Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
..... तर तो/ती कुठलं गाणं
..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? च्या तिसर्या भागातली शेवटची दोन कोडी संपली की हा भाग सुरू करू.
कृपया प्रत्येक कोड्याला क्रमांक द्या. उदा. कोडं क्र. ०४/००१, ०४/००२ इ. आणि उत्तरं देतानाही कोडं क्रमांक लिहून मग उत्तर द्या.
००४/००१: रीया आणि प्रिया खूप
००४/००१: रीया आणि प्रिया खूप चांगल्या मैत्रिणी असतात. प्रिया कथ्थकची प्रसिद्ध कलाकार असते. पण एकदा गाडी शिकताना रीयाकडून प्रियाचा अपघात होतो. अपघातातून प्रिया वाचते पण तिचा पाय कायमचा जायबंदी होतो. कथ्थक पण बंदच मग अरेरे . ती रीयाशी मैत्री तोडते. प्रियाचा प्रियकर शाम. त्याचे मात्र तिच्यावर मनापासून प्रेम असते. पण एकदा रीया त्याच्याकडे प्रेमभर्या नजरेने बघते आणि गाणे गुणगुणते. ते बघून मात्र प्रिया पार खचून जाते. एका पायात घुंगरू बांधून ती खोलीत येरझार्या घालू लागते. शाम येतो तर त्याला कळतच नाही की प्रिया असे का वागतेय. तो तिला विचारतो तर ती त्याला गाण्यातून उत्तर देते.
क्लू १: नावात काहीच नसते
००४/००२ एका कंपनीतल्या ब्रँच
००४/००२ एका कंपनीतल्या ब्रँच मॅनेजरला शहरातच एका समव्यावसायिकांच्या कॉन्फरन्ससाठी जावं लागतं. स्टाफमध्ये बॉस अगदी अप्रिय . आपण ऑफिसात नसल्यावर स्टाफ गॉसिपच्या उद्योगाला लागणार बॉसला माहीत असतंच. अशा बॉसचे असतात तसे श्रावण आणि वसंत नावाचे दोन चमचे या बॉसचेही असतात. आपल्याला कॉन्फरन्सच्या जागी ऑफिसातली वित्तंबातमी पोचवत रहा असे बॉसने दोघांना सांगितलेले असते.
पण कॉन्फरन्सच्या जागी पोचल्यावर कळते की तिथे तर जॅमर्स लावलेले आहेत. तन कॉन्फरन्समध्ये आणि मन ऑफिसात अशा अवस्थेत बॉस कोणते गाणे म्हणेल?
कोडं क्र. ०४/००३ रमेश आणि
कोडं क्र. ०४/००३
रमेश आणि सुरेश दोघं घनिष्ठ मित्र. दोघेही बिल्डर असतात. एकदा रमेशच्या कन्स्ट्रक्शन साईटवर एक क्रेन कमी पडत असते म्हणून तो सुरेशकडून त्याची क्रेन मागून घेतो. सुरेश त्याला लगेच देतोही पण त्या क्रेनची चांगली काळजी घे, ती खराब होऊ देऊ नकोस, व्यवस्थित चालव इ. इ. अनेक सुचना देतो. त्यावर रमेश त्याला आश्वासन देतो की तुझ्या क्रेनला मी प्राणापलिकडे जपेन, मग तर झालं? हे तो कसं सांगेल?
मामी कोडं क्र. ०४/००३ यारी है
मामी
कोडं क्र. ०४/००३
यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी
किंवा
यारा तेरी यारी को
मैने तो खुदा माना
( क्रेन = यारी )
सही जा रहे हो क्रीन ... आपलं
सही जा रहे हो क्रीन ... आपलं किरण .... दिमागपर थोडा और जोर दो.
०४/००३ किरणचे आभार मानून हमको
०४/००३ किरणचे आभार मानून
हमको तो यारा तेरी यारी जान से प्यारी
हे ही गाणं एकदम बरोब्बरे भम.
हे ही गाणं एकदम बरोब्बरे भम. पण माझ्या मनात जरा वेगळं होतं.
कोडं क्र. ०४/००३
रमेश आणि सुरेश दोघं घनिष्ठ मित्र. दोघेही बिल्डर असतात. एकदा रमेशच्या कन्स्ट्रक्शन साईटवर एक क्रेन कमी पडत असते म्हणून तो सुरेशकडून त्याची क्रेन मागून घेतो. सुरेश त्याला लगेच देतोही पण त्या क्रेनची चांगली काळजी घे, ती खराब होऊ देऊ नकोस, व्यवस्थित चालव इ. इ. अनेक सुचना देतो. त्यावर रमेश त्याला आश्वासन देतो की तुझ्या क्रेनला मी प्राणापलिकडे जपेन, मग तर झालं? हे तो कसं सांगेल?
उत्तर :
१) ऐ यार सुन, यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है
२) हमको तो यारा तेरी यारी, जान से प्यारी (भरत मयेकरांनी सुचवलेलं)
०४/००२ साठी क्लु
०४/००२ साठी क्लु :
सगळ्यांच्या आवडत्या गायिकेनी तिच्या आवडत्या संगीतकाराकडे गायलेलं गाणं. हा संगीतकार एका विशिष्ट प्रकारच्या रचनांसाठी ओळखला जातो.
भम, आशा आणि ओ पी नय्यर?
भम, आशा आणि ओ पी नय्यर?
०४/००२ हमारे बाद अब मेहफील मे
०४/००२ हमारे बाद अब मेहफील मे अफसाने बया होंगे
बहारे हमको ढुंढेगी ना जाने हम कहा होंगे
०४/००४: लताचा लाडका भाऊ
०४/००४: लताचा लाडका भाऊ किशोर. ती त्याला लाडाने के म्हणत असते. तर असा हा के केशतज्ञ (तो सनसिल्क शँपूच्या जाहिरातीत फुस्को असतो ना तसे काहीतरी) बनण्याकरता अमेरीकेला गेलेला असतो. इकडे लताच्या डोक्यात खूप उवा होतात पण ती कुणाला सांगत नाही. पण ज्या दिवशी के घरी येतो तेंव्हा मात्र तिची सहनशक्ती संपते. ती त्याला आपली व्यथा गाऊन सांगते.
अरे व्वा! अभिनंदन मामी!
अरे व्वा!
अभिनंदन मामी!
माधव, ०४/००४ :
के आजा तेरी याद आई
ओ बालम हरजाई
के आजा तेरी ...
हे तर नाही?
आर्या किशोर तिचा भाऊ असतो गं
आर्या किशोर तिचा भाऊ असतो गं
०४/००४ : के जान चली जाए जिया
०४/००४ :
के जान चली जाए
जिया नही जाए
जिया जाए तो फिर
जिया नही जाए
(माहित आहे उत्तर चुकीचे असणार पण तरीही.
)
क्लु लता-किशोरचे ड्युएट आहे का?
जिप्सी, आपली माहिती तेच आमचे
जिप्सी, आपली माहिती तेच आमचे उत्तर
लताला दुसर्याच्या आवाजाची काय आवश्यकता? तेंव्हा हे गाणे फक्त लतानेच म्हटले आहे.
आता एकच राहिलय. के सरिया बाल
आता एकच राहिलय.
के सरिया बाल मां ओ री
संगितकारः हृदयनाथ मंगेशकर!
आर्या नाही. तिच्या मानलेल्या
आर्या नाही. तिच्या मानलेल्या भावाला पण विचारात घ्या.
आता या क्लू नंतर भरत, दिनेश, जिप्सी यांना आलेच पाहिजे. बाकिच्यांनाही जमेल. सुंदर आणि प्रसिद्ध गाणे आहे.
माधव बिन्गो, संध्याकाळच्या
माधव बिन्गो, संध्याकाळच्या चहासोबत तुम्हाला सुलेखाताईंच्या मिनी मसाला इडल्या
००४/००२ एका कंपनीतल्या ब्रँच मॅनेजरला शहरातच एका समव्यावसायिकांच्या कॉन्फरन्ससाठी जावं लागतं. स्टाफमध्ये बॉस अगदी अप्रिय . आपण ऑफिसात नसल्यावर स्टाफ गॉसिपच्या उद्योगाला लागणार बॉसला माहीत असतंच. अशा बॉसचे असतात तसे श्रावण आणि वसंत नावाचे दोन चमचे या बॉसचेही असतात. आपल्याला कॉन्फरन्सच्या जागी ऑफिसातली वित्तंबातमी पोचवत रहा असे बॉसने दोघांना सांगितलेले असते.
पण कॉन्फरन्सच्या जागी पोचल्यावर कळते की तिथे तर जॅमर्स लावलेले आहेत. तन कॉन्फरन्समध्ये आणि मन ऑफिसात अशा अवस्थेत बॉस कोणते गाणे म्हणेल?
हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे
बहारें हमको ढूंढेगी न जाने हम कहां होंगे
लता- मदन मोहन - गझल
मानलेला भाऊ म्हणजे मदन मोहन
मानलेला भाऊ म्हणजे मदन मोहन
लताचे मानलेले भाऊ
लताचे मानलेले भाऊ अनेक
मुकेशभैया, मदन भैया
सुहैलभैया आणि सौदभैया (हे दोघे मस्कत मधल्या सुहैल व सौद बाहवान, या ग्रुपचे मालक !)
किशोरकुमारलाही भाऊच मानलं
किशोरकुमारलाही भाऊच मानलं होतं ना?
तिला सोलो गाणे देऊ शकेल असा
तिला सोलो गाणे देऊ शकेल असा एकच भाऊ आहे वरच्या गोतावळ्यात - भरतने सांगितलेला. सांगा आता
०४/०४ उनको ये शिकायत है के हम
०४/०४ उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते
अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते
भरत ०४/००४: लताचा लाडका भाऊ
भरत
०४/००४: लताचा लाडका भाऊ किशोर. ती त्याला लाडाने के म्हणत असते. तर असा हा के केशतज्ञ (तो सनसिल्क शँपूच्या जाहिरातीत फुस्को असतो ना तसे काहीतरी) बनण्याकरता अमेरीकेला गेलेला असतो. इकडे लताच्या डोक्यात खूप उवा होतात पण ती कुणाला सांगत नाही. पण ज्या दिवशी के घरी येतो तेंव्हा मात्र तिची सहनशक्ती संपते. ती त्याला आपली व्यथा गाऊन सांगते.
उत्तरः
'उ नको' ये शिकायत है
के, हम कुछ नही कहते
पहिलं कोडं वाट बघतंय अजून -
पहिलं कोडं वाट बघतंय अजून - रिया प्रिया
माधव, यार या मराठीतल्या
माधव, यार या मराठीतल्या युक्त्या आता माझ्या लक्षातच येत नाहीत. मायबोली आणि घरचा फोन सोडला, तर आता मराठीशी माझा संबंधच राहिलेला नाही.
उ नको ..... मस्त होतं.
उ नको ..... मस्त होतं.
माधव __/\__ लागली की जनता
माधव __/\__
लागली की जनता ह्याही बीबीवर कामाला. चालू द्या. मला विकांताला काही सुचलं तर सोमवारी येईन इथे.
कोडं ०४/००५: ' अग, ऐकलंस का?
कोडं ०४/००५:
' अग, ऐकलंस का? इथे ये लवकर' गोविंदराव घाबरेघुबरे होऊन बायकोला हाक मारू लागले.
'थांबा एक मिनिट, खिडकी बंद करून येते. जोराचा पाऊस आलाय.' रमाबाईंनी उत्तर दिलं.
'काही हवंय का?' थोड्या वेळाने आत येत त्यांनी विचारलं.
'अग, छातीत जळजळ होतेय मघापासून'
'तरी सांगत होते की मसाल्याचं वांगं एव्हढं खाऊ नका. तुम्हाला मसालेदार काही सहन होत नाही'
'हो ग बाई. सगळं खरं तुझं पण आता काय करू सांग. डॉक्टर गोर्यांना फोन करतेस का? नाहितर रात्रभर मला झोप येणार नाही"
'करते ना, मला मेलीला दुसरं काय काम आहे? सांगितलेलं ऐकायचं नाही आणि मग मला नाचवायचं. मी काय १५-१६ वर्षाची तरूणी आहे आता?' रमाबाईंनी पुटपुटत फोन लावला.
काही वेळाने पुन्हा खोलीत येत त्या गोविंदरावांना म्हणाल्या 'अहो, डॉक्टर गोरे नाहियेत घरी. बाहेरगावी गेलेत म्हणे'.
'त्यांची बायको पण डॉक्टर आहे ना? तिला बोलव'
'अहो, तुम्हाला माहित आहे ना? डॉक्टर गोर्यांना आवडत नाही तिने त्यांच्या पेशन्टना ट्रीट केलेलं. त्यांचा तो गडी लगेच चुगली करतो म्हणे"
"खड्ड्यात गेला डॉक्टर गोरे. तू तिला म्हणावं मागच्या दरवाज्याने ये आणि काहीतरी औषध देऊन जा."
गोविंदराव गायच्या परिस्थितीत नव्हते म्हणून पण हेच एका जुन्या हिंदी गाण्याचा वापर करून त्यांन कसं सांगता आलं असतं?
Pages