---------------------------*******--------------------------
आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची..
तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची..
आधी कविता मानेला हिसका देउन मस्त मुरका मारायची..
गुलाबी थंडीच्या सिगारेटचा खोटा झुरका माराय़ची ..
माझ्याकडे आली की भुकेल्या नजरेने बघायची..
अन जाताना मलाच नव्या ओळी भरवायची..
मी गेलो तीच्याकडे की हसत स्वागत करायची ..
मला परत पाठवताना,नवी उर्मी उरात भरायची..
मधल्या कित्येक दीवसात मी भेटुच शकलो नाही..
मी दार ठोठावले अनेकदा पण तीला गाठुच शकलो नाही..
अचानक कुणी म्हणाले फ़ीरते आहे ती वेड्यासारखी बाजारात..
मी धावत गेलो तिच्याकडे ,शाल पांघरुन आणले घरात..
घरी येताच हसली कशी-बशी..आणि बिलगली एकदम उराशी..
पुन्हा हसली शाल-बिल सोडुन..अन शब्द शब्द तीचा उठला पेटुन..
मला एकदम जाणवलं..मगाशी हीने हासुन मला हीणवलं..
माझ्या प्रगल्भतेला मुळापसुन हालवंल..
कविता आता उत्तान झाली ..
वणव्याने पेटलेलं तुफ़ान झाली ..
जी कविता जायची डोक्यात , ती कविता आता जाते देहात ...
हात फ़ीरवता पाठीवरती , मुके घेते छातीवरती...
मधुनच उगाच रुसुन बसते, आकाशाकडे पहाते मग्न होऊन..
ओळी सा-या नीरेसारख्या सोडुन बघत रहाते, नग्न होऊन...
मला म्हणाली या कानामागुन त्या कानामागे नख लाव..
शब्दनखांनी तुझ्या लालेलाल होयीन अशी धग लाव..
म्हणालो बये बये तुला झालंय काय?तु होतीस बरी संस्कारी..
पुन्हा पदर ढाळुन म्हणाली, हीच खरी अदाकारी..
एका मध्यरात्री उठलो मी चवताळुन..विचारले तीला घालुन पाडुन..
पुन्हा तशीच हसली स्वत:शी ,अन झोपी गेली तोंड लपवुन..
पहाटे पर्यंत मी तीच्या अनावृत्त देहाकडे अनिमिष पहात होतो..
अलंकार,भरजरी शब्द,वृत्त,मात्रा,पुन्हा द्यायचा विचार करत होतो..
जाग आली सकाळी..म्हणजे माझा डोळा लागला..
हात फ़ीरवता बिछान्यावरती..एक कागदाचा बोळा लागला..
तीने माझे विचार वाचले होते , पुन्हा तीच्यावर बंधन घालायचे..
लिहीले होते पुढे ..की तिला आता पुर्ण मुंडन करायचे..
ती विद्रुप चेह-याने चिटो-यातुन त्या बोलायला लागली..
बोलायला कसली हमसुन हमसुन रडायला लागली..
म्हणाली बलात्कारीतेला पुन्हा घरात आणणे सोपे नाही..
मी विसाउ शकेन इतके मोठे तुमचे कुणाचेच खोपे नाही..
मी सुन्न म्हणालो .."कुणी , कधी , कसे ,कुठे?"
.
.
तु अर्थ लावला तिथे, अन ’वाह’ घेतली जिथे..!!
विनायक
ज ब र द स्त!
ज ब र द स्त!
तुफान ! किती वेगवेगळ्या
तुफान ! किती वेगवेगळ्या अर्थांनी वाचली मी. अगदीच पोचली.
खरंचंच जबरद्स्त
खरंचंच जबरद्स्त कविता..........
नावावरुन जरा वेगळेच वाटले पण फारच तुफानी मांडणी आहे या कवितेची - त्रिवार सलाम मित्रा........ मानलंच तुला.....
छानच!
छानच!
छानच!
छानच!
सुंदर , एकदम थेट !!!
सुंदर , एकदम थेट !!!
____/\____ ____/\____ ____/\_
____/\____
____/\____
____/\____
( त्रिवार )
धन्यवाद
धन्यवाद
एक नंबर
एक नंबर
जबरदस्त! नाव वाचून या आधी
जबरदस्त!
नाव वाचून या आधी वाचली गेली नव्हती. पण पुन्हा नविन लेखनात आज वर आल्यावर का कोण जाणे वाचावीशी वाटली... पण सार्थक झालं.
क्या बात है! ज्याने कुणी वर
क्या बात है!
ज्याने कुणी वर काढली परत त्याला धन्यवाद.
बर्याच दिवसांनी काहीतरी लख्ख वाचायला मिळालं.
अजून लिहा.
भारी आहे कविता. एकदम भन्नाट.
भारी आहे कविता.
एकदम भन्नाट.
खणखणीत मझा आ गया दोस्त.
खणखणीत
मझा आ गया दोस्त.
अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम.
अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम. मोठा कवी.
इथे यन्च्या सुन्दर कवित
इथे यन्च्या सुन्दर कवित अहेत...
http://www.vinayaki.blogspot.in/
फारच उच्च पातळी आहे.
फारच उच्च पातळी आहे. पहिल्यांदाच कविता वाचताना एखादी कथा वाचत असल्यासारखे वाटले. म्हणजे गद्य आहे म्हणुन नाही तर वर्णनात्मक आहे म्हणुन.
धन्यवाद पादुकानन्दजी! हे
धन्यवाद पादुकानन्दजी!
हे चोप्य्पअस्ते>>>
उशीर ..!
तुम्ही सगळेच निघून जा ..
लवकर निघा बरं..
उशीर नका करू ..
तुम्ही गेल्याशिवाय ,
ती नाही येणार ..
तुम्ही उशीरा गेलात तर,
तिलाही नंतर घरी जायला उशीर होईल ..
नवरा खाष्ट आहे तिचा,
घरी परतायला उशीर करून चालत नाही .. !!
म्हणून म्हणतो ,
लवकर निघा ..
लगबग करा
उगाच उशीरापर्यंत ताटकळत नका बसू ..
ती येऊन गेली
आणि
तिच्या घरी सुखरूप पोहचली ..
की ,
.
.
.
कावळा शिवेल नक्की पिंडाला माझ्या ..!!
<<<<
वा!
काय कविता आहे!
अहह!
(रविकिरणमंडळसदस्य) इब्लिस
पादुकानन्द, धन्यवाद ब्लॉगची
पादुकानन्द, धन्यवाद ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल.
फार सुंदर आहेत त्या कविता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
___/\___ काहीच प्रतिसाद नाही
___/\___
काहीच प्रतिसाद नाही देऊ शकत मी या कवितेवर!
आतल्या आत खोलवर रुतली!
नि:शब्दं!
नि:शब्दं!
वॉव ! आज पहिल्यांदाच दाद ( )
वॉव ! आज पहिल्यांदाच दाद ( :फिदी:) देण्यासारखी कविता वाचली.
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या अशा फार कमी कविता आहेत मायबोलीवर माझ्याकरता. अशा मोजक्याच कवितांमध्ये ह्या कवितेचा नंबर नक्कीच वरचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
अप्रतिम!
अप्रतिम!
उच्च !!!!!!!!!!
उच्च !!!!!!!!!!
जबरदस्त...
जबरदस्त...
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या
वाचून कळलेल्या आणि आवडलेल्या अशा फार कमी कविता आहेत मायबोलीवर माझ्याकरता. अशा मोजक्याच कवितांमध्ये ह्या कवितेचा नंबर नक्कीच वरचा <<< +१.
____/\____
____/\____
आजच वाचली. विशेषण अन विश्लेषण
आजच वाचली. विशेषण अन विश्लेषण कमी पडेल अशी कविता.
आजच वाचली. विशेषण अन विश्लेषण
आजच वाचली. विशेषण अन विश्लेषण कमी पडेल अशी कविता.
कविता आवडली.
कविता आवडली.
Pages