चंद्रशेखर गोखले

Submitted by तुषार जोशी on 27 March, 2012 - 01:02

भावना पेरीत आले चंद्रशेखर गोखले
बाप चारोळीस झाले चंद्रशेखर गोखले

तरुण होता पांगलेला काव्यसुमनां पासुनी
ऐक 'मी माझा' म्हणाले चंद्रशेखर गोखले

रूढ होत्या ज्या प्रथा लोकांमधे मिरवायच्या
पार मोडोनी निघाले चंद्रशेखर गोखले

खूप झाल्या चार ओळींच्या कवितांच्या सरी
इंद्रधनुचे रंग ल्याले चंद्रशेखर गोखले

वाचुनी 'तुष्की' सुखाचा बहर येतो अंगणी
धन्य वाचाया मिळाले चंद्रशेखर गोखले

~ 'तुष्की'

+९१ ९८२२२ २०३६५
२६ मार्च २०१२, २३:३०

गुलमोहर: 

कोणावरही लिहिली तरी गझल होऊ शकते, पण त्यात भाव गझलेचा हवा Happy

सकाळी सकाळी आपण दिवा दिलात त्यामुळे क्षणात सीझन्ड झालो

कसीदा म्हणायला हरकत नाही.

खूप झाल्या चार ओळींच्या कवीतांच्या सरी - वृत्तासाठी हा किरकोळ टायपोही सुधारता येईल.

आज माझा एक प्रयोग यशस्वी झालाय सुप्रियाताईन्च्या एका रचनेवर मी तो केलाय
ही कला मी बेफिन्कडूनच शिकलोय ...ती अशी

(प्रस्तुत रचनेचे बेफिन्नी तेच केले आहे !! कसे ते पहाच !!)

प्रयोगाचे नाव : काय.... एखाद्या विशिष्ठ कवीच्या कोणत्याही रचनेवर कुजकट बीजकट प्रतिसाद, गरज नसताना देणे सुरू केले की त्या नंतरचे प्रतिसादक ही तसेच करतात जेणेकरून मूळ काव्यावर चर्चा होत नाही व रचनाकाराची निनदानालस्ती फुकटात होते ?
व अशामुळे प्रतीसादाकच जास्त भाव खाउन प्रकाशझोतात येतो व रचनाकाराचे हसे च होते ?

साधने आणि उपकरणे : आजपर्यंत माझ्या कवितेवर आलेले असंख्य प्रतिसाद व त्यातून मला आलीली अनुभूती हेच एकमेव साधन

क्रिया : आपण वर अनुभवली ती .

निष्कर्ष : होय असेच होते

अपवाद : नाहीच .निदान मा.बो. वर तरी...............(.निदान बेफी व त्यन्चा कम्पू अस्तित्त्वात असेल तोवर तरी )

उपयोग : हा रचनाकार केवळ फालतू आहे हे वाचकान्च्या मनावर ठसवता येते.

चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या मस्तच आहेत.
दोन ओळी तुझ्या साठी

येवो गर्जनां समवेत, वा येवो शांत सर होऊनी
बहर तर येणारच, जेव्हा पाऊस येतो मनी

तुषार जी,
बेहतरीन! एका कवीला दुसर्‍या कवीचे अभिवादन. त्यावरून मला एक संस्कृत सुभाषित आठवलं:
"नागुणि गुणिनं वेत्ति, गुणी गुणिषु मत्सरी -
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जनः|"
अर्थः स्वतः निर्गुण माणसाला गुणी माणसाची (खरी) पारख नसते. गुणी माणूस दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर (च) करतो. स्वतः गुणी असूनही दुसर्‍या गुणी माणसाची कदर करणरा सरळ सज्जन विरळच होय.
तुमच्यात मला मात्र असा सज्जन भेटला, त्याला प्रणाम!

तांत्रिकदृष्ट्या मात्र अशा रचनांना गझलेऐवजी छानशी कविता म्हटता येईल, ह्या "बेफिकीर" जींच्या मताशी मीही सहमत आहे. कारण ह्यातील सगळ्या शेरांमध्ये एक समान धागा आहे.

जी काय रचना हाय ती अपुनको आवडेश! Happy

मी ही रचना "चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले" ह्या चालीत म्हणून पाहिली. फिट्ट बसतेय अगदी.

चालता तू चंचले च्या ठिकाणी चंद्रशेखर गोखले असं मस्त बसलंय Happy म्हणून पहा.
(इथे मी परत एकदा बेफिंना मनापासून हसण्याचा चान्स दिलाय Happy )