चिव चिव चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2012 - 01:32

चिव चिव चिमणी

चिव चिव चिमणी गाते गान
मजेत नाचत छानच छान

पंख छोटेसे हलवून
दाणे टिपते वाकून वाकून

चिऊतै चिऊतै अशाच या
दाणे खा, पाणी प्या

चिवचिव चिवचिव चिवचिवाट
रोज पाहू तुमची वाट...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

sparrow.jpg

Save sparrow अभियानासारखा अंतःस्वर आहे या बालगीताच्या आत,तो मोठ्यांसाठी.

क्यूट कविता Happy

झब्बू:

चिव चिव चिमणी
गाते गाणी..

लागता तहान
होई हैराण,
शोधे कोठे
मिळेल पाणी?
दिसता थोडे
आनंदाने उडे
पिता पाणी
दिसते राणी...

चिव चिव चिमणी
गाते गाणी..

माझा इवलासा झब्बू... मी रोज सकाळी ऑफिसला निघताना वाटीभर पाणी ठेवते गॅलरीच्या कट्ट्यावर... इवल्या इवल्या तहानलेल्या चिऊताई येतात, पाणी पिऊन हूशारी आली की उडून जातात... त्या इवल्या पाखरांसाठीचा झब्बू हा, शशांक Happy

मस्त! पूर्वी कित्तीतरी चिमण्या आपल्या आजूबाजूला बागडत असायच्या, पण आता फारश्या दिसत नाहीत..
Sad

मी तर चुकून माकून दिसलेल्या चिमणीकडेही हल्ली फार अप्रूपाने आणि भान हरखूनच पाहाते! Happy

बागेश्री - सुरेख झब्बू.......
सर्वांचे मनापासून आभार.......