'चिंटू' या धमाल चित्रपटाच्या शुभारंभाचे खेळ गुरुवार दि. १७ मे, २०१२ रोजी मुंबईत पीव्हीआर (फिनिक्स मॉल), लोअर परेल इथे आणि शुक्रवार दि. १८ मे, २०१२ रोजी पुण्यात सिटिप्राइड अभिरुची इथे आयोजित केले आहेत.
हे दोन्ही खेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहेत.
या खेळांची काही तिकिटं आपल्याकडे आहेत. मायबोलीकरांच्या मुलांसाठी ही तिकिटं उपलब्ध आहेत.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळांना उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'चिंटू'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी तुमच्या मुलांना मिळणार आहे.
या खेळांस आपल्या मुलांना पाठवू इच्छिणार्यांनी कृपया माध्यम प्रायोजकांना मायबोलीच्या संपर्कसुविधेतून इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.
एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याचे कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद.
एकच तिकिट..... ?
एकच तिकिट..... ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)