पगार

Submitted by manohar vibhandik on 3 May, 2012 - 13:33

पगार

दादा मला
फुगा हवा ...

वडील हसायचे
म्हणायचे ,
घेऊ पगाराला ...

दादा मला हवा
ड्रेस नवा ...

वडील हसायचे
म्हणायचे
घेऊ पगाराला ...

दादा मला
पगार हवा ,

वडील माझे
हसले नाहीत
काही बोलले नाहीत ,

त्यांचे डोळे
भरून का यायचे ,
मला तेव्हा कळले नाही !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दादा मला
पगार हवा ,

वडील माझे
हसले नाहीत
काही बोलले नाहीत ,

त्यांचे डोळे
भरून का यायचे ,
मला तेव्हा कळले नाही !

काळजाची कळ सांगणार्‍या ओळी . खूप सुंदर कविता .