९ एप्रिल १६३३ -मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.
८ एप्रिल १६५७ - २७ वर्षीय शिवाजीराजे आणि काशीबाई यांचा विवाह.
५ एप्रिल १६६३ - सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला.
दच्छिन को दाबि करि बैठो है । सईस्तखान पूना मॉंहि दूना करि जोर करवार को ॥
हिन्दुवान खम्भ गढपति दलथम्भ । भनि भूषन भरैया कियो सुजस अपार को ॥
मनसबदार चौकीदारन गंजाय महलनमें ।मचाय महाभारत के भार को ॥
तो सो को सिवाजी जे हि दो सौ आदमी सों ।जीत्यो जंग सरदार सौ हजार असवार को ॥
अर्थ :-
शाइस्तेखान दक्षिण हस्तगत करून पुण्यात ठाणे देऊन बसला. या वेळी हिंदूंचा आधारस्तंभ व किल्लेदारांच्या एका सेनानायकाच्या तरवारीस जोर चढला अन् त्याने अपार सुकिर्ती मिळवली. (ती अशी मिळवली की)मोठमोठ्या मनसबदारास व चौकिदारास जखमी करून त्याने महालांत शिरून महाभारत माजवण्यास (युद्ध करण्यास) सुरुवात केली !भूषण म्हणतो, कि हे शिवराया, तुझ्या शिवाय दुसरा पराक्रमी कोण आहे ? ज्याने फक्त दोनशे माणसांनिशी लाख स्वार असणार्या सरदाराबरोबरचे युद्ध जिंकले.
.... साभार.. ॐकार नेरलेकर.
आज ह्या घटनेला बरोब्बर ३५० वे वर्ष सुरू होत आहे...
१४ एप्रिल १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखानाने वज्रमाळ किल्ला जिंकला. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.
९ एप्रिल १६६९ - उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.
८ एप्रिल १६७४ - राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद 'हंभीरराव मोहिते' यांस बहाल.
८ एप्रिल १६७८ - 'दक्षिण दिग्विजय' मोहिम जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांचे पन्हाळगड येथे आगमन.
३ एप्रिल १६८० - चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ ... म्हणजेच हनुमान जयंती रोजी 'छत्रपति शिवाजी महाराजांचे महानिर्वाण.'
१२ एप्रिल १७०३ - मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु. औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.
१३ एप्रिल १७०४ - संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड उर्फ़ राजगुरुनगरकड़े निघाला.
५ एप्रिल १७१८ -मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."
२ एप्रिल १७२० - छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
१३ एप्रिल १७३१ - छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.
११ एप्रिल १७३८ - वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.
६ एप्रिल १७५५ - पेशव्यांनी (खरे तर इंग्रजांनी) तूळाजी आंग्रे याच्याकडून फत्तेगड आणि कनकदुर्ग जिंकुन घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज - पेशवे तहाप्रमाणे इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.
४ एप्रिल १७७२ - पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.
८ एप्रिल १७८३ - आनंदराव धुळूप यांनी इंग्रज आरमाराविरुद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.
७ एप्रिल १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला 'देवगड' विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.
१४ एप्रिल १८९५ - लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने रायगडावर पहिला २ दिवसीय शिवस्मरण दिन साजरा.
क्रमशः... मराठा इतिहास दिनविशेष - एप्रिल महीना ... भाग २...
तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...
छान उपक्रम. ते क्रमशः लवकर
छान उपक्रम. ते क्रमशः लवकर पूर्ण करा.
mastach re..
mastach re..
फारच उत्तम उपक्रम! पण यातील
फारच उत्तम उपक्रम!
पण यातील नोंदी त्या जुने ते नवे असे करशील काय?
खरंच, ध्यास आहे हा.
खरंच, ध्यास आहे हा.
आगाऊ+१ विचार करच रोहन तू १
आगाऊ+१
विचार करच रोहन
तू १ एप्रिल ते ३० एप्रिल असा प्रवास करतो आहेस, पण तारखां पेक्षा इसवीसने क्रमवार लावली तर वाचण्यास सोपे राहिल, विचार करुन पहा
पण यातील नोंदी त्या जुने ते
पण यातील नोंदी त्या जुने ते नवे असे करशील काय?
तू १ एप्रिल ते ३० एप्रिल असा प्रवास करतो आहेस, पण तारखां पेक्षा इसवीसने क्रमवार लावली तर वाचण्यास सोपे राहिल, विचार करुन पहा
>>>> करायला हरकत नाहीये.
पण यातील नोंदी त्या जुने ते
पण यातील नोंदी त्या जुने ते नवे असे करशील काय?>> +1
छान उपक्रम.. पण यातील नोंदी
छान उपक्रम..
पण यातील नोंदी त्या जुने ते नवे असे करशील काय?>> +1
छान उपक्रम...................
छान उपक्रम...................
तूला एक सूचवावेसे वाटते. या
तूला एक सूचवावेसे वाटते. या सर्व माहितीचा एक्सेल मधे डेटाबेस करता येईल.
युनिकोड सरळ एक्सेलमधे पेस्ट करता येतो. शिवाय जास्तीची माहीती तू त्या त्या सेलच्या नोट्स मधे टाकू शकतोस.
तारीख टाकताना ती मात्र एक्सेलच्या डेट फॉर्मॅट मधे युनिकोडमधे टाकता येणार नाही. पण दिनांक, महिना आणि वर्ष यासाठी तीन वेगवेगळे रकाने भरू शकतोस.
असा डेटाबेस तयार झाला कि, फिल्टर्स वापरुन हवी ती माहीती, म्हणजे एका सालातली, एका महिन्यातली किंवा एखाद्या व्यक्तीसंदर्भातली बघता येईल.
एक्सेल, युनिकोडचा क्रम लावताना, क, ख, ग... असा लावते.
मी या तंत्राने रागदारी चित्रपट संगीताचा डेटाबेस तयार केला आहे. त्यात एका रागाची, एका तालाची, एखाद्या संगीतकाराची अशी गाणी बघता / निवडता येतात.
अत्यंत माहितीपूर्ण
अत्यंत माहितीपूर्ण लेख!
"तारखां पेक्षा इसवीसने क्रमवार लावली तर वाचण्यास सोपे राहिल" - बागेश्री यांचेशी सहमत.
मराठ्यांच्या इतिहासाशी देशांतर्गत घडामोडींचा थेट संबंध होता यात शंकाच नाही. पण याच काळात युरोपातील ठळक घटनांचाही या इतिहासावर हळुहळु (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) परिणाम होऊ लागला होता. अशा तिकडच्या या काळातील महत्वाच्या घटनाही (उदा.- ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना वगैरे) या मालेत आल्या तर दुधात साखर! पहा विचार करून!
मी एक डेटाबेस तयार केलाय. बघ
मी एक डेटाबेस तयार केलाय. बघ कसा वाटतोय ते !
Senapati.xls (34 KB)
सेनापती.... छान आढावा. वर
सेनापती....
छान आढावा.
वर 'तारखेपेक्षा इसवी सनाच्या आधारे क्रमवार' लावण्याबद्दल एक सूचना वाचली, ती इतिहासाची सुसंगत अशी रचना वाचण्यासाठी योग्य अशीच आहे असे मला वाटते.
बाकी तुम्ही १४ एप्रिल इथे थांबल्याचे पाहून काहीसे नवल वाटले होते, पण पुढे 'क्रमश भाग-२' आहे असे पाहिल्यावर मग लक्षात आले की तुमच्याकडून १६ एप्रिल ही तारीख हुकणार नाही.
अशोक पाटील
दिनेशदा.. मस्त झालंय हे..
दिनेशदा..
ह्यावर अधिक काम करतो. तुला खूप खूप धन्यवाद.
मस्त झालंय हे..
दामोदरसुत... नक्कीच. माझ्याकडे जी माहिती असेल ती देत जाईन.
अशोकदा.. पुढील तारखा दुसऱ्या भागात येणार आहेत पण माझ्याकडे १६ तारखेची एकच नोंद आहे. तेंव्हा माझ्या लिखाणामधील जे काही कमी असेल ती त्रूटी भरून काढण्याचे महत्वाचे काम तुम्ही करावे ही विनंती...
महत्त्वाचा उपक्रम! दिनेशदा,
महत्त्वाचा उपक्रम!
दिनेशदा, फार भारी केलंय! आता क्रमवार करणं एकदम सोप्पं झालं..
दामोदरसूत- सेनापती, अशा
दामोदरसूत- सेनापती,
अशा तर्हेची माहिती श्रीनिवास सामंतांच्या 'वेध महामानवाचा' ग्रंथात दिली आहे. म्हणजे साल- शिवशाहीतील घटना- बाकी हिंदुस्थानातील घटना- इतर जगांतील घटना ..याप्रमाणे.
माझ्याकडे असलेला संपूर्ण
माझ्याकडे असलेला संपूर्ण वर्षभराचा डेटा त्या फाईलमध्ये मी टाकणार आहे..
काम झाले की इथे शेअर करीन.. 
वेध महामानवाचा' - धन्यवाद..
वेध महामानवाचा' - धन्यवाद.. ते पुस्तक माझ्याकडून अजून वाचायचे राहून गेले आहे.
'तारखेपेक्षा इसवी सनाच्या
'तारखेपेक्षा इसवी सनाच्या आधारे क्रमवार रचना' ही सुचना अमलात आणली आहे. येथे आवश्यक ते बदल केले आहेत..
मुजरा सेनापती .... ती Excel
मुजरा सेनापती ....
ती Excel ची आयडीया छान आहे...
भारी काम. जियो
भारी काम. जियो सेनापती!!!
दिनेशदांची एक्सेल शीटची आयडिया मस्तच. ही हेडरमध्ये घालून अपडेट करत रहावी लागेल.
धन्यवाद मामी.. ते एक मोठेच
धन्यवाद मामी..
ते एक मोठेच काम आहे.
पण करणार हे नक्की.. 
छान माहीती. दिनेशदांच एक्सेल
छान माहीती.
दिनेशदांच एक्सेल शीटही भारीच.