Submitted by अनिल तापकीर on 28 March, 2012 - 06:54
अशी कठोर का झालीस तू ?
हृदयापासून हृदयाला
का वेगळे केलेस तू?
आयुष्यभर एक, रहावायाच्या,
झाल्या होत्या आणाभाका ,
कसला प्रसंग आला,
सांग तुझ्यावरी बाका,
प्रेम हे इतके दुबळे,
असू शकते का?
कुठल्याही प्रसंगाने,
ते पुसू शकते का?
*
*
विचारूनी पहा तू ,
तुझ्या अंतरमनाला,
शेवट असतो का?
खऱ्याखुर्या प्रेमाला.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान (अधिक प्रभावी होऊ शकली
छान
(अधिक प्रभावी होऊ शकली असती असे लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगतो, कृगैन)
बेफिकिरजी, जे काही असेल ते मन
बेफिकिरजी, जे काही असेल ते मन मोकळेपणाने सांगत जा, मी मागेच मायबोलीवरील सर्व मित्र मैत्रिणीना, बंधू भगिनींना सांगितले होते कि, मला साहित्य विषयी जास्त कळत नाही, उलट आपले मार्गदर्शन माझ्यासाठी अनमोल असेल. .......धन्यवाद