डब्यात नाश्ता काय द्यावा?

Submitted by मिनू on 2 May, 2012 - 01:15

नमस्कार लोक्स.
मला पडलेला प्रश्न हा सर्वच आयांचा कॉमन प्रश्न आहे.
सकाळी ७ पासून शाळेसाठी घर सोडणार्‍या मुलांना डब्यात नाश्ता काय द्यावा?
नाश्ता असा असावा की जो गरम नाही खाता आला तरी फार फरक पडू नये. तसेच बनवायला सोपा असावा व वेळकाढू (पटकन बनणारा) नसावा.
माझ्या मते पोहे, उपमा, शिरा, डोसे हे पदार्थ गरमच चांगले लागतात. म्हणून मी ते खालील यादीत देत नाहिये.
मला सुचलेले पदार्थ मी खाली देत आहे.
१. अप्पे (गोड, तिखट)
२. पराठे (आलू, कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी इ.)
३. ईडली चटणी
४. उत्तप्पे
५. थालीपीठ
६. ढोकळा
७. मुठिये (मेथी, दुधी इ)
८. सँडविच
९. पुरी - बटाट्याची भाजी
१०. तिखट मीठाच्या पुर्‍या
११. ताज्या भाताचा फोडणीचा भात
१२. कटलेटस
१३. हराभरा कबाब, आलू टिक्की इ.

तुम्हीसुद्धा यात नवनवीन पदार्थांची भर घाला.
असं जर आपण आधीपासून ठरवून ठेवलं तर डबा बनवणं किती सोप्पं होउन जाईल नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रताळ्याचे पराठे करता येतील.
रताळे सोलुन किसुन घ्यावेत. फ्रायपॅनमधे थोड तुप घालुन परताव. व थोड दूध घालुन शिजवाव. नंतर त्यात साखर घालुन एकजीव होइ पर्यंत परताव. त्यात आवडीप्रमाणे जायफळ, वेलदोडे, केशर घालुन गोळा बनवुन घ्यावा तो फ्रीजमधे किंवा बाहेरहि ठेवता येतो.. जेव्हा पराठे करायचे असतील तेव्हा पुरणाच्या पोळीप्रमाणे कणिक भिजवावी. व हे रताळ्याच पुरण भरुन पोळी लाटुन तव्यावर तुप घालुन खरपुस भाजावी. थंडहि चांगली लागते.२-३ दिवस टिकते

Pages