अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].
ज्ञान, शक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम. आपल्या काळातील अत्याचारी आणि समाजविघातक राज्यकर्त्यांना आणि शक्तींचं निर्दालन करुन समाजजीवन सुरक्षित करणारे चिरंजीव भगवान परशुराम. अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींच्या प्रेरणास्थानांपैकी एक असणारे भगवान परशुराम. पहिला ब्रह्मक्षत्रिय म्हणून ओळखले गेलेले जमदग्नीपुत्र परशुराम.
तरुण पिढीला अशा चिरंजीव परशुरामांचे मूर्त रूपात प्रेरणादायी दर्शन घडावे या हेतूने इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी आणि न्यु मॉडर्न ऑप्टिशियन्स, पुणे चे संचालक श्री. अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी चिरंजीव परशुराम भूमी प्रांगणाची निर्मिती केली आहे. हा प्रकल्प भगवान परशुरामांनीच निर्माण केलेल्या कोकणभूमीत दापोलीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर असलेल्या बुरोंडी या गावात टेकडीवर उभा राहिलेला आहे.
४० फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर श्री. ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी फायबर ग्लास मधे घडवलेली परशुरामांची २१ फुटांची उत्तराभिमुख भव्य मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. पृथ्वीच्या अर्धगोलाकृती अंतर्भागात सप्तचिरंजीवांचे स्मरणस्थान असून त्यात भविष्यात तारांगण आणि बाहेर Optic Garden तयार करण्याची योजना आहे.
कोकणातला एक निसर्गचमत्कार म्हणून ओळखल्या जाणार्या तामसतीर्थ नामक सागरतीराचे या ठिकाणाहून दर्शन होते. समुद्राचा फक्त याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात. चहूबाजूने हिरवाई ल्यालेले पर्वत आणि मधे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा हे दृश्य बघताना भान हरपते.
श्री परशुराम भूमी प्रांगणातून होणारे तामसतीर्थाचे मनोहारी दर्शन:
इतर छायाचित्रे:
चिरंजीव परशुराम भूमी या वास्तूचे शिल्पकार:
डॉ. बाळकृष्ण नारायण दिवेकर, Ph.D, Concrete Technology, पुणे
श्री. हेमंत शरद साठ्ये, B. Arch, पुणे
श्री. पद्मनाभ प्रभाकर लेले, ठेकेदार, AMIE, पुणे
श्री. सुहास गजानन जोशी, B.E., M.Tech, AMIE, पुणे
श्री. सदानंद सुरेश ओक, DCE, पुणे
श्री. आशुतोष आपटे, BFA, पुणे
विशेष सहकार्य:
सौ. मधुवंती व श्री. प्रफुल्लचंद्र देव, इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
सौ. पौर्णिमा व श्री. राजेंद्र मनोहर
सौ. अपर्णा व श्री. अतुल केतकर
श्री. विवेक गोगटे
श्री. पांडुरंग पांगारे
विशेष सूचना: सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी पाचच्या सुमारास बुरोंडी गाठणे इष्ट. जेवण दापोलीतच घ्यावे.
---------------------------------------------------------
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
---------------------------------------------------------
सुंदर माहिती.
सुंदर माहिती.
मंदार, तु बुरोंडीला गेला
मंदार, तु बुरोंडीला गेला होतास.
खुप छान आलेत फोटो. मे महिन्यात गेल्यावर नक्की भेट देणार.
बुरोंडी बंदर, किनारा व्वा. दुष्टा लई आठवण आली बघ गावाची.
माझ्याकडे पण हे फोटो आहेत. झब्बु देवु काय?
सुंदर माहीती आणि छान फोटो
सुंदर माहीती आणि छान फोटो
छान फोटो. कोकणात आता बरेच
छान फोटो.
कोकणात आता बरेच नवनवे प्रकल्प होताहेत, छान वाटलं.
सस्मित, हवे तितके झब्बू दे.
सस्मित, हवे तितके झब्बू दे.
अप्रतिम फोटो, सुंदर माहिती.
अप्रतिम फोटो, सुंदर माहिती.
खरच सुंदर फोटो नि माहिती..
खरच सुंदर फोटो नि माहिती..
तामसतिर्थ अगदि सार्थ नाव.. असा समुद्र कधीच कुठे पाहिला नाहि.
अगदि पहिल्या फोटोत.. पृथ्विगोलावर मंदार दिलीप जोशी असं दिसलं म्हटलं हे मंदारने बनवलं कि काय? मग पुढचे फोटो पाहुन कळलं कि काय नक्की ते
धन्यवाद .............माहिती
धन्यवाद .............माहिती बद्दल आभारि
मंदार .. मस्त फोटो .. एकदा
मंदार .. मस्त फोटो .. एकदा बुरोंडीला गेलो होतो . . दापोली पासून एकदम जवळ !
सन्ध्याकाळी गेलो असल्याने परशुरामांच्या मस्तका मागे सूर्याचा लाल गोळा असा १ फोटो घेता आला होता.. 'म्रूदूप्रत' सापडली तर टाकतो !
छान माहिती !
छान माहिती !
छान माहीती आणि प्रचि खुप
छान माहीती आणि प्रचि खुप सुंदर
मस्त माहिती. लाल पाण्याचे
मस्त माहिती.
लाल पाण्याचे आणखी एक तिर्थ - रेडीचा किनारा.
छान माहिती आणि सुंदर
छान माहिती आणि सुंदर प्रकाशचित्रे!
छान प्रचि आणि माहिती...
छान प्रचि आणि माहिती...
माधवने टाकलेला फोटो पण खुप सुंदर आहे...
छान माहिती आणी सुंदर
छान माहिती आणी सुंदर फोटो..
समुद्राचं पाणी लाल का आहे?? तांबड्या मातीमुळे??
वर्षू, तांबड्या मातीमुळेच
वर्षू, तांबड्या मातीमुळेच असावं. पण तसं असेल तर फक्त तेवढाच भाग लाल का दिसतो हे कोडेच आहे.
कोंकण अप्रतिम.....!! मंदार
कोंकण अप्रतिम.....!!
मंदार एकदा जायला हवं तुझ्यासोबत..
नक्की जाऊया माबोकर एकदा.
नक्की जाऊया माबोकर एकदा.
मस्त रे!
मस्त रे!
मंदार, सुंदर फोटो आणि माहिती
मंदार, सुंदर फोटो आणि माहिती !
शनिवार ते मंगळ्वार मी पण कोकणदौ-यावर होते. रविवारी तुझ्या गावावरूनच पुढे गेले.
वा सुर्रेख फोटो, सुंदर
वा सुर्रेख फोटो, सुंदर माहिती........
सगळे प्रचि एकसे एक आहेत.
सगळे प्रचि एकसे एक आहेत. सुंदर जागा आहे.
मस्तच रे, माहितीसाठी आभार
मस्तच रे, माहितीसाठी आभार
वा छान माहीती आहे.
वा छान माहीती आहे.
फोटो जितके सुरेख तितकीच
फोटो जितके सुरेख तितकीच माहितीही. दोन महिन्यापूर्वीच एका खाजगी कामासाठी दापोलीला जावे लागले होते आणि एक मुक्कामही झाला, पण अशा काही विचित्र परिस्थितीत तिथे गेलो होतो की, तो परिसर त्या निमित्ताने पाहावा असे घडले नाहीच. पण आता स्वतंत्रपणे केवळ 'परशुराम' या एकाच कारणासाठी तिथे [अर्थात बुरोंडी] जाण्याचा बेत आखणार हे नक्की. धन्यवाद मंदार.
श्री. आणि सौ.गानू दांपत्यानी दाखविलेल्या या कल्पकतेबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
अशोक पाटील
मस्तच रे मंदार......... फोटो
मस्तच रे मंदार......... फोटो छान........ पुढच्या वेळी दापोली ट्रीप मध्ये हे नक्की......
छान माहिती..... फोटो छान
छान माहिती..... फोटो छान आहेत...मला शेवटुन दुसराविशेस्ष आवड्ला.....:)
छान माहिती..... फोटो छान
छान माहिती..... फोटो छान आहेत...मला शेवटुन दुसराविशेस्ष आवड्ला.....:)
फोटो छान आलेत.
फोटो छान आलेत.
संपूर्ण कोंकण किनाराच
संपूर्ण कोंकण किनाराच (परशुरामभूमी) सुंदर आहे. या भव्य पुतळ्याचा परिसर तर तामसतीर्थाच्या सान्निध्यामुळे आणखीच सुंदर दिसतो आहे. अशा जागी हा पुतळा म्हणजे दुधात साखरच!
शक्य होईल तर जरूर पाहून येईन.
प्रचि फारच सुंदर!
आवर्जून नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
माधव यांनी रेडी येथेही तांबडॅ पाणी दिसते हे नजरेला आणले आहे. अशा अनेक जागा असाव्यात. पाणी ताबडे का दिसते याला निस्चितच शास्त्रीय कारण असणार. तांबडी माती, प्रकाशाचे रिफ्लेक्षन आणि आणखी कारणांचा मिळून तो एकत्रित परिणाम असावा. पुराणीय कथाही त्याच्याशी अपेक्षेप्रमाणे जोडलेली असेलच. तशी ति असल्यास येथे द्यावी. कल्पकतेचा आविष्कार म्हणून आम्ही त्याचा आनंद घेऊ.
Pages