उन्हांच्या प्रदेशात.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग)
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
18
उन्हांच्या प्रदेशात लाचार वाटा
कशा शोधती सावल्यांचे थवे..
जुने आठवावे तयांचेच रूप,
जुन्या काहिलीला मुलामे नवे!
उन्हांच्या प्रदेशातले शुष्क निर्झर
कुण्या काळची गाळती आसवे..
प्रवाहात ज्यांच्या खळाळून हसले,
मला बाल्य माझे पुन्हा आठवे.
The helpless roads in the sunshine land,
Search for the flocks of shadows..
Better to recall their old facets,
And brighten the bare, old plateaus..
The bottom-dry streams in the sunshine land,
Cry for the forgotten times..
Once their flows leaped merrily ahead..
In tune with my nursery rhymes..
विषय:
प्रकार:
शेअर करा
दोन्हीही सुरेखच - खूप आवडले.
दोन्हीही सुरेखच - खूप आवडले.
भावानुवाद आवडला.
भावानुवाद आवडला.
प्रयोग आवडला.इंग्रजी भाषांतर
प्रयोग आवडला.इंग्रजी भाषांतर छान जमले आहे... पण मला मराठी खूप जास्त भावली. अजून वाचायला आवडेल... अजून लिहा ना..:)
धन्यवाद शशांक, शैलजा,
धन्यवाद शशांक, शैलजा, अमेलिया.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेलिया, लिहीते..
दोन्ही आवडले. आधी मराठीत
दोन्ही आवडले.
आधी मराठीत लिहून मग इंग्रजीत भाषांतर आहे की आधी इंग्रजीत आणि मग मराठी? इंग्रजी व हिंदी दोन्ही तुम्हीच लिहिल्यात का? भावानुवाद खरंच छान जमलाय!
सहीये.. पण >> जुने आठवावे
सहीये..
पण >> जुने आठवावे तयांचेच रूप,>>> हे जरा ऑड वाटले... का ते नही सांगतत्येणर
निंबुडा, आभार.. आधी मराठी मग
निंबुडा, आभार.. आधी मराठी मग इंग्लिश. हो गं दोन्ही मीच लिहिल्यात.
गिरी, हो तो पोर्शन जरा वीक झालाय मलाही जाणवलेय ते. म्हणजे माझ्यासाठी त्याला अर्थ आहे पण ते तिथं एक्दम स्पष्टपणे उतरले नाहीये. (जर तुलाही हेच अभिप्रेत असेल तर. की शब्दरचनेबद्दल बोलतोयस?)
कविता explain करू नये खरंतर पण काहीतरी चर्चा व्हावी आणि मला काही समजावं म्हणून लिहीतेय.
ही कविता, खूप दिवसांनी मामाच्या गावाला जाताना सुचली. लहानपणच्या उन्हाळी सुट्ट्यात तिथे जात होतो. तिथे काही वर्षांनी पुन्हा चालले होते. उन्हाळ्यातच. तर तेच रस्ते जे पूर्वी सुट्ट्यांच्या एक्साईटमेंट मुळे छान वाटायचे ते आता लाचार दिसले हिरवाईअभावी. काहिली तर होतीच पूर्वीही. पण nostalgia मुळे पूर्वीचे सगळे छान वाटते ना म्हणून ती ओळ.
संघमित्रा, तुमच्या वरील
संघमित्रा,
तुमच्या वरील प्रतिसादानंतर परत वाचल्या आणि परत दोन्ही कविता आवडल्या.
खूप सुंदर दोन्ही कविता.
खूप सुंदर दोन्ही कविता. मराठी जास्त आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मराठी कविता आवडली... विशेषत:
मराठी कविता आवडली... विशेषत: काहिली-मुलाम्याचे रूपक..
पण मला भाषांतर नाही आवडले.. मुळात साहित्य खूप चांगल्या प्रकारे भाषांतरित होऊ शकते असे मला वाटत नाही...
कारण भाषा हि संस्कृतीशी निगडीत असते आणि संस्कृती हि सभोवतालातून साकारते..
इंग्रजी हि युरोपमधील भाषा आहे तिथे थंडी खूप असते त्यामुळे कडक उन्हाळा हि संकल्पनाच तेथे नाही म्हणून उन्हाळा -> sunshine land
तसेच भांड्याला कल्हई-मुलामा देणे -> brighten the bare, old plateaus या गोष्टींचे भाषांतर कसे करायचे हा प्रश्न राहतो.
निंबुडा थँक्स अगेन.. अनघा,
निंबुडा
थँक्स अगेन..
अनघा, मेघवेडा आभार.
मेघवेडा, खरंय तू म्हणतोस ते. भाषांतरित साहित्याचा दर्जा हा बहुतेकदा मूळ साहित्यापेक्षा कमीच असतो.
ज्या मातीतली भाषा असते त्या मातीतलेच अनुभव असतात म्हणून ते जास्त खरे, खणखणीत उतरतात मूळ भाषेत.
खरं तर याला भाषांतर म्हणताना माझीच चूक झालीय. हा भावानुवाद आहे असं म्हणता येईल.
पण आता आपले भारतीय अनुभव इंग्रजीत मांडणं हे नवीन राहिलं नाहीये. हळूहळू ते आपण स्विकारतो आहोतच. भारतीय-इंग्रजी लेखन (भाषांतरित नाही मूळ भारतीय माणसांनी इंग्रजीत लिहीलेले) असा वेगळा साहित्यप्रकार आहे आणि तो बर्यापैकी चालतोय पण. अर्थात आपल्या भाषेपेक्षा इंग्रजीत लिहीलेलं बरं असं मला नाही म्हणायचंय. तरीही ज्यांना मूळ भाषा समजत नाही त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय म्हणून ठीक आहे असं वाटतं मला. तुला काय वाटतं?
दोन्ही कविता आवडल्या
दोन्ही कविता आवडल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अह्हाहा.... मस्त. दोन्ही
अह्हाहा.... मस्त. दोन्ही कविता आवडल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद मिळाला.
धन्यवाद आरती, धुंद रवी. प्लीज
धन्यवाद आरती, धुंद रवी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्लीज काही सुचना असल्यास त्याही कळवा.
मेघवेड्या, तू म्हणतोयस ते नंतर जास्तच तीव्रपणे लक्षात आलं. खरंतर आपल्याकडच्या उन्हाळ्यातल्या जमिनीला
sunshine land ऐवजी sun-burnt land म्हणायला हवं होतं. पण..... तू वाचत असशील तर पुढं लिहीन
अह्हाहा!! सुंदर!!
अह्हाहा!! सुंदर!!
छान संघमित्रा.
छान संघमित्रा.
धन्यवाद नचिकेत, बी..
धन्यवाद नचिकेत, बी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली. 'जुन्या काहीलीला
आवडली. 'जुन्या काहीलीला मुलामे नवे' याचा अनुवाद अशक्यच आके. आजच्या शहरी पिढीला तर आधी 'काहिल' म्हणजे काय इथपासूनच तयारी आहे!
-बापू.