Submitted by बागेश्री on 10 April, 2012 - 05:41
मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..
मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!
मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!
मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..
मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!
मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!
मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!
असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुरेख
सुरेख
मस्त
मस्त
जाम आवडली डोळ्यांचे द्रोण हे
जाम आवडली
डोळ्यांचे द्रोण हे जास्त आवडलं
सुंदर....!!!!
सुंदर....!!!!
टेक क्षणभर तू ही नको होऊस
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!>>
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
>>
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!>>
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे>>
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!>>
चांगल्या ओळी
'दु:खं' ऐवजी 'दु:खे'ही चालेल, अष्टाक्षरीच असल्यामुळे
शेवटही छान केला आहे.
ही कविता आवडली. 'पाऊस पाऊस' हे सारखे येणे फारसे भावले नाही. अष्टाक्षरीवर पकड आलेलीच आहे तर इतरही वृत्ते हाताळणे आनंददायी ठरेल. भर उन्हाळ्यात पावसावर / पावसाचा उल्लेख असलेली कविता पाहून बरे वाटले.
यात 'नेहमीचेपणा' वाटला नाही हे अधिक आवडले. (शिरोडकरांच्या कवितेवर काल प्रतिसाद दिला नव्हता, पण भुंगांनी म्हणण्याआधीच मला वाटले होते की ती अगदी तुमचीच कविता आहे, असे कसे झाले की मुद्दाम मजा करताय दोघे हे लक्षात न आल्याने तेथे काहीच लिहिले नाही).
शुभेच्छा
शब्दच नाहीत कौतुक करायला.
शब्दच नाहीत कौतुक करायला.
"वादळवाट" मालिकेच्या "कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात" या शीर्षक गीताच्या चालीत वाचली ही अष्टाक्षरी.
अप्रतिम, अप्रतिम - संपूर्ण
अप्रतिम, अप्रतिम - संपूर्ण जमलेली कविता..........
मन पाऊस पाऊस... चिंब ओल झाल
मन पाऊस पाऊस...
चिंब ओल झाल मन कविता वाचून भर उन्हाळ्यात!
अफाट जमलीये कविता...सुंदरच!
अफाट जमलीये कविता...सुंदरच! माझ्या निवडक दहात
छान जमलेय कविता "असे चित्र
छान जमलेय कविता
"असे चित्र पावसाचे,.......त्यांत मावल्या सहज..!
आणि
"मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!" >>>> अधिक आवडलं.
"अगं मनातच होता तुला आज गवसला" ही सिग्नेचर लाइन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
""वादळवाट" मालिकेच्या "कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात" या शीर्षक गीताच्या चालीत वाचली ही अष्टाक्षरी" >>>> ते शीर्षकगीत अष्टाक्षरीच आहे.
सहज सुचलं म्हणून आणखी उदाहरणं देतो.
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई" आणि "फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश"
या देखील अष्टाक्षरीच. वृत्त एकच पण किती वेगवेगळ्या चाली !
छान आहे.
छान आहे.
मस्त जमलीये. हटके.
मस्त जमलीये. हटके.
मन पाऊस पाऊस म्हणे कसा
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!>>>>>>>>
सगळी कविता आवडली पण ह्या ओळी विशेष आवडल्या.
मस्त, आवडली..!!
मस्त, आवडली..!!
सुंदर !! मन इतके बरसे, दु:खं
सुंदर !!
मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!
परफेक्ट !!
परफेक्ट !!
भर उन्हाळ्यात पावसावर /
भर उन्हाळ्यात पावसावर / पावसाचा उल्लेख असलेली कविता.. >>
सर्व प्रथम 'पाउस' या विषयावर कविता लिहल्या बद्दल,
अनेकानेक 'धन्यवाद' !!!!
शेवटी 'गवसला' हा शब्द खटकला.
बाकी अष्टाक्षरी उत्तम.
मनमोहक कविता.
मनमोहक कविता.
वा बागेश्री! सुरेख कविता..
वा बागेश्री! सुरेख कविता..
मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!>> हे खूपच आवडले..
'फक्त नको होऊस पारवा' हे समजले नाही
व्वा!! बागे मस्तच गं
व्वा!! बागे मस्तच गं
सगळ्यांची खूप आभारी आहे!
सगळ्यांची खूप आभारी आहे!
आर्ये, निवडक दहासाठी विशेष आभार
व्वाह! सुंदरच! काही सुट्या
व्वाह! सुंदरच!
काही सुट्या ओळी फारच आवडल्या.
शुभेच्छा!
सगळ्याच अष्टाक्षरी खूप खूप
सगळ्याच अष्टाक्षरी खूप खूप जबरदस्त आहेत.
पण मला आवडलेल्या :
मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..
मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!
मन पाऊस पाऊस म्हणे कसा
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..! >>> अहाहा! जियो
आहाहा... बागुडी.. मस्तच
आहाहा... बागुडी.. मस्तच जमलीये !!!
खूप सुंदर...
माझ्या निवडक १० मधे सामील!
माझ्या निवडक १० मधे सामील! किती सुन्दर लिहावं ग!
तुझ्या कवितेसाठी माझी ही छोटीशी भेट -
पार वाहून चालले
भर वैशाखाचे ऊन
मन पाऊस पाऊस
तुझी कविता वाचून
माझ्या निवडक १० मधे सामील!
माझ्या निवडक १० मधे सामील! किती सुन्दर लिहावं ग!
तुझ्या कवितेसाठी माझी ही छोटीशी भेट -
पार वाहून चालले
भर वैशाखाचे ऊन
मन पाऊस पाऊस
तुझी कविता वाचून
बाग्ज, तुझा आणि माझा आवडता
बाग्ज, तुझा आणि माझा आवडता पाऊस आज खुप दिवसांनी तुझ्या कवितेत आला. पुर्वी पाऊसच पाऊस कवितेत लिहिणारी तु अचानक थांबली होतीस. मी मिस करत होते. तु काय सिझनप्रमाणे कविता लिहितेस का? वाट बघत होतीस ना उन्हाळ्यात लोकांना पावसात भिजवुन टाकायची. वाचुनच मन मस्त थंडगार झालं. सगळ्या अष्टाक्षरी एक से बढकर एक. प्रचंड आवडल्या.
सुन्दर कविता.... फार आवडली.
सुन्दर कविता.... फार आवडली.
Atach tuzi navin kavita "Man
Atach tuzi navin kavita "Man Paus Paus" vacahli.
Jam avadali...keep it up!
Kalave
Apla pankha
note : Kavite madhe evdha paus ahe ki bahutek hya varshi pausala lavkar yenar!
Pages