हरिभाऊ-(एक व्यक्तिचित्र)
माझ्या वडिलानी हरिभाऊन विषयी मला जे सान्गितले ते आजही माझ्या स्मरणात आहे. परन्तु आज हरिभाऊन्ची आच्यानक आठवन का ह्वावी बर ? काही माणस प्र्रकर्शाने आठवावी अशीच असतात.कायम लक्षात राहणारी् अशी. भाउ एका लहान्श्या गावात राहात.भिक्षुकी करुन कुटूम्बाचे पोट भरत.वडिलोपार्जित थोडी शेती होती परन्तु ह्यन्च्या वाट्याला ती आली नाही.सात मुली, एक मुलगा, पत्नी, असा व्याप्. मुलान्च्या शिक्षणासाठी मिळकत वाढवण आवश्यक होत.. खामगावला स्थलakaन्तर करुन मिळकत वाढवावी म्हणुन ते खामगावला आलेत. नविन गाव,नविन माणसान्त वाव मिळण तस कठिणच त्यामुळे हरिभाउन्ना तेथे बस्तान बसवायला जरा वेळच लागला ह्या काळात त्यान्च्या कुटुम्बावर उपाशी राहायची वेळ आली नन्तर काही दिवसान्नी विपरीत घडले..त्यान्चे शालक(बायकोचा भाऊ) दत्तोपन्त बुलढाणा येथे वकीली व्यवसायात होते.त्यान्ना दोन मुलगे होती.त्यान्चे कुटुम्ब आनन्दाने नान्दत होते.परन्तु काळाला ते पहावले नाही, त्याने दत्तोपन्ताना उचलुन घेतले. दत्तोपन्त गेलेत.त्यान्ची पत्नी तरुण वयात विधवा झाली.मुलान्ना घेउन कुठे जावे काय करावे ? गाठीशी पैसा नाही सोबात दोन लहान मुले कसे जगावे यक्ष प्रश्न होता.हरीभाउन्ची पत्नी
त्याना म्हणाली “आपण आणुया मुलान्ना आणि वहिनीला आपल्या घरी, आपल्या मुलान बरोबर
तेही खातील दोन घास." हरिभाउ चिन्तेत पडलेत पत्नील म्हणाले "येथे आपल्याच मुलान्ना पुरेस
खायला घालु शकत नाही, ह्यान्ना काय देणार ? तेही आपल्या मुलान बरोबर उपाशी राहातील !’’ स्वातन्त्र्य पुर्व काळात भिक्षुकी करुन कुटूम्बाचे पोट भरणे ह्यात काही वावगे नव्हते, परन्तु तितकेसे
सोपेही नव्हते. मिळकत फारशी होत नव्हती.त्यात खाणारे अनेक.परन्तु त्या काळात घासातील घास
देउन लोक आननदाने राहात्, देवभोळी माणस,एकमेकान्चे दु:ख वाटुन घेत.पदरी पैसा नाही
म्हणुन आपल्याच लोकान्ना आपण मदत कारायचीनाही हे हरिभाउना पटत नव्हते. त्यानी रात्रीतुन
विच्यार केला.सकाळी पत्नीला सान्गुन तो पक्का केला.ते पत्नील म्हणाले ईश्वराची ईछा, थोडे जास्त
कष्ट पडतील करू कसेतरी, आणु त्यान्ना, काळजी नको करूस." घरी रामाचे नवरात्र असल्यामुळे
श्री रामदास स्वामिन्चे मनाचे श्लोक घारात नित्याने म्हन्टले जायचे, त्यान्नी ठरविले स्वामिन्च्या
ईछेनेच सर्व काही होईल त्यान्नी शालकाच्या मुलान्ना घरी आणले.भिक्षुकी करीता रोज नवीन घरी
जाऊ लागले.श्री रामदास स्वामिन्चे मनाचे श्लोक खड्या आवाजात म्हणुन भिक्षा मागु लागले.पहाता
पहाता झोळी भरून जायची. दर आठ दिवसान्नी नवीन गावात ते भिक्षा मागू लागले. सगळ्याना
पुरेल इतके दान त्यान्ना मिळू लागले. ऊन्हाळ्याचे दिवस पादत्राणे नाहित रणरणत्या उन्हात
वणवण गावोगावी हिन्डुन सर्वान्चे पोट भरेल इतके भिक्षेत दान मिळवणे अपरिहार्य होते.
असा दिनक्रम कित्येक वर्ष सुरू होतापरन्तु हरिभाऊन्नी कधिही त्याचा त्रागा केला नाही. आपल्या
मुलान बरोबरच शालकाच्या मुलान्नाही त्यान्नीजेऊ घातले त्यान्चे शिक्षणही चालु ठेवले.मुलीन्ना
म॑ट्रिक पर्यान्त शिकवले.पुढे पुढे त्याना डोळ्यान्नी कमी दिसु लागले,आणि नन्तर तर अन्धत्व आले
.सोबत मुलान्ना घेउन भिक्षा मागायला जाऊ लागले परन्तु जवाबदारी मात्र पुर्ण पार पाडली
.पुढे शालकची मुले बबन आणि मधु उच्च शिक्षणा साठीदुस-या गावी गेलीत. भाऊन्चाही मुलगा
वैद्य झाला, मुलीहि व्यवस्थित घरात दिल्यात्.भावाच्या मुलाला पौरोहित्य शिकवले व पोटापाण्याला
लावले.एका दिव्याने मन्दपणे तेवत इतरान्ना प्रकाश दिला, आयुष्य ऊभे केलेत् .शालकाची मुले
शासकिय सेवेत मोठ्या पदावरून निव्रुत्त झालीत.अश्या या हरिभाऊन्ना माझा प्रणाम्.आश्या व्यक्ति
आज मिळण कठिण,हरिभाऊ आज आपल्याला प्रेरणा देवोत आणि माझ्या कडुनही असेच उत्तम
कार्य घडो हिच ईश्वरा जवळ प्रार्थना आणि हरिभाऊन्ना शतषः प्रणाम.
http://www.maayboli.com/node/add/story-gulmohar
हरिभाऊ-(एक व्यक्तिचित्र)
Submitted by जैली on 24 May, 2012 - 13:05
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
प्रेरणादाई व्यक्तिमत्व.
प्रेरणादाई व्यक्तिमत्व.