इथे बच्चेकंपनींना करता येण्याजोग्या पाककृती, टीप्स, आयडियाज इथे शेअर करू या
सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:
स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:
१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.
५. कुकटॉप वरुन भांडे उतरवताना/ ओव्हनमधुन केक काढताना/ मायक्रोवेव्ह मधुन बोल काढताना आई/बाबाची मदत घ्यावी.
६. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन - अर्धे लक्ष इथे अर्धे टीव्ही वर चालु असलेल्या कार्यक्रमात असे नको - अॅक्सिडंट्स होण्याची शक्यता जास्त.
७. आई/बाबांना आपल्यापेक्षा थोडे जास्त कळते आणि जास्त अनुभव आहे तेव्हा त्यांचे ऐकावे
स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सच्या मोठ्या असिस्टंट्सनी (अर्थात आई/बाबांनी) घ्यायची काळजी:
१. मुलं स्वयंपाकप्रयोगात बिझी असताना त्यांना स्वयंपाकघरात अजिबात एकटे सोडु नका...
स्वत: आपल्या हाताने केलेला पदार्थ खाण्यात आणि खिलवण्यात आगळीच मजा आहे तेव्हा यंग शेफ्स, बी अलर्ट, बी सेफ आणि एंजॉय!!!
हॅप्पी कुकिंग
माबो ज्युनिअर शेफ्स - पाककृती:
१. माबो ज्युनिअर शेफ्स १ - जस्ट स्टर अँड बेक, चॉकलेट केक - लाजो
कॅरॅमल
कॅरॅमल टोस्ट
http://www.maayboli.com/node/42625
मस्त धागा माझ्या सारख्या
मस्त धागा
माझ्या सारख्या लहानग्याना खूप उपयोग होणार आहे याचा
आता मज्जाच् मज्जा
धन्स लाजोआज्जी धन्स !!
न्यू यॉर्क टाइम्सच्या मार्क
न्यू यॉर्क टाइम्सच्या मार्क बिटमन यांनी चॉप चॉप या मुलांकरता असलेल्या रेसिपी / कुकिंग मॅगझिन बद्दल लिहिलेला लेख
http://opinionator.blogs.nytimes.com/2013/05/07/kitchen-little/?src=me&r...
आणि ही त्या मासिकाची लिंक
http://www.chopchopmag.org/
धन्यवाद मेधा.
धन्यवाद मेधा.
Pages