या धुंद चांदण्यात...

Submitted by विजय सिरसाट on 7 April, 2012 - 05:39

// या धुंद चांदण्यात... //
'' या धुंद चांदण्यात
रात रंगवून गेली;
चंद्रवेड्या मनाला
गूज सांगून गेली...

मन पाखरू फिरे
बागेत चांदण्यांच्या;
प्रत्येक दीपकळी
मात्र टाळून गेली...

स्वप्नात दंग मन
किती जागवू मनाला;
आगळी एक धुंदी
रात्र शिंपून गेली...

अंथरू कशा आता
चांदण्या तुझ्या पायी;
तारका पेंगुळल्या
निशा संपून गेली...! ''

- विजय सिरसाट
मो. ८६९८३५०९३३

गुलमोहर: 
शब्दखुणा: