ढिस्क्लेमर
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी
३.हि पाक्रु टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" ,
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता
ओक्के
आता साहित्य
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता)
२. फोडणीच साहित्य ( मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला)
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
४. चार वाट्या पाणी
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला)
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे
हे सर्व साहित्य
ओक्के
आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा
आता एका भांड्यात कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा .
बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा ..
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा..
इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा.
आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा..
साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार
खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो
सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो..
खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले
पण बाहेर टीवी बघताना आपण
पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच
=))
=))
=))
प्रसन्न दादा लैच भारी
नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन
नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी >>>>
बॅचलरांसाठी दीपिका नेहमीच घातक ठरलीय !!!
ह्या ह्या
ह्या ह्या
ए हे नक्की खरे ना की काही नवे
ए हे नक्की खरे ना की काही नवे फोटोशॉप किडे ?

छान लिहिलय्स रे
@ अवल : नाही ग हे खरय
@ अवल :
नाही ग हे खरय
मस्त लिहीलय. खिचडी दिसत्येय
बॅचलर खिचडीत मीठ नसतं का?
बॅचलर खिचडीत मीठ नसतं का?
एक फुकाची टीप - ह्या बॅखित काळ्या मसाल्याऐवजी फ्रिजच्या कोपर्यात सापडला तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घालून पहा.
प्रसन्न
प्रसन्न
>>आपण बॅचलर असल्याची हि
>>आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजाव>><<
विपू बंद ठेवा की मग काही दिवस..
असे लिह्ले नसते तर धडाधड विपू आल्या असत्या की काय?
अहो झम्पी आत्ताच्या लग्नाच्या
अहो झम्पी आत्ताच्या लग्नाच्या जीवघेण्या स्पर्धेत ;)टिकून राहायचं असेल तर जेवण येण हा खूप मोठा प्लस पोइंत ठरतो
पाकृ बेस्ट लिहीली आहे!! अजुन
पाकृ बेस्ट लिहीली आहे!! अजुन येउद्या!!
कृती एकदम आवडली.... आणि सहज
कृती एकदम आवडली.... आणि सहज सोप्या भाषेत तुम्ही येथे दिलेली आहे धन्यवाद.
सर्व फोटो छानच आहेत, शेवटुन दुसरा फोटो बघुन जेवल्यानंतरही मला आता भुक लागली आहे.
अहो झम्पी आत्ताच्या लग्नाच्या
अहो झम्पी आत्ताच्या लग्नाच्या जीवघेण्या स्पर्धेत ;)टिकून राहायचं असेल तर जेवण येण हा खूप मोठा प्लस पोइंत ठरतो
---- स्वच्छतेची (भांडी घासणे, घराची साफ आणि कपडे धुणे) आवड असणे हा अजुन एक प्लस पॉइंट ठरतो- स्वनुभव
पाकृ आवडली. पण तुमचे कोचे
पाकृ आवडली. पण तुमचे कोचे पडलेल्या ताटलीकडे पाहुन बॅचलर असाल वाटत नाहि. बहुदा गर्लफ्रेंड येत असेल कधीमधी भांडायला

>>>>>पण तुमचे कोचे पडलेल्या
>>>>>पण तुमचे कोचे पडलेल्या ताटलीकडे पाहुन बॅचलर असाल वाटत नाहि. बहुदा गर्लफ्रेंड येत असेल कधीमधी भांडायला
मेलो मेलो =)) =)) =))
__/\__
सह्ह्हीए!!!!! खमंग खिचडी,
सह्ह्हीए!!!!!

खमंग खिचडी, खमंग पाकृ आणि तितक्याच खमंग प्रतिक्रिया.
तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल
पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच >>>>>:हहगलो:
बॅचलरांसाठी दीपिका नेहमीच घातक ठरलीय !!!>>>>>>दिनेशदा
वर्षा
जेवण येण हा खूप मोठा प्लस
जेवण येण हा खूप मोठा प्लस पोइंत ठरतो
>>>>>>>>>>>जेवण येण्यात कसला आलाय प्लस पॉइंट? ते बनवता येणं + पॉइंट असेल तर समजू शकते!
असो..........काही तपं फोडण्या केल्या आहेत. (स्वयंपाक! जेवण नव्हे...ते काय कुणीही करेल!!!)
आता एकदा कच्कून फोडणी हा प्रकार करून बघावा म्हणते!
पण प्रसन्न........... भारीच लिहिलंस!
आणि हो.......मुलगाही सध्या गृहकृत्यक्ष असावा लागतो!
आणि ते टोमॅटोचे प्रेत वगैरे! व्वा!
खिचडी आणि पाकृ दोन्ही खमंग
खिचडी आणि पाकृ दोन्ही खमंग आहे!
फारच मस्त दिसते आहे खिचडी!!!
फारच मस्त दिसते आहे खिचडी!!! आणि जीर्याचा फोटो एकदम कातिल आला आहे. हे तर पुर्ण अन्न झालं. अगदी पानावर बसावंसं वाटतं आहे!!! तों.पां.सु.
एका बॅचलरने केलेली खिचडी वाटत
एका बॅचलरने केलेली खिचडी वाटत नाही
जरा खूपच नीट झाली आहे!मस्त!
धन्स अंशा
धन्स अंशा
नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन
नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी >>>>
बॅचलरांसाठी दीपिका नेहमीच घातक ठरलीय !!!>>>
मस्त आहे खिचडी...!!
हापिसातल्या मित्रांना पण
हापिसातल्या मित्रांना पण दाखवल
मेले हसून हसून
तो जिर्याचा फोतु भारीच
तो जिर्याचा फोतु भारीच
धन्स सारीका बन्या
धन्स सारीका बन्या
भर्रीच्च आहे लगे रहो
भर्रीच्च आहे
लगे रहो 
मस्त दिसतेय खिचडी.
लगे रहो! ते फुलावर वाईच जरा
लगे रहो!
ते फुलावर वाईच जरा स्वच्छ करुन घेत जावं रे दादा!
ते फुलावर वाईच जरा स्वच्छ
ते फुलावर वाईच जरा स्वच्छ करुन घेत जावं रे दादा!
---- प्रसन्न फुलावर फोटोशॉप मधे स्वच्छ करता येत असतील तर बघ आता...
भन्नाट लिहिलंय! खिचडीच्या
भन्नाट लिहिलंय!
खिचडीच्या भांड्याचं नॉनस्टिक कोटिंग गेलंय निघून! आता नवं घ्या!
Pages