नमस्कार लोक्स.
मला पडलेला प्रश्न हा सर्वच आयांचा कॉमन प्रश्न आहे.
सकाळी ७ पासून शाळेसाठी घर सोडणार्या मुलांना डब्यात नाश्ता काय द्यावा?
नाश्ता असा असावा की जो गरम नाही खाता आला तरी फार फरक पडू नये. तसेच बनवायला सोपा असावा व वेळकाढू (पटकन बनणारा) नसावा.
माझ्या मते पोहे, उपमा, शिरा, डोसे हे पदार्थ गरमच चांगले लागतात. म्हणून मी ते खालील यादीत देत नाहिये.
मला सुचलेले पदार्थ मी खाली देत आहे.
१. अप्पे (गोड, तिखट)
२. पराठे (आलू, कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी इ.)
३. ईडली चटणी
४. उत्तप्पे
५. थालीपीठ
६. ढोकळा
७. मुठिये (मेथी, दुधी इ)
८. सँडविच
९. पुरी - बटाट्याची भाजी
१०. तिखट मीठाच्या पुर्या
११. ताज्या भाताचा फोडणीचा भात
१२. कटलेटस
१३. हराभरा कबाब, आलू टिक्की इ.
तुम्हीसुद्धा यात नवनवीन पदार्थांची भर घाला.
असं जर आपण आधीपासून ठरवून ठेवलं तर डबा बनवणं किती सोप्पं होउन जाईल नाही का?
चांगला विषय... मला ते वरचं
चांगला विषय... मला ते वरचं खाणं वेका नसण्याचं लिहिलंय त्यामुळे जरा जास्तच आवड्ला ..
मुलांच्या ड्ब्यात द्यायचं
मुलांच्या ड्ब्यात द्यायचं असल्याने फक्त व्हेज रेसिपीच चालतील ना. निदान देशात तरी.
मी बाळांचा खाऊ, असा एक लेख
मी बाळांचा खाऊ, असा एक लेख लिहिला होता. त्या लेखात आणि त्यावरच्या
प्रतिक्रियेत, बरेच पदार्थ सापडतील.
लाडू, वड्या हे पदार्थ खास या कारणासाठीच बनवायला सुरवात झाली.
सुका मेवा आणि फळांचा पण विचार व्हायला हवा. ताजी फळे, न कापता द्यावीत.
मूलांना ती नीट सोलून खायला शिकवावे. फळे सुद्धा नीट चावून चावूनच खायची
असतात. केळी, चिकू, पेरू, बोरे, सफरचंद, पीच, द्राक्षे, संत्री, चेरीज, लिची अशी अनेक फळे, ऋतूमानानुसार अवश्य द्यावीत.
उप्स... शाकाहारी धागा आहे की
उप्स... शाकाहारी धागा आहे की हा..थांबा वरचंं संपादित करुन टाकते..
एक अनुभवः कोणत्याही इतर
एक अनुभवः
कोणत्याही इतर पदार्थापेक्षा (चवीला कंटाळवाणी असली तरीही) पोळीभाजी दिलेली उत्तम असावी. त्याने खरंच शरीराला ताकद मिळते आणि पोट भरल्याची खरी जाणीवही होते. मग चवीसाठी थोडे लोणचे, जॅम वगैरे सोबतीला.
पण रोज पोळीभाजी आपल्याला पण
पण रोज पोळीभाजी आपल्याला पण किती बोअर होते खायला!!
मग मुलांचा तर उजेडच खाण्याचा!!
माझा मुलगा सकाळी ७ ला घरातून
माझा मुलगा सकाळी ७ ला घरातून निघतो. त्याची शाळा ८ ची असते. घरी येतो १२ पर्यंत. त्यामुळे सकाळचा नाश्त्याचा डबा. दुपारी जेवायला घरी असतो त्यामुळे तेव्हा पोळी भाजी असते. मग तेच डब्यात द्यायला नको वाटते. तो ५ वर्षाचा आहे त्यामुळे फळे सोलून खाता येत नाहीत. लाडू, वड्या हे बसमधे खायच्या डब्यात दिलेलं असतं. कमीत कमी ५ तास घराबाहेर असल्यामुळे नाश्ता पोटभरीचा आणि बसमधले खाणे हे घरी येईपर्यंत तग धरण्यासाठीचे असावे असं मला वाटतं.
पॅनकेक, धिरडी देता येतील. ओटस
पॅनकेक, धिरडी देता येतील. ओटस आणि कणीक भाजून लाडू पण पौष्टिक आणि पोटभरीचे होतात.
मेधा यांचा पण सेम याच
मेधा यांचा पण सेम याच विषयावरचा एक धागा आधी आहे ना याच ग्रूप मध्ये कुठेतरी.
धिरडी सुद्धा मउ पडतात ना? की
धिरडी सुद्धा मउ पडतात ना? की क्रिस्प रहातात?
मिनू माझा पण सेम प्रॉब्लेम
मिनू माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. शाळेत स्नॅक्स मिळतात पण अवेलेबल वेळात चार मजले उतरून
खाली जाऊन वडापाव नाहीतर समोसे खाणे रोज जमतच नाही. सध्या तिमि पुरी, फोड्णी भात. ह्यावरच चालू आहे. सँड्विच. नाहीतर रस्क वर बटर चोपडून. ( हे का आवड्ते ते कळत नाही)
आलू भुजिया, व चॉको लोट्टो पाय नामक गोड पदार्थ पण आवडीने खाल्ला जातो. सवडीने लिहीते.
बरोबर पाण्याच्या बाटलीत टँग द्यावे. मुले दमतात तेव्हा थोडे गार गोड बरे वाटते.
आजकाल अग्रजसारख्या
आजकाल अग्रजसारख्या उत्पादनांचे भाजके गहू, इतर धान्ये मिळतात. ज्वारी लाह्या/ साळी लाह्या / मका लाह्या, मखाणे, लाह्यांचा चिवडा, चुरमुरे / पातळ पोहे / भाजके पोहे / मका चिवडा, सोया चिप्स, बेक्ड चिप्स इत्यादी. बटाट्याचा / रताळ्याचा कीस / चिवडा.
पोळीच्या चुर्याचा लाडू (मला शाळेत असताना खूप आवडायचा)
ब्रेडच्या चुर्याचा चिवडा / उपमा
काकडी, गाजराच्या चकत्या. सफरचंद, पेरू, जांब, जांभूळ, द्राक्षे यांसारखी धुवून खाता येतील अशी फळे धुवून कोरडी करून पॅक करून देणे. कोवळ्या मटारच्या शेंगा. भाजलेल्या / उकडलेल्या - हळद मीठ लावलेल्या भुईमूग शेंगा. कोवळ्या, हिरव्या हरभर्याचे घाटे. उकडलेले दाणे.
चुरमुरे, बत्तासे, फुटाणे, भेळभत्ता (कोरडी भेळ), कधी खारे दाणे. किंवा भाजलेले दाणे + गूळ. चिक्की. भाजलेल्या बॉबी. सुका मेवा, फुटाण्याचे / पंढरपुरी डाळे, सुक्या खोबर्याचे भाजलेले काप, फणसाच्या आठळ्या उकडून, सोलून. राजगिरा लाडू / वड्या / चिक्की. खजूर. उकडलेला बटाटा / रताळे .
कणीक तुपावर भाजून त्यात पिठीसाखर, थोडा तळलेला डिंक, सुकामेवा, सुके खोबरे इत्यादी घालून कोरडेच (लाडू न वळता) देणे.
कधी पापडाच्या लाट्या, पोह्याच्या पापडासाठी कालवलेले पीठ, गव्हाचा चीक (नुसताच खायला आवडत असला तर)
भिजवून शिजवलेले काबुली चणे / छोले उकडून - सोबत मीठ मिरपूड पुडी / फोडणीत परतून. किंवा इतर मोड आलेली कडधान्ये / स्वीट कॉर्न उकडून.
वेगवेगळ्या प्रकारची कटलेट्स : गाजर, बीट, बटाटा, पोहे, मका, मटार, ब्रेड, भात, हिरव्या भाज्या, फळभाज्या, वेगवेगळी पिठे वापरून केलेली.
लिहा ग बायांन्नो पटापटा. मला
लिहा ग बायांन्नो पटापटा. मला रोजच हा प्रश्न पडतो.
मिपावर पोळीच्या लाडवाची मस्त
मिपावर पोळीच्या लाडवाची मस्त रेश्पी आहे.
माझा अतिशय आवडता पदार्थ :
माझा अतिशय आवडता पदार्थ : ताज्या भाताचा फोडणीचा भात/फोडणीची पोळी-चपाती/फोडणीची भाकरी
मी भाज्या टाकलेल्या ईडल्या
मी भाज्या टाकलेल्या ईडल्या करते माझ्या लेकीसाठी. ईडलीचं पीठ एकदम घट्ट करते, एनवेळी ज्या भाज्या आहेत घरी त्या बारीक खिसुन किंवा पेस्ट्/प्युरी करुन पीठात मिसळते. आज तिला डब्यात जांभळी पत्ताकोबी पेस्ट टा़कुन केलेली जांभळी ईडली दिली होती. कधी पालकची हिरवी, गाजराची अबोली, बीटरुटची लाल-गुलाबी, कधी हळदीची पिवळी असे वेगवेगळे रंग असलेल्या ईडल्या माझ्या लेकीला व तिच्या मित्र- मैत्रीनींना आवडतात.
छान ऑप्शन्स आहेत
छान ऑप्शन्स आहेत
http://www.maayboli.com/node/7044 इथे पण बघा.
हा धागा नंतर शोधणे महाकठीण.
हा धागा नंतर शोधणे महाकठीण. डबा , नाश्ता अशा काही शब्द्खुणा टाकल्या तर सोपे होइल शोधायला. दिनेशदांचा धागा http://www.maayboli.com/node/28243 .
पराठे, सँड्वीच , जाम्/बटर
पराठे, सँड्वीच , जाम्/बटर ब्रेड सोडुन अजून एक प्रकार आहे जो मुलगा मस्त संपवतो.
ऑलीव्ह तेलात लसूण आणि कोबि, गाजर, सिमला, बिन्स किंवा तत्सम भाज्या (रात्री कापून ठेवायच्या) परतून त्यात सोया सॉस्/केचप टाकायचे. पोळी किंवा ब्रेडला भाजून त्यात भाजी ओतायची, वर चिझ ची स्लाईस ठेवून वितळू द्यायची.
हे अगदी झटपट होते. आणि थंड पण छान लागते.
स्वीस रोस्टी पण चांगला ऑप्शन आहे, हॅश ब्राऊन सारखा लागतो.
फ्रँकी देता येइल का. रोटी व
फ्रँकी देता येइल का. रोटी व चिकन रॅप.
पुडींग, शेवयांचा गोड, तिखट
पुडींग, शेवयांचा गोड, तिखट शिरा, मुगाचा ढोकळा, गुळपापडी, साखरेची पोळी, गुळाची पोळी, सांज्याची पोळी , आम्लेट पोळी...
मुगाचे लाडू, डिंकाचे लाडू
मुगाचे लाडू, डिंकाचे लाडू करुन ठेवता येतात व पौष्टिक आणि पोटभरीचे होतात
बाकरवड्या...जोडीला
बाकरवड्या...जोडीला खजूर...तिखट व गोड दोन्हीही देता येईल
तांदूळ आणि सर्व प्रकारच्या
तांदूळ आणि सर्व प्रकारच्या डाळी ४:२ या प्रमाणात दळून आणायच्या आणि त्याची तिखट, मीठ घालून धिरडी करुन देता येतील डब्यात. पौष्टिक पण आहे, झटपट पण होतात आणि पीठ कितीही दिवस टिकते.
कणकेचे लाडु / गुळपापडी,
कणकेचे लाडु / गुळपापडी, चिक्की, खारी बुंदी, शेव पापडी, पापड, सॅलड, मखाना, ड्रायफ्रुटस, वाफवलेला बटाटा (फ्रेंच फ्राईज सारखा) हे पण साईड फुड म्हणुन चांगले ऑप्शन आहेत.
मेन कोर्स मधे वेगवेगळि धिरडी, डोसे, उपमा, पोहे, शेवयांचा उपमा (मॅगी मसाला + वाटाणे टाकुन), पराठे, पुर्या, पुलाव, इडली हे बरे पडते.
शक्यतो मी जाम देत नाही, का कोण जाणे मला ती पोळी / ब्रेड नंतर वातट वाटते मग मुले कशी चावुन खातील
असे वाटते.
हिरकणी: शब्द खुणा
हिरकणी: शब्द खुणा टाकते.
अश्विनीमामी: मला असं वाटतं की फ्रँकीची पोळी आतल्यअ भाजीमुळे ओलसर होते आणि गिचगिचित लागते. मला नाही आवडत.
पराठे, ढोकळे, ईडल्या यांचे असंख्य प्रकार करता येतात.
हे सगळे मी माझ्या मुलाला देते
हे सगळे मी माझ्या मुलाला देते डब्यात … बघा वाचून
१. रात्री बटाटा उकडून घेता येतो सकाळी बटाट्याचा पराठा आणि दही द्यायचे
२. पालक, छोटा आल्याचा तुकडा एक मिरची आणि एक टोमेटो उकळत्या पाण्यातून काढून मिक्सर मधून बारीक करायचे आणि त्यात पीठ, जीर पुड आणि मीठ घालून मळून ठेवून द्यायचे फ्रीज मध्ये दुसरे दिवशी सकाळी मस्त हिरव्या हिरव्या पालक पुरया तळून काढाव्यात … शेंगदाणा दही किंवा डाळीच्या चटणी सोबत डबा भरून द्यावा
३. अगदी याच पद्धतीने बीट घालून पुऱ्या कराव्यात. मस्त लाल-गुलाबी रंगाच्या पुऱ्या आकर्षक वाटतात मुलांना.
४. रात्री दही घुसळून त्यात रवा भिजवून ठेवावा … सकाळी या भिजलेल्या रव्याचे डोसे, इडली, उत्तपम किंवा अप्पे अगदी काहीही करता येतात.
५. सकाळी अर्धा कप रवा, त्यात एक बटाटा धुऊन किसायचा, एक छोटा कांदा, टोमेटो सगळं किसून घालायचं (किसून घातलं कि मुलांना वेगळं काढून ठेवायला मार्ग उरत नाही खावेच लागते) यात फटाफट मीठ, मसाला घालून डोस्या सारखे तव्यावर बनवायचे …. चविष्ट आणि झटपट बनणारा पदार्थ आहे.
६. एक अंड, दोन चमचे साखर, ४ चमचे मैदा, थोड दुध घालून फेटून घ्यायचं नोंस्टिक वर बटर लावून त्यावर हे ओतायचं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं…मुलांचा आवडता Pancake तयार. अंडी खात नसतील तर विना अंड कोको पावडर घालून हि करता येते.
७. सोया चंक भिजवून ते कुठल्याही कुठल्याही उसळीत, भातात घालून तयार करावे.
८. कोणतेही मोड आलेले कडधान्य म्हणजे चवळी, चणे, मटकी किंवा मग सारे एकत्र एका वाफेवर कुकरमधून काढावे (कोरडेच) त्यात काकडी, कांदा, टोमेटो, कोथिम्बिर बारीक चिरून घालावी चाट मसाला आवडत असल्यास जरा तिखट भुरभुरावे वरून डाळिंबाचे भरपूर दाणे आणि मक्याचा गोड आंबट चिवडा किंवा शेव घालून मुलांना डब्यात किंवा असेच खायला द्यावे …. (अप्रतिम चवीची आणि पोष्टिक भेळ तयार होते हि मोठ्यांनाही खायला खूप आवडते)
९. भाज्या एकत्र करून (कोबी,फ्लोवर, गाजर, वाटाणा, सगळे बारीक चिरून आणि बटाटा उकडून कुस्करून घ्यावा) त्यात चाट मसाला वगैरे घालून तयार ठेवावे. एका भांड्यात मैदा=कॉर्णफ्लोर घट्टसर भिजवून घ्यावे. ब्रेडवर भाज्यांचे मिश्रण नित बसवून त्यावर चमच्याने मैदा मिश्रण पसरवून टाकावे (एकाच बाजूने) आणि नंतर ते गरम तेलात ब्रेड चा भाग खाली राहील असे सोडावे आणि पळीने वर तेल लोटावे मिश्रण नित बसलाय अस वाटल कि ब्रेड भाज्यांच्या बाजूने पालटवून खरपूस तळून घ्यावे, हाही प्रकार सांगायला वेळ लागला तरी साहित्य तयार असल्यास चटकन बनतो.
१०. चीज पराठा + दही
प्राप्ती भारी लिस्ट आहे
प्राप्ती भारी लिस्ट आहे
आमच्याकडे
एग सँडवीच(ब्रेड मस्त बटर लाऊन भाजलेला), साईडला लेट्युस, काकडी/गाजर रांचसोबत
बरीटो - ऑलिव्ह, लेट्युस आणि चिकन
न्युट्रिला सँडवीच, साईडला लेट्युस, काकडी/गाजर रांचसोबत
व्हेजी/चिकन पॅटी सँडवीच विथ लेट्युस आणि टोमॅटो, साईडला अॅपल सॉस
ह्यातलचं एक रिपिट पाचव्या दिवशी किंवा कॅफेटेरीया
स्नॅक्मधे रोज एक फळ आणि थोडे होल ग्रेन क्रॅकर्स
प्राप्ती, छान. ४ मधे सोडा
प्राप्ती, छान. ४ मधे सोडा वगैरे नाही ना लागत?
हे पण बघा
हे पण बघा
http://www.maayboli.com/node/46396
Pages