Submitted by संयोजक on 9 September, 2008 - 21:50
नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
३) एका आयडीवरुन तुम्ही कितीही प्रवेशिका टाकू शकता फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल
४) विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.
आजची जोडी :
लालुप्रसाद यादव आणि राबडीदेवी
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राबडी
राबडी :
आमचे हे बसले इंजिनात
आणि रेल्वे झाली चालू
राव-बीव नाही लावत
आणि नाव घेते लालू
लालू:
हामरे बिहारकी जनता
हाये लई भाबडी
हम लडते इल्याक्शन
आन गादीवर बसते राबडी
lol... मस्त..
lol... मस्त..
अरे वा ....
अरे वा .... सेनापती.... एक नंबर!
लालू: स्वतं
लालू:
स्वतंत्र भारताचे पुढारी आम्ही
आम्हाला भीती कशाची
राबडी सोबत असताना
कशांस तमा राष्ट्रगीताची ?
राबडी:
स्वर आले दुरुनी
अर्थ कळेना कधीपासूनी
लालू कडून आज्ञा नाही
मग का उठावे एका गाण्यासाठी ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गणपती बाप्पा मोरया ..........
राबडी
राबडी :
राष्ट्रगीत चालू असताना
उभे राहती सामान्य लोक
अन् लालूरावांचं नाव घेते
मी मात्र बसूनच बिनधोक
.
लालू :
लाल लाल खुर्च्या
त्यात पांढरा पांढरा सोफा
राबडीचं नाव घेऊन देतो
तिला आख्या राष्ट्राचा तोहफा
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
राबडी
राबडी :
राष्ट्रगीत बिष्ट्रगीत
मला नाही म्हाईत
लालूंच नाव घेते
रेल्वे मिनीष्टर हाईत
लालू :
का समझत हो
महाराष्ट्र है बिहारके लिये
राबडी का नाम लेताहूं
सिएमकी कुर्सी के लिये
रबडी -
रबडी -
भैसवा का दूध निकालते देखा
चारा ही नजर नही आया
अजी सुनते हो लालूजी?
कही आपने तो नही खाया?
लालू -
मेनेजमेंट का लेक्चरवा देने
हम गये आयआयएम और हार्वर्ड ..
धत, रबडी एकदम है बैकवर्ड
पर हम है एकदम फारवर्ड
लालू -- कशास
लालू --
कशास बाळगू तमा कुणाची
कुणास पडली लाज मनाची?
वाट पाहतो मी अन् राबडी
राष्ट्रगीत एकदाचे संपण्याची
----------------------
राबडी
बसून बसून दमले ग बाई
लालूजींना समजत नाही
आधीच गाणे उमजत नाही
त्यात दिले वर कागद हाती
-----------------------
राबडी:- एके
राबडी:-
एकेक अक्षर जुळवून,
वाचायचा किती हा त्रास बाई,
कसला समारंभ्,कसलं काय,लालूजी,
मला ह्यातलं काय बी कळत न्हाई.
लालू:-
किती गहन, किती क्लिश्ट हे,
कधी वाचून संपणार?
राष्ट्रगीत चालू झाले...,
राबडी, तू कधी उठणार?
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८