---------------------------*******--------------------------
आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची..
तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची..
आधी कविता मानेला हिसका देउन मस्त मुरका मारायची..
गुलाबी थंडीच्या सिगारेटचा खोटा झुरका माराय़ची ..
माझ्याकडे आली की भुकेल्या नजरेने बघायची..
अन जाताना मलाच नव्या ओळी भरवायची..
मी गेलो तीच्याकडे की हसत स्वागत करायची ..
मला परत पाठवताना,नवी उर्मी उरात भरायची..
मधल्या कित्येक दीवसात मी भेटुच शकलो नाही..
मी दार ठोठावले अनेकदा पण तीला गाठुच शकलो नाही..
अचानक कुणी म्हणाले फ़ीरते आहे ती वेड्यासारखी बाजारात..
मी धावत गेलो तिच्याकडे ,शाल पांघरुन आणले घरात..
घरी येताच हसली कशी-बशी..आणि बिलगली एकदम उराशी..
पुन्हा हसली शाल-बिल सोडुन..अन शब्द शब्द तीचा उठला पेटुन..
मला एकदम जाणवलं..मगाशी हीने हासुन मला हीणवलं..
माझ्या प्रगल्भतेला मुळापसुन हालवंल..
कविता आता उत्तान झाली ..
वणव्याने पेटलेलं तुफ़ान झाली ..
जी कविता जायची डोक्यात , ती कविता आता जाते देहात ...
हात फ़ीरवता पाठीवरती , मुके घेते छातीवरती...
मधुनच उगाच रुसुन बसते, आकाशाकडे पहाते मग्न होऊन..
ओळी सा-या नीरेसारख्या सोडुन बघत रहाते, नग्न होऊन...
मला म्हणाली या कानामागुन त्या कानामागे नख लाव..
शब्दनखांनी तुझ्या लालेलाल होयीन अशी धग लाव..
म्हणालो बये बये तुला झालंय काय?तु होतीस बरी संस्कारी..
पुन्हा पदर ढाळुन म्हणाली, हीच खरी अदाकारी..
एका मध्यरात्री उठलो मी चवताळुन..विचारले तीला घालुन पाडुन..
पुन्हा तशीच हसली स्वत:शी ,अन झोपी गेली तोंड लपवुन..
पहाटे पर्यंत मी तीच्या अनावृत्त देहाकडे अनिमिष पहात होतो..
अलंकार,भरजरी शब्द,वृत्त,मात्रा,पुन्हा द्यायचा विचार करत होतो..
जाग आली सकाळी..म्हणजे माझा डोळा लागला..
हात फ़ीरवता बिछान्यावरती..एक कागदाचा बोळा लागला..
तीने माझे विचार वाचले होते , पुन्हा तीच्यावर बंधन घालायचे..
लिहीले होते पुढे ..की तिला आता पुर्ण मुंडन करायचे..
ती विद्रुप चेह-याने चिटो-यातुन त्या बोलायला लागली..
बोलायला कसली हमसुन हमसुन रडायला लागली..
म्हणाली बलात्कारीतेला पुन्हा घरात आणणे सोपे नाही..
मी विसाउ शकेन इतके मोठे तुमचे कुणाचेच खोपे नाही..
मी सुन्न म्हणालो .."कुणी , कधी , कसे ,कुठे?"
.
.
तु अर्थ लावला तिथे, अन ’वाह’ घेतली जिथे..!!
विनायक
वाह!
वाह!
क्या बात है! एकदम भन्नाट.
क्या बात है!
एकदम भन्नाट.
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या अशा फार कमी कविता आहेत मायबोलीवर माझ्याकरता. अशा मोजक्याच कवितांमध्ये ह्या कवितेचा नंबर नक्कीच वरचा > +१
आवडली
The real and realistic
The real and realistic poetry.
आईशप्पथ... अशीच एक कविता मी
आईशप्पथ... अशीच एक कविता मी सुद्धा २००९ मध्ये लिहिली आहे... सेम आशय, काही काही शब्द तेच, शेवट वेगळाय... पण मी ती कुठेच पब्लिश नाही केलेली, सो तुमचं खास अभिनंदन ही पब्लिश केल्याबद्दल मस्त झालीये (माझी मला बालिश वाटली होती, नुकताच कॉलेज मधून बाहेर पडतांना केली होती म्हणून...)
खुप मस्त विनायक..
खुप मस्त विनायक..
सा-यांचे आभार !!
सा-यांचे आभार !!
खुपच सुंदर कविता! शब्दच
खुपच सुंदर कविता! शब्दच नाहीत माझ्याकडे!
वाह.. क्या बात है.... छ्प्पर
वाह.. क्या बात है.... छ्प्पर तोड..!!!! जियो.... बरेच दिवसाने कविता वाचली...
वेगळा विषय, वेगळी
वेगळा विषय, वेगळी मांडणी.
लांबी कमी असती तर अधिक प्रभावी झाले असती असे वै.म.
कृगैन.
हॅट्स ऑफ.. नतमस्तक...!!
हॅट्स ऑफ..
नतमस्तक...!!
Pages