स्वप्न

Submitted by रीया on 22 March, 2012 - 19:51

स्वप्नांचा अर्थही कळला नव्हता रे मला
जेंव्हा तू माझ्या आयुष्यात आलास...
तुच तर दाखवलीस ना मला?
तुझी स्वप्न? तुझ्या डोळ्यांनी?

आणि मीही वेडी !
त्या स्वप्नांनाच आयुष्य मानलं......

पण स्वप्न तरी काय रे?
काही क्षणांचे सोबती
जाग आली की तुटणारच..

तू जागा झालास
पण माझे डोळे अजुन तसेच आहेत बघ
मिटलेले......

त्याच काय आहे ना
आता तुझ्या स्वप्नांची सवय झालीये
इतकी की स्वप्नच वाटू लागलयं मला
माझंच आयुष्य....

क्षणभंगुर...
कधीही तुटेलं असं...
तू दाखवलेल्या स्वप्नांसारखचं....
आपल्या नात्यासारखचं......!

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

गुलमोहर: 

कविता अवड्लीच पण हे जास्त प्रभावीपणे मान्डलय तुम्ही-"प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस...."!!
ये हुवी ना बात!! व्वा!!

प्रियु,

माफ कर पण हि विशेष नाही भावली. Sad
तुझ्या नेहेमीच्या कवितांची लय नाही सापडली यात.

युर्‍या,
सर्व धर्म सहिष्णु भाव का बरे आज? Uhoh
गुढी पाडव्याला असे झटके येतात का तुला? Proud

सबको धन्स Happy
निंबु मुकतछंद असेल म्हणुन असेल कदाचित
पहिल्यांदाच प्रयत्न केलाय
तसही खरं तर मला मुक्तछंदात लिहायला जमतच नाही
पण जेंव्हा लिहिलं तेंव्हा जरा वेगळ्या मूड मध्ये होते
म्हणुन लिहिलं ही गेलं आणि पोस्टवलं पण लगेच Happy
प्रतिसादाबद्दल धन्यु:)

तसही खरं तर मला मुक्तछंदात लिहायला जमतच नाही
>>>>>>>>>>>>

निंबुडा आणि बागेश्रीच्या कवितांची पारायणे कर...... सर्व जमेल Wink

कविता छान.

युरी....... Proud

भावना छान व्यक्त झाल्यात. अगदी प्रामाणिक. मांडणी तेव्हढीच प्रभावी असती तर वेगळीच उंची गाठली असती.
तसही खरं तर मला मुक्तछंदात लिहायला जमतच नाही>>>>>>>>
मग गझल लिहायला हरकत नाही. पुलेशु.

.

<<<<<<<< त्याच काय आहे ना
आता तुझ्या स्वप्नांची सवय झालीये
इतकी की स्वप्नच वाटू लागलयं मला
माझंच आयुष्य....>>>>>.
मस्त Happy