Submitted by अनिल तापकीर on 26 April, 2012 - 03:12
नियतीने खेळ मांडिला |
खेळणे केले मानवाला ||
कोणाला बैसविले धनाच्या राशीवरी |
तर कोणाला मिळेना भाकरी |
तिच्यापुढे मानवही झुकला |
नियतीने खेळ मांडिला ||
कोणास मिळे वाहन अलिशान |
कोणाला मिळेना पादत्राण |
नाही न्याय कोणा कळला |
नियतीने खेळ मांडिला ||
नियती अदृश्य शक्ती ईश्वराची |
जगावरी सत्ता तियेची |
महिमा नाही कोणा उमगला |
नियतीने खेळ मांडिला ||
प्रत्येकाला बाहुले बनविते |
आपुलिया छंदे नाचविते |
खेळविणे आवडे तिजला |
नियतीने खेळ मांडिला ||
व्हावया नियती प्रसन्न |
करावे ईश्वराचे स्मरण |
फक्त ईश्वराचा धाक तिजला
नियतीने खेळ मांडिला
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
प्रत्येकाला बाहुले बनविते |
प्रत्येकाला बाहुले बनविते |
आपुलिया छंदे नाचविते |
खेळविणे आवडे तिजला |
मस्तच!
वैशाली नी प्रध्युन्मसन्तु
वैशाली नी प्रध्युन्मसन्तु धन्यवाद
वास्तव मांडायचा चांगला
वास्तव मांडायचा चांगला प्रयत्न.
मांडणीत सफाईदारपणा आल्यास अधिक प्रभावी होईल असे वाटते.
भिडे साहेब शिकायचा प्रयत्न
भिडे साहेब शिकायचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने प्रगति होईल
धन्यवाद,
छान.
छान.
धन्यवाद, मुटे साहेब
धन्यवाद, मुटे साहेब