Submitted by निंबुडा on 27 April, 2012 - 04:55
माझी पहिली अष्टाक्षरी
युगानुयुगे संपली
तुझीच वाट पाहिली
खुळी ही राधिका तुझी
पहा खुळीच राहिली
षड्ज भावनेतले
न मागता तू जे दिले
तुझ्या सुरांत नाहण्या
मनी जपून ठेविले
सावळ्या गगनातला
पयोद हा निनादतो
तुझेच रुप लेवुनी
तना-मनात सांडतो
तू एकदा फिरून ये
हे एव्हढेच मागणे
अन् पुनश्च वर्षु दे
अमोघ प्रीत-चांदणे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शाब्बास! पहिला प्रयत्न आवडला
शाब्बास!
पहिला प्रयत्न आवडला
आवडली अष्टाक्षरी..... षड्ज
आवडली अष्टाक्षरी.....
षड्ज भावनेतले
न मागता तू जे दिले
तुझ्या सुरांत नाहण्या
मनी जपून ठेविले>>> बेस्ट....
वा! सगळीच आवडली
वा!
सगळीच आवडली नेहमीप्रमाणेच
पण
तू एकदा फिरून ये
हे एव्हढेच मागणे
अन् पुनश्च वर्षु दे
अमोघ प्रीत-चांदणे
हे जास्त
पयोद म्हणजे ढगच ना?
खूप छान....
खूप छान....
पयोद म्हणजे ढगच ना? >> हो गं.
पयोद म्हणजे ढगच ना?
>>
हो गं. पयोद, जलद म्हणजेच ढग!
षड्ज भावनेतले न मागता तू जे
षड्ज भावनेतले
न मागता तू जे दिले
तुझ्या सुरांत नाहण्या
मनी जपून ठेविले>>. वाह, आवडेश
मस्त गं निंबे, शेवटाची विशेष
मस्त गं निंबे, शेवटाची विशेष आवडली
छान.
छान.
सुंदर
सुंदर
प्रयत्न चांगला आहे
प्रयत्न चांगला आहे
गुड वन.......!!!!!!!
गुड वन.......!!!!!!!
आशय छानच आहे, मांडलाय पण
आशय छानच आहे, मांडलाय पण चांगला.... कविता आवडली.
पण,
अष्टाक्षरीमधे पहिल्या दोन शब्दांनंतर 'यति' (किंचितसा पॉज) असणे आवश्यक असावे असे माझे अवलोकन आहे.
ही कविता "अरे संसार संसार" या चालीवर म्हणून पहावी.
ज्या ज्या ओळीत पहिली दोन अक्षरे आणि उरलेली सहा
अशी सहज तोडून म्हणता येत नाहीत त्या त्या ठिकाणी अड्खळल्यासारखे होते.
याबाबत तज्ञांचा सल्ला घ्यावा.
अष्टाक्षरीमधे पहिल्या दोन
अष्टाक्षरीमधे पहिल्या दोन शब्दांनंतर 'यति' (किंचितसा पॉज) असणे आवश्यक असावे असे माझे अवलोकन आहे.
>>>
शब्दांनंतर की अक्षरांनंतर??
ह्या कवितेची माझी चाल "अरे संसार संसार" ची नाही. मी ज्या चालीत म्हणतेय त्यात अडखळल्यासारखे वाटत नाहीये. पन दुर्दैवाने त्या चालीचे दुसरे उदाहरण मला देता येत नाहीये.
प्रत्येक वेळी पहिल्या २ अक्षरांनंतर पॉज द्यायचा असेल तर पहिला शब्द हा २ अक्षरीच असावा लागेल. अष्टाक्षरीत असा नियम आहे का? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
चाल 'अरे संसार' चीच असायला
चाल 'अरे संसार' चीच असायला हवी असे नाही निंबुडा, पण लयीत म्हणता यायला हवेय.
दोन तीन तीन, तीन दोन तीन असा अक्षरक्रम ठेवल्यास लय अगदी सहज येते. पहिलाच शब्द पाच वगैरे अक्षरांचा ठेवला की अडखळायला होते.
धन्यवाद!
धन्स, विदिपा. मला वाटतं मला
धन्स, विदिपा. मला वाटतं मला कळलंय तुम्ही आणि उल्हास काका काय म्हणताय ते.
आजच अजून एक अष्टाक्षरी टाकली आहे माबोवर. मला वाटते तुम्ही म्हणताय ती लय त्या कवितेत जास्त चांगल्या प्रकारे पकडता आलीये मला.