या काग्यु महायनाचे एकुण ३०० बुद्ध मठ संपुर्ण जगात असुन त्याचे मुख्यालय म्हणजे ही रुमटेक मॉनेस्ट्री होय. या काग्युचे १६ वे धर्मगुरु गॅल्वा करमाप्पा यांचे वास्तव्य येथेच असते त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था आहे. गाडी घेउन आत जाणे अशक्य. चालत जेवढा रस्ता पार करावा लागतो त्याच्या डाव्या बाजुला एका रांगेत हजारो प्रेयर व्हील्स लावलेली आहेत. मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये फोटो घेता येत नाहीत. बाहेरुन घ्यायला हरकत नाही.
प्रचि १४ :
प्रचि १५ :
आम्ही आत जाणार इतक्यात एका सिक्किमिज गाईडने मला 'माहिती हवी का?' असे चक्क मराठीत विचारले. पहिले २ सेकंद मला कळलेच नाही पण मग लक्षात आले की अरे हा तर चक्क मराठीत बोलतोय. आम्ही त्याला गाईड म्हणुन सोबत घेतले. त्याने आम्हाला बहुतेक माहिती मराठीतुन दिली. काही इंग्रजी-हिंदी मधुन. महाराष्ट्रातुन दरवर्षी इतके पर्यटक सिक्किमला जातात की त्याने मराठी शिकुन घेतली असावी. हे नक्कीच सुखावणारे होते.
प्रचि १६ :
प्रचि १७ :
प्रचि १८ :
तिथे पोचलो तेंव्हा ४ वाजुन गेले होते आणि ५ नंतर इथे कोणालाही प्रवेश नसतो. इथे दिक्षा घेणारे सर्व भिक्षु प्रश्न-उत्तराचा खेळ खेळत होते.
प्रचि १९ :
मॉनेस्ट्रीच्या भिंतींवर अनेक चित्रे रंगवलेली आहेत. खालील ४ चित्रे ही मॉनेस्ट्रीची रक्षा करणार्या द्वारपालांची आहेत. सर्वात शेवटी आहेत आपले बाप्पा. बुद्ध संस्कृतीत गणपतीचे उल्लेख कुठे कुठे येतात ते ठावुक नाही पण असे चित्र लेहच्या अल्ची मॉनेस्ट्रीमध्ये देखील पाहिल्याचे स्मरते.
प्रचि २० :
प्रचि २१ :
प्रचि २२ :
प्रचि २३ :
प्रचि २४ :उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ६ : उर्वरित गंगटोक...
आत्ता नुसती प्रचीच पाहिली
आत्ता नुसती प्रचीच पाहिली आहेत. जब्बरदस्स्त्तच
व्वा
मस्त रे. सुरेख माहिती. प्रचि
मस्त रे. सुरेख माहिती.
प्रचि ६ मस्तच.
ते प्रचि १२ आणि १३ काय आहे? छाता वरचे रंगकाम आहे की भिंती वरचे??
रच्याकने - मॉनेस्ट्री ला मराठी शब्द काय असु शकेल??? बुध्द विहार का??
मस्त रे सेना सुंदर प्रचि आणि
मस्त रे सेना सुंदर प्रचि आणि माहीती
रच्याकने ते प्रचि ४ ( सुंदर रंग आहेत) काय आहे.
मस्तच रे..
मस्तच रे..
मस्त.... बाप्पा आम्हाला
मस्त....
बाप्पा आम्हाला श्रीलंकेत सुद्धा दिसले होते.
मस्तच
मस्तच
सुंदर प्रचि रे!! रंग किती छान
सुंदर प्रचि रे!! रंग किती छान आहेत ब्राईट.. कोणत्या प्रकारचे रंग वापरले असतील चित्रं रंगवताना कोण जाणे!!
मस्त माहिती.. मराठी बोलणारा गाईड.. वॉव!!!
प्रचि १२ मधे 'कालचक्र मंडल' आहे ?
मॉनेस्ट्री ला मराठी शब्द काय
मॉनेस्ट्री ला मराठी शब्द काय असु शकेल???
मठ. हा कोणाचाही असु शकतो, फक्त बुद्धांचाच असा नाही.
सेनापती, अतिशय छान फोटो आहेत.
मला भारताच्या वरच्या टोकावरच्या भागातले फोटो खुप आवडतात. आकाश अतिशय स्वच्छ निळे असते, हवा मस्त कुरकुरीत असते आणि त्या निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभुमीवर लाल, पिवळा, भगवा आणि शाईचा निळा हे रंग प्रामुख्याने नाचत असतात. खुप फ्रेश लुक आहे हा सगळ्याचा.
मस्त रे..
मस्त रे..
मस्त रे
मस्त रे
सर्वांना धन्यवाद...
सर्वांना धन्यवाद...
गंधर्वा.. ते छतावरील रंगकाम आहे. मॉनेस्ट्री म्हणजे मठ. मग तो कुठल्याही पंथाचा असु शकेल.
नितिन.. ते दरवाजाच्या कडीला बांधलेले रंगीत रुमाल आहेत.
वर्षु... ते काय अहे ते ठावुक नाही. पण तिथे माहिती सांगणारे कोणी नव्हते. रंगकाम करणारे इतके मग्न होउन काम करत होते की त्यांना त्रास द्यावा वाटला नाही.
मस्त.
मस्त.
काय सुंदर प्रचि आहेत! डोळे
काय सुंदर प्रचि आहेत! डोळे तृप्त झाले!
मी, नवरा आणि लेक मे महिन्यात ह्याच भागात फिरून आलो. सिक्कीममध्ये मागच्या वर्षी कैलास-मानसच्या सफरीत बघितलेल्या तिबेटी मंदिरांची खूप आठवण येत होती. फरक इतकाच की तिथे ‘दलाई लामा’ हा शब्दही वर्ज्य आहे. इथे त्यांचे आस्तित्व जाणवत होते.
तिथल्या तिबेटी वाहन चालकांना ‘मी मागच्या वर्षी तिबेटला जाऊन आले’ अस सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटल. दलाई लामांबद्दल उल्लेख ‘हिज होलीनेस’ ह्या प्रत्ययाशिवाय कधीही होत नव्हता. एक चालक ‘हमे अगर आजादी मिलेगी एक दिन, तो हम भी हमारा तिबेट देखेंगे,’ अस म्हटल्यावर सगळ्या निर्वासीतांबद्दल वाईट वाटल.
दलाई लामांबद्दल उल्लेख ‘हिज
दलाई लामांबद्दल उल्लेख ‘हिज होलीनेस’ ह्या प्रत्ययाशिवाय कधीही होत नव्हता.
लिहिता-बोलता हिज होलीनेस असेच म्हणतात ते. वरच्या पाटीत पण तसच लिहिलयं बघ. 
>>> होय अनया.
ऑक्टोबर महिन्यात रुमटेक येथे एक डान्स फेस्ट असतो त्याला प्रमुख पाहुणे म्हणुन दरवर्षी दलाई लामा येतात.
मस्त फोटोस आणि वर्णन
मस्त फोटोस आणि वर्णन
सुरेख.... खुप पवित्र वाटतं
सुरेख.... खुप पवित्र वाटतं तिकडे.... रंगसंगती पण मस्त....
सेनापती, अतिशय छान फोटो आणि
सेनापती, अतिशय छान फोटो आणि माहीती
मस्त!
मस्त!
सुंदर. आधीचे भाग वाचायचे
सुंदर.
आधीचे भाग वाचायचे राहिलेत, माझे.
सेना.... पुढचा भग कधी
सेना.... पुढचा भग कधी टाकतोस???
खंडीत झालेली मालिका पुन्हा
खंडीत झालेली मालिका पुन्हा सुरु केली आहे.
सर्व प्रचि खूपच छान.
सर्व प्रचि खूपच छान.
सुरेख फोटो आणि माहिती
सुरेख फोटो आणि माहिती