चैत्र सरला, वैशाखाचा वणवा फुलला
वाटेवरचा 'तो' गुलमोहर
'तिला' पाहुनी थोडा डोलला, आतून हलला
सळसळ त्याची वादळी भासली,
तळमळ त्याची तिजला दिसली,
एक फांदी किंचित कलली
झुकून तिच्या कानी गुजली
" कोणा वाटेल बहर
कोणी वदेल आरक्त
डोळ्यातून सांडतेय माझ्या
मलाच जाळणारे माझेच रक्त "
त्यावर 'ती' 'त्याला' वदली
" किती रे तू मनी तडफडशी
आक्रंदित तू का धडपडशी
रणरणत्या या भर दुपारी
कोणता सल ठेवलायस उरी "
प्रश्नाने तो मनी चुटपुटला
पानगळी सम सहजच बोलला,
" राहू दे मजला असेच जळत
स्पर्शाने तुझ्या कोसळेन नकळत "
त्यावर 'ती''त्याला' वदली
" आलेय न मी झुळूक बनून
फुंकर घालीन तुझीच होऊन,
सांडल्यात तुझ्या पाकळ्या थोड्या
मजसाठी आहेत त्या पायघड्या,
सप्तपदीचे फेर गुंफिन
सळसळीवर ताल धरीन
वैशाखाचा शिशिर करीन "
ऐकून तिची ती कुजबुज
मनोमनी तो गेला वरमून
सळसळ देखील झाली निशब्द
माथ्यावरची उन्हे हि स्तब्ध
अजूनही जेंव्हा वैशाख येतो
वादळ वारा झुळूक बनतो
वाटेवरचा 'तो' गुलमोहर
फक्त ' तिचीच ' तर वाट पाहतो
सुपर्ब
सुपर्ब
मस्त आहे. आवडली.
मस्त आहे. आवडली.
pradyumnasantu - आभारी
pradyumnasantu - आभारी आहे.
वैद्यबुवा - मनपूर्वक धन्यवाद.
किंकर, सुंदर कविता !
किंकर, सुंदर कविता !
प्रज्ञा १२३ - धन्यवाद !
प्रज्ञा १२३ - धन्यवाद !