निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.
सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.
महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.
एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.
(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
अनुक्रमणीका:
पान १ -
प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.
माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...
माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती
पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय
पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख
पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...
पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.
पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new
पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new
पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड
पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा
पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325
पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल
माहीती : बिब्बा
लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html
पान १३
प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित
पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल
पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm
पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन
पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001
पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,
पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता
पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/
पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134
पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090
पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I
पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512
पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,
पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,
पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्या-गिधाडे, वारी
पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक
पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/
पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/
पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली
पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली
पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\
पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक
दिनेशदा, मध्यंतरी (साधारण
दिनेशदा, मध्यंतरी (साधारण दिड-दोन महिन्यांपूर्वी) आझाद मैदानाजवळ धनेश दिसला होता .. महाराष्ट्र टाईम्स.
त्याच्याआधी माझ्या ऑफिसच्या बागेतसुद्धा (टि.आय.एफ.आर., कुलाबा) धनेश दिसला होता. जोडी होती. असे काही दिसणे फारच सुखावह असते.
साधना, पुस्तक वाचेन आता.
साधना, पुस्तक वाचेन आता. धन्यवाद
उजु, तुझ्याशी बोलणे झालेच नाही नंतर. तुला वेळ असला कि समस कर मग बोलु. - सहजच
मधु-मकरंद या दिवसात मुंबईत,
मधु-मकरंद
या दिवसात मुंबईत, हळद्या सुद्धा दिसतो. जीवाची मुंबई करायला येतात वाटतं हि मंडळी !
त्यादिवशी आमच्या जांभळीवर
त्यादिवशी आमच्या जांभळीवर धनेश आला होता. रोज शेवग्यावर येतो.
लकी बाबातुम्ही लोकं मला एक
लकी बाबातुम्ही लोकं
मला एक निळा जे/रोलर नेहमी दिसतो
दिनेशदा, माझ्या घरातून कमीत
दिनेशदा, माझ्या घरातून कमीत कमी १५-२० वेगवेगळे पक्षी दिसतात. बहुतेक सगळे जोडीने दिसतात. (म्हणजे काही पक्षांमधे मला नर-मादी ओळखता येतात)
कावळा, चिमणी, पोपट, घार, शिंपी, सुर्यपक्षी, तांबट, मॅगपाय रॉबीन, फॅनटेल फ्लायकॅचर, हळद्या, लाल बुड्या बुलबुल, तुरेवाला बुलबुल, खंड्या, कोतवाल (सिझनल), घुबड (कधीतरी), बगळे, पॉन्ड हेरॉन, भारद्वाज.
मी मुंबईच्या उपनगरात स्टेशनजवळ रहाते, पण आजुबाजूला बरीच झाडी असल्याने वेगवेगळे पक्षी दिसतात. असे कायम असावे एवढीच ईच्छा!
madhu-makarand, कित्ती लकी.
madhu-makarand, कित्ती लकी. नक्की कुठे रहातेस?
सुप्रभात.
सुप्रभात.
काल संध्याकाळी घरी जाताना
काल संध्याकाळी घरी जाताना कदंबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या होत्या. मस्त वाटले.
मोनलिप, कांदिवली पूर्व, आर्य
मोनलिप, कांदिवली पूर्व, आर्य चाणक्य नगर.
माधव, माझ्या ऑफिसमधला कदंबसुद्धा छान फुलला आहे. बोरिवलीहून येताना सांताक्रुझ स्टेशन येण्याआधी पश्चिमेला एक मोठा कदंब आहे. रेल्वेकुंपणा अलिकडे असल्याने पूर्ण दिसतो. आजुबाजुला कुठलेही झाड नाही आणि मागे एक बिल्डींग आहे. छान फुलला आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसतो.
नि.ग. मुळे आपल्या भोवतालचा निसर्ग असा नव्याने दिसतो.
सुप्रभात. सो लकी मधु.मी
सुप्रभात.
सो लकी मधु.मी रहाते ती बिल्डिंगपण झाडात लपलीये अगदी,आणि एरिया पण हिरवागार आहे त्यामुळे भरपूर पक्षी बागडत असतात आजूबाजूला.
माधव निसर्ग खुष आहे तुमच्यावर
माझ्या ईथला कदंबपण मस्त फुलला आहे.
photo taka na kadambache.
photo taka na kadambache. maagil varshi Yogesh ne takale hote.
जागु, उद्या टाकेन मी कदंबाचे
जागु, उद्या टाकेन मी कदंबाचे फोटो.
सावली आज फोनते मी तुला.
हा आमच्या शेवग्यावर बसलेला.
हा आमच्या शेवग्यावर बसलेला.
त्यादिवशी आमच्या जांभळीवर
त्यादिवशी आमच्या जांभळीवर धनेश आला होता. रोज शेवग्यावर येतो. >> जागू वरच्या फोटोतला धनेश नाहीये.
मगाच्या माझ्या यादीत कोकीळ,
मगाच्या माझ्या यादीत कोकीळ, कबुतर आणि साळुंकी राहीले.
हा कोकीळ
जागू , खरेच हा धनेश नाही.
जागू ती फिमेल कोकीळ
जागू ती फिमेल कोकीळ वाटतेय....
जागू ती फिमेल कोकीळ
जागू ती फिमेल कोकीळ वाटतेय.... >>>> शक्यता कमी वाटतेय कोकिळेची, बहुतेक ब्रेन फिव्हर बर्ड (पावशा) असावा......
तूम्हाला खरे वाटणार नाही पण
तूम्हाला खरे वाटणार नाही पण २५/३० वर्षांपुर्वी मुंबईत पोपट, कोकिळा क्वचितच दिसत. झाडे निश्चितच वाढली पण मुंबईचा विस्तार झाला हे पण कारण आहे. त्यावेळी पक्षी शहरापासून लांब राहणेच पसंत करत असत.
फोटो मध्ये कोकीळा आहे. कोकीळ
फोटो मध्ये कोकीळा आहे. कोकीळ की कोकीळा ह्यामध्ये माझी जरा गडबड उडाली आहे.
फोटो मध्ये कोकीळा आहे. >>>
फोटो मध्ये कोकीळा आहे. >>> कोकिळ, कोकिळा - दोघांचेही डोळे लालबुंद असतात - इथे फोटोत नीट दिसत नाहीये डोळे ......
कोकिळ, कोकिळा - दोघांचेही
कोकिळ, कोकिळा - दोघांचेही डोळे लालबुंद असतात - इथे फोटोत नीट दिसत नाहीये डोळे ......>>>>.कोकिळ काळ्या रंगाचा आणि कोकिळा ठिपक्या-ठिपक्यांची असते.
ही कोकिळा.
हा कोकिळ.
शोभा, माझी मैत्रीण आत्ताच
शोभा,
माझी मैत्रीण आत्ताच पिंपरी-चिंचवड्ला शिफ्ट झाली आहे. तिचे कोणीच नातेवाईकपण तिकडे नसतात. प्रेगनन्सी कन्फर्म करायची आहे तिला. मला पण पुण्याची माहिती नाहिये काहीच. पिंपरी-चिंचवडमधील चांगल्या गायनॅकची माहिती असेल तर डॉकचा नंबर , पत्ता आणि नाव देऊ शकशील का?
अर्रे व्वा.. शोभा.. छान
अर्रे व्वा.. शोभा.. छान माहिती...
नाहीतर मी विचारातच पडले होते.. कोकिळ कोकिळा कसं ओळखायचं??
कोकिळ सुमधुर आवाजात ओरडतो.
कोकिळ सुमधुर आवाजात ओरडतो. कोकिळा दबल्यासारखी ओरडते.
माझी मैत्रीण आत्ताच
माझी मैत्रीण आत्ताच पिंपरी-चिंचवड्ला शिफ्ट झाली आहे. तिचे कोणीच नातेवाईकपण तिकडे नसतात. प्रेगनन्सी कन्फर्म करायची आहे तिला. मला पण पुण्याची माहिती नाहिये काहीच. पिंपरी-चिंचवडमधील चांगल्या गायनॅकची माहिती असेल तर डॉकचा नंबर , पत्ता आणि नाव देऊ शकशील का?>>>>>>>>>>>अग मला पण पिंपरी-चिंचवडची माहिती नाही. क्षमस्व.
http://www.maayboli.com/node/1897 इथे विचारून बघ.
परत फोटो काढेन राहुद्या. मी
परत फोटो काढेन राहुद्या.
मी धनेशला चांगली ओळखते. नेहमीच आमच्या शेकटावर येतात. फक्त एकच दिवस त्याला जांभळीवर पाहीले पण फोटो काढला नव्हता. हा शेवग्यावरचा फोटो. आमचा शेवगा म्हणजे सतत कुठले ना कुठले पक्षी असणारा आहे.
सर्व फोटो उत्तम !
सर्व फोटो उत्तम !
वा मस्त फोटो, माझ्या घराच्या
वा मस्त फोटो, माझ्या घराच्या आसपासही अनेक पक्षी आहेत पण सगळ्यांची नावं काही माहित नाहीत.
फक्त धनेश, घार, कोकिळ्, भारद्वाज, खंड्या, पाण कोंबडी, बुलबुल, कोतवाल इ. ओळखता येतात एकदा शिक्राही दिसला होता.
जागू आता लवकरच मोर पण
जागू आता लवकरच मोर पण येणार.
एकदा आम्ही नाणेघाटाच्या पायथ्याशी मोर दिसला म्हणून त्याच्या मागे गेलो तर तो एका घरात शिरला. त्या माणसाने सांगितले कि त्याला जंगलात मोराची अंडी मिळाली होती, ती त्याने आणली व कोंबडीला उबवायला दिली. ते मोर त्याच्याच घरी जन्मले. त्या वेळी ते दिवसा जंगलात चरायला जात आणि रात्री झोपायला घरी येत (अजून असतील)
मोर हा जंगलातला "जागल्या" म्हणतात. वाघासारख्या मोठ्या प्राण्याची चाहूल लागली तर तो आरडाओरडा करुन सावध करतो. त्याच कारणासाठी त्या लोकांनी तो पाळला होता. पण खुपदा, वाघाच्या नजरेचे गारुड पडून, मोर स्वतः मात्र उडायचे विसरतो आणि त्याची शिकार होतो.
Pages