Submitted by संयोजक on 11 September, 2008 - 22:51
नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
३) एका आयडीवरुन तुम्ही कितीही प्रवेशिका टाकू शकता फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल
४) विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.
आजची जोडी :
राज ठाकरे आणि जया बच्चन
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जया: नको
जया:
नको तिथे नाही ते बोलायचा
मला भारी जोश
समोर राज आता उभा ठाकला
उगाच ओढवला मराठी बाण्याचा रोष
राज :
महाराष्ट्राने तुझं आयुष्य लाखात एक घडवलं
तरी तोंड वर करून म्हणतेस की बोलणार नाही मराठी
विनाशकाले विपरीत बुध्दी
जया तुझी झाली साठी बुध्दी नाठी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
मला वाटतं
मला वाटतं की उखाण्यासाठी जोड्या बरोबर असाव्यात, ही काही जोडी नव्हे..
कृपया दुसरी जोडी टाकता येईल का?
आधीच मिडियाने या चर्चेला विनाकारण महत्त्व दिलेले आहे.. इथे ते सगळं होण्यापेक्षा दुसरी एखादी हलकीफुलकी जोडी बरी वाटेल.
चुभूद्याघ्या
आशु.. जबरी..
आशु.. जबरी..
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-
....
....
जया : कास
जया :
कास सोडून बन्गालीची
भरला लखनौचा 'द्रोण'
हिन्दीला विरोध करणारा
हा राज ठाकरे कोण ?
राज :
मर्दमराठयां मिरवण्या
इथे मुम्बइचे आंगण
'जया' अंगी मोठेपण
तया यातना कठीण..
' हलकी
' हलकी फुलकी' जोडी.. ? सैफ- करीना ही हलकी जोडी होती ?
जया: हिन्दी
जया:
हिन्दी चिन्धी, मऊ 'मुलायम'
मराठी काटे बोचती फार,
लाथ मारूनी सौरी म्हणाले,
झाले गन्गाकाठी पसार.
राजः
पवार नि काका, सावध ऐका,
मनसे च्या माझ्या , आता गन्गातिरी शाखा.
मराठीचे तुणतुणे, डाऑल्बी वानि वाजे,
गरम हाय तवा, हाणा की ठोका.
पहिला
पहिला उखाणा एडिट करतोय.. पण स्पर्धेला दोन्ही आहेत..
जया :
बॉन्गॉलची गुड्डी मी
भरते लखनौचा 'द्रोण'
हिन्दीला विरोध करणारा
हा राज ठाकरे कोण ?
राज :
मर्दमराठयां मिरवण्या
इथे मुम्बइचे आंगण
'जया' अंगी भैय्यापण
तया यातना कठीण..
जगोबा, छान!
जगोबा, छान!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
प्यारे वा
प्यारे वा व्वा
जया
जया :
मराठी'राज'च्या मुंबईत राहुनही
माझी युपीच आहे मला प्यारी...
मी करते फिरते वाचाळपणा
आणि नवरा बिचारा म्हणतो सॉरी...
राज :
भय्याला दिली ओसरी
आणि भय्यीणीने पसरले हातपाय...
अरे कुठे राहुन काय बोलतो
जरा विचार कर ना 'जया'बाय...
सेनापनी,
सेनापनी, जामोप्या मस्त.. !
राज- महाराष
राज-
महाराष्ट्राच्या मर्हाटी मातीत
ही कोण आली बया
नाही सोडणार आम्ही हीला
जरी असली बच्चनांची जया
जया-
आतापर्यतच्या अनेक संकटांची
वाट्ली नाही भिती मला
नवरयाच्या सॉरीची साथ असताना
राज क्या है बला
मस्तच आहेत
मस्तच आहेत सगळे उखाणे!
मधुरा...
मधुरा... मस्त गं!
मधुरा , छान
मधुरा , छान उखाणा.. सर्वानी जया- राज असाच क्रम वापरला होता... तुम्ही मात्र राज- जया असा क्रम वापरुन दाखवला, जे थोडे अवघड होते... शेवटची ओळ ' राज ठाकरे क्या है बला' अशी ठेवल्यास जास्त समर्पक वाटेल, असे वाटते..
जया: भले
जया:
भले पोसले मुंबईने मला
तिनेच दिली सारी रया
खाल्या मिठला जगली तर
तर मी कसली भय्या..?
राज
'जया' अंगी मोठेपण
खोटी ठरते येथे म्हण
शिकवा हिला शहाणपण
नाहीतर फिरेल ही वणवण
राज - मराठी
राज -
मराठी चा करतो रोज 'उदो उदो'
राजकारणाच्या चुलीत भाजतो माझी भाकरी
तुला कसली दुर्बुद्धी सुचली जयाबाई
मला तू आयती मिळाली बकरी
जया -
राज बेटा, तू तुझी भाकरी खुशाल भाज
मी थोडं बोलले आणि माफीही मागितली
पण तुझ्याच चुलीत माझी ख्रीरही शिजली
कारण माझ्या 'द्रोणा'ला फुकट प्रसिद्धी मिळाली !
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८