ढिस्क्लेमर
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी
३.हि पाक्रु टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" ,
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता
ओक्के
आता साहित्य
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता)
२. फोडणीच साहित्य ( मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला)
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
४. चार वाट्या पाणी
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला)
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे
हे सर्व साहित्य
ओक्के
आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा
आता एका भांड्यात कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा .
बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा ..
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा..
इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा.
आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा..
साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार
खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो
सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो..
खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले
@मामे सत्य म्हणजे ट्रुथ ग
@मामे
सत्य म्हणजे ट्रुथ ग
आता अजून किती बाजार उठवशील
बाकी पुढील वेळी किचन स्वच्छ करणेची काळजी घेण्यात येईल, वेळ मिळाल्यास
@ उदय : वरणात पाणी जास्त का झाल हे अचूक सांगितलस
Pages