Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2012 - 01:32
चिव चिव चिमणी
चिव चिव चिमणी गाते गान
मजेत नाचत छानच छान
पंख छोटेसे हलवून
दाणे टिपते वाकून वाकून
चिऊतै चिऊतै अशाच या
दाणे खा, पाणी प्या
चिवचिव चिवचिव चिवचिवाट
रोज पाहू तुमची वाट...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
Save sparrow अभियानासारखा
Save sparrow अभियानासारखा अंतःस्वर आहे या बालगीताच्या आत,तो मोठ्यांसाठी.
वा भारतीताई, किती छान फोटो
वा भारतीताई, किती छान फोटो टाकलाय या चिमणरावांचा... (मा बो वरच्या आय डीचा नाही हां...;)
)
क्यूट कविता झब्बू: चिव चिव
क्यूट कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झब्बू:
चिव चिव चिमणी
गाते गाणी..
लागता तहान
होई हैराण,
शोधे कोठे
मिळेल पाणी?
दिसता थोडे
आनंदाने उडे
पिता पाणी
दिसते राणी...
चिव चिव चिमणी
गाते गाणी..
माझा इवलासा झब्बू... मी रोज सकाळी ऑफिसला निघताना वाटीभर पाणी ठेवते गॅलरीच्या कट्ट्यावर... इवल्या इवल्या तहानलेल्या चिऊताई येतात, पाणी पिऊन हूशारी आली की उडून जातात... त्या इवल्या पाखरांसाठीचा झब्बू हा, शशांक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त! पूर्वी कित्तीतरी
मस्त! पूर्वी कित्तीतरी चिमण्या आपल्या आजूबाजूला बागडत असायच्या, पण आता फारश्या दिसत नाहीत..
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी तर चुकून माकून दिसलेल्या चिमणीकडेही हल्ली फार अप्रूपाने आणि भान हरखूनच पाहाते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागेश्री - सुरेख
बागेश्री - सुरेख झब्बू.......
सर्वांचे मनापासून आभार.......