"सत्यमेव जयते" भाग ७ (Danger At Home)

Submitted by आनंदयात्री on 17 June, 2012 - 00:18

आज, १७ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघते आहे. अजून एक उत्तम विषय. फक्त पुरुष प्रेक्षक घेउन विषयाची गंभीरता आणि मूळ दाखवायचा प्रयत्न आवडला. आमच्या इथे अमेरिकेत सुद्धा हा एक भेडसावणारा प्रश्न आहे!

किरण
नवरे मंडळीच नाही, संपूर्ण पुरुष जातीला.

दुसरी गोष्ट हा फक्त भारतापुरता सीमित नाही्आ वैश्विक आहे व यामुळे त्या कमलाताईनी म्हटलेले पितृसत्ताक संस्कृती म्हणून जे विश्लेषण फक्त भारता पुरते नाही.
दुसरी गोष्ट मातृसत्ताक समाज केरळमध्ये असूनही तेथे देखील ही समस्या आहे.
मला ही समस्या मध्यम वर्गीय परिवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे हे खरेच माहित नव्हते

चांगला विषय होता. पण तरीही जरा वरवर हाताळला गेला असं वाटलं. पुरुषांची उपस्थिती जास्त होती पण त्यांना बोलायला वाव कमी दिला. श्री पवार खुपच छान बोलले. त्या महिलांकरता काम करणार्‍या वयस्क महिला (नाव विसरले) अप्रतिम बोलल्या आणि त्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले.

ज्या पुरुषांच्या "मी बायकोला अमुक तमुक कारणांनी मारतो" अश्या विधानांच्या क्लिपस दाखवल्या गेल्या त्या एका ठराविक आर्थिक स्थितीतल्या होत्या. पण डो. व्हा. हा सगळ्या आर्थिक स्थितीतील घरांमध्ये तितकाच पसरलेला असतो. हा मुद्दा मागे राहिला. शिकल्यासवरलेल्या पुरूषांचीसुद्धा याबाबतीतली मानसिकता अधोरेखित करायला हवी होती.

डो.व्हा. करता सरकारनं राबवलेल्या योजना आणि त्यांचे हेल्पलाईन नंबर्स यांचा ठळक उल्लेख करायला हवा होता.

डो. व्हा. मधला महत्त्वाचा पण मांडायला कठीण असा 'मानसिक छळ / कुचंबणा' हा विषयही अर्धवट हाताळला गेला. बायकोवर बंधनं घालणे, शेजार्‍यांशी बोलू न देणे इ. गोष्टीही सहन करण्याची गरज नाही हे ठासून सांगितलं गेलं नाही. एक व्यक्ती म्हणून आपली कोणत्याही प्रकारची घुसमट न होऊ देणे हे प्रत्येक स्त्रीला कळायला हवं आणि कळत नसेल तर तिच्यापर्यंत ते पोहोचवलं जायलाच हवं.

शिवाय अमिर दरवेळी एक मुस्लिम व्यक्ती अतिशय पॉझिटिव्ह लाईटमध्ये दाखवतो असं वाटतं. त्यांच्याशी बोलताना जरा जास्तच उर्दु शब्द वापरून बोलतो. का बरं? इतरांनी इंग्लिशमध्ये दिलेली उत्तरं तो हिंदीत भाषांतर करून बोलतो कारण भारतातल्या खेड्यापाड्यातही कळलं पाहिजे. मग हे उर्दु शब्द वापरण्याची काय गरज? सलाम कुबुल किजीये, मुस्लिम स्रीला आपा म्हणून संबोधणे अशा गोष्टी खटकतात. तो स्वत: मुस्लिम आहे हे कबुल पण इथे त्याने त्यापेक्षा वरच्या पातळीवर जाऊन कार्यक्रम कंडक्ट करायला हवा. हे प्रकार जरा जास्तच हिशेबी वाटायला लागलेत. पुढे मागे त्याचा पॉलिटिक्समध्ये शिरायचा विचार आहे की काय? Proud

मला ती शेवटची गाणी भारी इरिटेट करायला लागली आहेत. प्रत्येकवेळी त्या त्या विषयावरची घोगर्‍या आवाजाच्या बायकांनी म्हटलेली मेड टू ऑर्डर गाणी फारच क्लिशे वाटतात.

मामी, मलाही अर्धवट वाटला भाग. नवरा बायको सोडून इतर नात्यातला व्हायोलंस दाखवला नाही. मानसिक छळ दाखवला नाही. पण भाग आवडला.
मुस्लिम व्यक्ती आणि गाण्याबद्दलचे पटले नाही.

कमलाबाईंच्या बोलण्यातील ओळ न ओळ पटली, विशेषतः स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री सत्ता नव्हे हे.
अजूनही बरंच लिहायचंय.
तस्साही माबोवर आखाडा होईलच यावेळी Wink

मानसिक छळ, कुचंबणा बाबत +१ मामी. विषय मागे जरी राहिला तरी मला वाटतं गांभीर्याच्या स्केल मध्ये मारहाण/हिंसेचा नंबर वर लागेल त्यामुळे हातात असलेल्या वेळामध्ये तोच जास्त कवर केला असं म्हणता येइल.

त्याचा थोडाफार मुसलमान लोकांना पॉजिटिव लाईट मध्ये दाखवणे हा छुपा अजेंडा आहे असं गृहित जरी धरलं तरी तो व्यासपिठावर आणत असलेले विषय आणि त्यामुळे लोकांच्या मनांवर, विचारधारेवर होणारा परिणाम हा खुप जास्त महत्वाचा आहे. उद्या हे विषय कोणी मांडलेच नसते तर काय झालं असतं?

@ मामी - अनुमोदन
अधिक माहितीसाठी - श्री. आनंद पवार गेले १०-१५ वर्षं जेण्डर इश्यूज संबंधित काम करताहेत.

वरदा, तुमची पोस्ट माझ्या पोस्टीला उद्देशून आहे का?

असली तर. आनंद पवार अर्थातच अतिशय महत्वाचे काम करत आहेत पण त्या मागचे विचार किंवा ते नेमकं काय करतायत हे किती लोकांना ठाऊक आहे? आझाद फाऊंडेशन किंवा एस पींनी येऊन दिलेली शेल्टर किंवा स्पे> ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटांबद्द्लची माहिती अशी कित्येक लोकांना होती.

त्याच्या सेलेब्रिटी स्टॅटसमुळे त्याची reach/पोहोच(?) खुप लांब आहे आणि त्यामुळे कार्यक्रम खुपच परिणामकारक आहे.

नाही तुम्हाला उद्देशून नव्हती वैद्यबुवा Happy
सकाळी लिहिलेली पोस्ट उडली म्हणून परत टाकलेली...

तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. मला पवारांचं काम माहित आहे एवढंच. अशी कामे करणार्‍या अनेक संस्था भारतभर पसरलेल्या आहेत. पण या कार्यक्रमामुळे हे विषय लोकांपर्यंत अधिक परिणामकारकरीत्या पोचताहेत हे अगदी खरं. सगळ्यांनाच हे विषय माहित असतात पण मुळात हे गंभीर सामाजिक दोष आहेत हे वाटत नाही. माबोवरच याचं अगदी ढळढळीत प्रतिनिधित्व तुम्ही पाहिलं असेलच.
पण असं असूनही मला स्वतःला आमीरचं सादरीकरण आज वरवरचं आणि प्रीटेन्शस वाटलं. अर्थात ते कसंही असलं तरी लोकांपर्यंत या विषयांची आच जाणं महत्वाचं.
फक्त भीती एवढीच की हा कार्यक्रम संपल्यावर समाजाने नेहेमीप्रमाणे हे सगळं विसरून जाऊ नये......

मामी + भान + नंद्या + नीधप + भुंगा >>>>>+ धनश्री.

मला गेल्या २-३ भागात या मुस्लिम पॉझिटिव्हिटीबद्दल लिहावेसे वाटत होते. पण माबो वर चर्चा कुठून कुठे जाईल काही नेम नाही. पण आमिर या समाजाबद्दल जरा वेगळा वागतो हे नक्की.

रच्याकने, मला प्रिया तेंडुलकरांची 'सॉरी फॉर द लास्ट नाईट' आठवत होती हा भाग पहाताना. काय जबरदस्त परिणामकारक कथा आहे ती....

वरदा, आलं लक्षात. Happy

फक्त भीती एवढीच की हा कार्यक्रम संपल्यावर समाजाने नेहेमीप्रमाणे हे सगळं विसरून जाऊ नये......>>>> +१ शेवटी आपली जवाबदारी ओळखून आपण लोकांनी स्वतः स्वत:च्या विचारसरणीत बदल करुन घ्यायला हवा. कमीत कमी जे ऐकायला तयार आहेत त्यांच्या कानावर हे सगळे पडतेय हे ही आजिबातच नसे थोडके.
मुलगी, बाई, बायको ह्यांच्याशी कसं वागायचं ह्याबद्दल निरपेक्ष मार्गदर्शनच कुठे आहे कुठल्याच समाजात?

रेव्यु,

हीच ती पुरुषी प्रवृत्ती>>
काय हो, मराठी शुद्धलेखनाचा वा डायलेक्टचा(मराठी प्रतिशब्द?) वा लेखणचुक (टयपो) चा आणि
" हीच ती पुरुषी प्रवृत्ती" याचा काय संबंध.
उगी खोडया काढायची सवय दुसरं काय.

Well, मुस्लिम व्यक्ती दिसतात प्रत्येक एपिसोड मधे , आमिर त्यांच्याशी 'आपा' म्हणून आपुलकीने बोलतो हे खरं आहे पण मी तरीही आमिर ला बेनिफिट ऑफ डाउट द्यायला तयार आहे.
कारण कदाचित प्रत्येक एपिसोड मधे हिन्दु-मुस्लिम-सीख अशा सर्व धर्म केसेस कव्हर झाल्याच पाहिजेत असाही एक क्रायटेरिआ ठरवला असेल कदाचित, माझ्या साठी तरी इट्स ओके जोवर शो प्रामाणिक दिसतोय, मुस्लिम ''फक्त चांगले असा संदेश दिला जात नाहीये , जोवर इतर काही रिअ‍ॅलिटी शोज सारखा भावनांचा बाजार मांडला जात नाहीये !
मुस्लिम केसेस आल्या कि आपल पटकन लक्ष जातं, त्यात आमिर मुस्लिम आहे म्हणून पण तो फक्त मुस्लिम च केसेस दाखवतोय का ? तो धर्म प्रचार करतोय का ?
जर अन्याय झालेल्या (व्हिक्टिम) मुस्लिम स्त्रिया शोज मधे आल्यायेत म्हणजे अन्याय करणारे पण मुस्लिम आहेत हे पण ऑबव्हियस नाही का (फक्त लव्ह मॅरेज एपिसोड मधली मुलाला गमावणारी आई, भिवंडीचा प्रगत मुस्लिम समाज सोडून इतर केसेस मधे मुस्लिम स्त्रियांना छळणारेही तिचे फॅमिली मेंबर्स पण मुस्लिम च होते याचह उल्लेखही झालाय ) म्हणजे मुस्लिम सगळे चांगले असा संदेश कुठे जात नाहीये !
पण खरच इट्स ओके, जर समाजात १% जरी बदल घडवायची ताकद असेल शो मधे तर मी बेनिफिट ऑफ डाउट द्यायला तयार आहे( मी स्वतः समाजासाठी काही फार करत नाहीये, अशा वेळी एखादी व्यक्ती करत असेल, अगदी १% जरी प्रयत्न करत असेल तरी मला कौतुक वाटतं, मग ते कुठल्याही धर्मा साठी का करत असेना.)
बाकी आमिर नेता बनणार माझ्याही मनात आलं होतं, मागे आण्णा हजारेंना सपोर्ट करत होता, अता हा यशस्वी शो, परवा गांधीजींची स्तुति आणि गांधीवादाचं महत्व सांगत होता :). , अर्थात नेता झाला तरी मला त्यातही काही गैर वाटत नाही :), एक प्रतिष्ठित भारतीय नागरिक, त्यात समाज सेवेचा प्रामाणिक प्रयत्न करणारी व्यक्ती नेता झाली तर काय हरकत आहे Happy ?
असो, पण परवाचा एपिसोड मलाही वर वर चा वाटला या बद्दल सगळ्यांना अनुमोदन !
फक्त स्त्रियांवरचाच अन्याय वर फोकस होता.
अ‍ॅक्चुअली अत्ता पर्यंत दाखवलेले "स्त्री भृण हत्या, हुंडा, डोमेस्टिक व्हॉयलेन्स" हे सगळे सब्जेक्ट्स बर्‍या पैकी एकमेकांशी रिलेटेड आहेत, ते एपिसोड पण एका मागोमाग एक दाखवायला हवे होते असं वाटलं.

आमिर अन त्याची टीम जाणून बुजून मुसलमानांना + लाईट मध्ये दाखवत आहेत ही स्वागतार्ह्य बाब आहे. मुख्य प्रवाहामध्ये सामिल होण्यासाठी मुसलमानांच्या चांगल्या बाजू समोर येणे पण आवश्यक आहे. त्या धर्मातील निगेटिव्हिटी सर्वानां चांगलीच माहिती आहे पण + बाजू साठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शन्नो सारख्या मुसलमान स्त्रियांना खरेतर ज्या आझाद मंडळाने मदत केली त्याच्या चालिका ह्या हिंदू आहेत हे इथे विसरले गेले. (येथील प्रतिसादकांकडून). हां लग्नाच्या एपिसोड मध्ये महाराष्ट्रात अनेक सामुहिक विवाह गेले अनेक दशके होत आहेत हे मात्र नमुद करायला हवे. पण दॅट्स ओके.

अश्या हजारो शन्नो निर्मान होण्याची त्यांचा समाजातही तेवढीच गरज आहे, जेवढी आपल्या. शेवटी दोघांचेही प्रॉब्लेम एकच आहे पण त्याच्या समाजात आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला तो मुसलमानी + गोष्टी दाखवतो ते जास्त आवडते कारण आज पर्यंत कोणी असा ठळक प्रयत्न केल्याचे जाणवत नाही व हळू हळू का होईना, अरे ते अन आपण, दोघांनाही सारखेच प्रॉब्लेम आहेत, दोघेही सारख्याच लढाया लढत आहोत हे कुठेतरी रजिस्टर होते. ते महत्वाचे आहे..

आणि एपिसोड मध्ये हिंदू + गोष्टी पण असतातच की. ह्या एपिसोड बाबत आपण जात धर्म सोडून गोष्टी पाहिल्या पाहिजेत असे मला व्यक्ती म्हणून वाटते. त्यांच्याशी उर्दूतून बोलन्याच्या मुद्द्याला थोडेफार अनुमोदन पण व्यक्तीशः मला अजिबात खटकले नाही.

कमला ह्यांचे सर्व म्हणने पटले पण त्या पितृसत्ताक वर जोर धरून होत्या ते पटले नाही. भारत सोडला तर पित्तृसत्ताक पद्धती सर्व देशात आहे का? नसेल तर मग तरीही अमेरिकेतदेखील घरगुती हिंसाचार का जास्त आहे? इथे तर मुलींचे सोशल कंडिशनींग पण नाही की, 'तुला सासरचेच ऐकायचे, तेच तुझे घर' वगैरे पण तरीही हिंसाचार आहेच.

देश कोणताही असो हिंसाचार आहे हेच खरे.

आमिरने एक एपिसोड युनिफॉर्म सिव्हिल कोड वर पण करायला पाहिजे. एका एपिसोड मध्ये एक मुसलमान तरूणी, एक देश एक कायदा असे बोलली ते ऐकून फार बरे वाटले होते. (लग्नाच्या बहुदा)

शन्नो सारख्या मुसलमान स्त्रियांना खरेतर ज्या आझाद मंडळाने मदत केली त्याच्या चालिका ह्या हिंदू आहेत हे इथे विसरले गेले. (येथील प्रतिसादकांकडून). हां लग्नाच्या एपिसोड मध्ये महाराष्ट्रात अनेक सामुहिक विवाह गेले अनेक दशके होत आहेत हे मात्र नमुद करायला हवे. पण दॅट्स ओके.

अश्या हजारो शन्नो निर्मान होण्याची त्यांचा समाजातही तेवढीच गरज आहे, जेवढी आपल्या. शेवटी दोघांचेही प्रॉब्लेम एकच आहे पण त्याच्या समाजात आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला तो मुसलमानी + गोष्टी दाखवतो ते जास्त आवडते कारण आज पर्यंत कोणी असा ठळक प्रयत्न केल्याचे जाणवत नाही व हळू हळू का होईना, अरे ते अन आपण, दोघांनाही सारखेच प्रॉब्लेम आहेत, दोघेही सारख्याच लढाया लढत आहोत हे कुठेतरी रजिस्टर होते. ते महत्वाचे आहे..

आणि एपिसोड मध्ये हिंदू + गोष्टी पण असतातच की. ह्या एपिसोड बाबत आपण जात धर्म सोडून गोष्टी पाहिल्या पाहिजेत असे मला व्यक्ती म्हणून वाटते. त्यांच्याशी उर्दूतून बोलन्याच्या मुद्द्याला थोडेफार अनुमोदन पण व्यक्तीशः मला अजिबात खटकले नाही.

<< अनुमोदन केदार !

Pages