ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!
मी चक्रावलो. खाण्यात बदल नाही. जंक फुड -कोल्ड्रिंक्स-हॉटेलिंग वगैरेंना फाट्यावर मार देऊनही हे असं कां ते कळेना! ऑगस्ट २०११ - वजन ७३ किलोवर गेलं. आता स्वतःमध्ये होणारे बदल टिपायला सुरुवात झाली होती. यावर्षी अॅसिडीटीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती, केस गळायला सुरुवात झालेली.., सूर्य वर येतांना मानेकडून वरपर्यंत डोकेदुखीही चढत यायची. ..अशी अवस्था! बरं, अॅसिडीटीवर आजूबाजूला कोणाला सल्ला विचारणार? डॉक्टरांपासून सगळेच जाडजूड! ..आणि प्रत्येकजण सल्ला देतांना दुसर्या कोणाकडून तरी ऐकलेला किंवा डॉकने दिलेला सल्ला पुढे सुपुर्द करायची. आता चाळीशीत आलायस,.. असं चालायचंच आता हळूहळू! वगैरे नकारात्मक रडे सल्ले तर खूपच!! ..आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला, पेक्षा घरातल्या प्रत्येकाला तरी!!
* * *
ऑक्टो. २०११ मध्ये दिवाळीच्या आधी एका मित्राने त्याच्याकडे बोलावलं.- '.. मुंबईचे एक माधव जोशी म्हणून एक न्युट्रीशिअन आहेत. .त्यांचं १ तासाचं आहार व आरोग्य या विषयावर बोलणं आहे, तेव्हा तू ये. ' म्हटलं येतो. गेलो. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कांय खावे यापेक्षा कांय खाऊ नये आणि ते कां खाऊ नये हा भाग स्पष्ट केला. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
६ गोष्टी पुर्णपणे बंद करा, पेक्षा गटारात फेका.
१) साखर २) चहा/कॉफी ३) सर्व बेकरी पदार्थ ४) रिफाइंड तेल ५) लोणचं ६) पापड. आणि हे कां खाऊ नका हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विषद केलं त्याकडे नंतर येऊच..!!
मी मुळांत प्रचंड गोड खाणारा. मस्तपैकी लालसर होईपर्यंत खरपूस भाजलेल्या बेसनाचा एक लाडू मी कधीच खाल्लेला नाही.. एकावेळी जोडी लागायची.
साहजिकच माझ्या मर्मावरच हा माणूस घाला घालतोय म्हटल्यावर मी व्याख्यानानंतर अर्धा-पाऊण तास या न खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्याशी काथ्याकूट केला, विशेषतः साखरेवरुन! त्यांनीही माझे समाधान होईपर्यंत व्यवस्थित उत्तरे दिली पण जीभेच्या मेंदूचे काही समाधान होत नव्हते.
माझे बॉडी पॅरॅमिटर्स काढले. बहुतेक सगळे सीमारेषेवर.. ओलांडली नसली तरी माझ्यासाठी तो धक्काच होता.
झालं! त्या मिनिटाला मी साखर, चहा/कॉफी, सगळे बेकरी पदार्थ, लोणचे व पापड यांना माझ्या जीभेपासून तलाक दिला. रिफाईंड तेलावर माझा डायरेक्ट कंट्रोल नसल्याने त्याला शक्य तितके नाही या वर्गात ठेवले.
घरी आल्यावर हा निर्णय सांगितला. माझ्यापुरता मी पाळणार, तुम्हांला त्रास नाही असं जरी सांगितलं तरी माझ्या या निर्णयाचा घरात कुठेतरी परिणाम होणार होताच. दिवाळीचा सगळा फराळ घरात तयार होता. पण तिथे मी जीभ जिंकली. हे पदार्थ पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन दिवस डोकेदुखीचा प्रचंड त्रास झाला. आता या त्रासाचं शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. दिवाळी संपल्यावर मी आधी किती साखर/ गोड खायचो ते उरलेल्या पदार्थांवरुन लक्षात येतच होते. खरा त्रास कंपनीत होणार होता. सर्व सहकार्यांबरोबर दिवसभरांत त्यांच्या चहाच्या वेळी, जेवतांना त्यांना माझी बाजू समजावून सांगतांना पार कावायला व्हायचं. कारण याचा नेमका परिणाम कांय नी कधी माहित नव्हतं. कॅलेंडरच्या तारखेवर पहिल्या दिवसापासून 'खाल्ले नाही' म्हणून फुली मारायला लागलो. सलग फुल्यांचे दिवस वाढत गेले तशी स्वतःशी कमिटमेंट पक्की होत गेली. बाकी माझ्या जेवणांत काही बदल नव्हता. जॉगिंगही नियमित सुरु होते.
४३ वा दिवस. मी बाबांना (वडीलांना) घेऊन नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिथल्या वजनकाट्यावर वजन केलं. ७१ किलोग्रॅम.....!! आनंदाने उडीच मारली. आधी माधव जोशींना फोन लावला. ते हसत म्हणाले.."उतरवली की नाही तुझी चरबी..!! नुसत्या या ६ गोष्टी बंद करुन एवढा फरक पडला, आता मी सांगेन तसं खायला लागल्यावर तुझी घडी नीट बसेल की नाही बघ..परवा नाशिकला येतोय, तेव्हाच तुझे पॅरामिटर्स काढूया! " मलाही त्याबद्दल जाम उत्सुकता लागली. ते आल्यानंतर पॅरॅमिटर्स काढले, ते खाली देतोय. कंसामध्ये नंतरचे म्हणजे पहिल्या ४५ दिवसांत बदललेले पॅरामीटर्स. आता तर आणखी सुधारीत आहेत.
वजन- ७५.४ (७०.९)
चरबी %- २६ (२१.२)
स्नायू %- ५३ (५२.८)
पाणी %- ५२ (५६)
व्हिसरल फॅट %- ९ (७)
मेटॅबोलिक वय- ५५(४०)
फिजिक रेटींग- २ (५)
बोन मास- २.८ (२.८)
यावेळी त्यांना प्रश्न केला की एका महिन्यांत एकदम ४.५ किलो वजन कमी होणं कितपत योग्य, त्यांवर "ही अनावश्यक चरबी गेलीय. आता यापुढे १ किलोसाठीसुद्धा तुला किती घाम गाळावा लागेल हे लवकरच कळेल तुला!" असं सांगून त्यांनी स्नायू वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि शिफ्टच्या वेळेप्रमाणे कसा आहार घ्यायचा ते सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा जिन्नस वाण्याच्या दुकानांत व भाजी मंडईत मिळणारा. आता सध्या मी या ६ गोष्टी+प्रिझर्वेटीव्ज्+कृत्रिम रंग असलेले पदार्थ टाळूनही मस्त चमचमीत खातोय. अगदी गोडासकट. कारण साखरेऐवजी सेंद्रिय गूळ, रिफाइण्ड तेलाऐवजी घाण्याचं किंवा फिल्टर तेल, चहाऐवजी गुजराथी लोकांकडे असतात ते उकाळे वापरायला हरकत नाही असं माधव जोशी सांगतात. पण हे ऑप्शनसुद्धा कशाला हवेत तर शेवटी आपल्याला हे आजीवन पाळायचे आहे म्हणून. माझ्या बदललेल्या पॅरामीटर्सचा कागद पाहून आता माझ्या कुटुंबातच कांय, पण गंमत करणार्या सहकार्यांनीही या गोष्टी पाळायला सुरुवात केली आहे व त्यांनाही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. माझ्या एका पन्नाशीच्या मधुमेही व गोळ्या सुरु असलेल्या सहकार्याची उपाशीपोटी साखर नेहमी १५० ते १६० यायची. त्याने या गोष्टी वर्ज्य केल्यावर एका महिन्यांत ती ११८ पर्यंत उतरली. त्याला आता डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस परत नीट ठरवण्यासाठी बोलावणे केले आहे. त्याचेही बाकी खाणे व्यवस्थित सुरु आहे.
माझी अॅसिडीटी पहिल्या १० दिवसातच गेली. वजन ६७ वर स्थिर आहे. आता थोडे वजन वाढवायचे आहे पण स्नायूंचे.
वाढलेल्या ढेरीचे आता सपाट पोटांत रुपांतर झाल्याने Rock Climbing चा आता मी पुन्हा आनंद घ्यायला लागलो आहे. उर्जा क्षमता (एनर्जी लेव्हल) खूप वाढली आहे. एकूण सध्या आरोग्यदायी चाललंय!
आता या माधव जोशींबद्दलची थोडी माहिती देतो...
श्री. माधव जोशी बँकेत नोकरीला होते. रसायनशास्त्राचे पदवीधर. १९८२ च्या सुमारास ते नाना पालकर स्मृती समितीत रुग्णसेवा करत असत. त्यावेळी अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि त्यामुळे ग्रस्त त्यांचे कुटुंब बघून आपण कधीच 'रुग्ण' व्हायचे नाही अशी खुणगाठ त्यांच्या मनाशी बांधली गेली. पण...वयाच्या पन्नाशीच्या आधीच गुडघे, कंबर व पाठ्दुखी सुरु झाली. साहजिकच डॉक्टरांनी बरीच बंधनं घातली. आरोग्याचा शोध घेता घेता स्वतःच अनारोग्याच्या मार्गाला लागले. आपले आरोग्य परत मिळवण्यासाठी त्यांनी नाना तर्हेचे सगळे उपाय करुन पहिले पण तात्पुरता परिणाम दिसे, परत ये रे माझ्या मागल्या किंवा आणखी काही तरी नविन उद्भव! योगासने, रेकी, आहारशास्त्र, निसर्गोपचार, प्राणायाम, कपालभाती या सगळ्या गोष्टींचा प्रयोगशील अभ्यास या दरम्यान झाला. सरतेशेवटी ते एका निष्कर्षाप्रत आले, तो म्हणजे आपल्या रक्ताचा पी.एच.
त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
"आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या रक्ताच्या ७.४ या पी.एच. शी आहे. पी.एच. म्हणजे power of hydrogen. म्हणजे एखाद्या द्रवातील हायड्रोजन आयनची संख्या. ते ० ते १४ या रेंजमध्ये मोजलं जातं. '०' ph म्हणजे अत्यंत अॅसिडीक- '७' ph म्हणजे उदासिन आणि '१४' ph म्हणजे अल्कली. आपल्या रक्ताचा ph '७.४' म्हणजे किंचित अल्कली आहे. आपल्या शरीरात चालू असलेल्या चयापचय व श्वसन क्रियेमुळे रक्ताचा ph सतत प्रभावित होत असतो. ph कमी झाला तर त्याला अॅसोडोसिस म्हणतात. जास्त झाला अल्कलॉसिस म्हणतात. पैकी आपण अॅसिडोसिसचाच विचार करुया. या प्रकारात ph कमी होऊन अॅसिडचं प्रमाण वाढतं. निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या असंतुलनाला नियंत्रित करण्यासाठी निसर्गानेच शरीरात पुरेशी व्यवस्था केलेली असते पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या अंसंतुलनात बरीच भर टाकत असतो, ती अशी-
१- अॅसिडोसिस निर्माण करणारं अन्न (मांस, मासे, अंडी, डाळी, धान्ये) यांचा अतिरेक व दूध, फळे, भाज्या, मोड आलेली धान्ये, नाचणी या अल्कली अन्नाचं कमी सेवन.
२- साखर, वनस्पती तूप, शितपेयं, चहा, दारु, तंबाखू यांचं सेवन
३- अॅसिडोसिस निर्माण करणारी औषधे सेवन
४- प्रिझर्वेटिव्ज, कृत्रिम रंग असलेलं अन्न सेवन
आणि इथे गडबड होते.
आता साखर कां नको?
साखर कशी बनते हे सामान्यपणे कुणालाही माहित नसतं. साखरेमध्ये तिच्या पचनासाठी लागणारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरस हे ३ घटक नसतात. उसाच्या रसात किंवा सेंद्रिय गुळांत ते असतात. उसाच्या रसाची ज्यावेळी साखर बनवतात त्यावेळी त्यांत फॉर्मल डिहाईडसारखी घातक रसायने मिसळली जातात. यामुळे हे ३ घटक साखरेतून नष्ट होतात. अशी साखर पोटांत गेल्यावर पचनासाठी लागणारे हे घटक आपल्या शरीरातून घेतले जातात. उदा. कॅल्शिअम हाडांतून नाहीतर दातांतून घेतले जाते. परिणामी हाडे/ दात लवकर ठिसूळ होतात. मात्र एवढा उपद्व्याप करून साखरेपासून शरीराला काहीही फायदा मिळत नाही. कर्बोदके इतर खाण्यातून मिळतातच की!
आपल्या जेवणात ८०% अॅसिडीक व २०% अल्कली पदार्थ असतात. ते प्रमाण उलट करायचं म्हणजे २०% अॅसिडीक व ८०% अल्कलाईज्ड. ते कोणते ते वर १ नं.च्या मुद्द्यांत आलं आहेच. "
माधव जोशींनी या विषयावर 'सात पुर्णांक चार दशांश' या नांवाचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. त्यांतही या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.
तळटीपः लेख थोडा विस्कळीत वाटेल. अनुसरुन बरेच विषय आहेत. थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न केलाय. या विषयांतील अनेक तज्ञ इथेही आहेत. त्यांच्याही सूचना/ मार्गदर्शन मिळेल. उदा. इथे उल्लेखलेल्या आहारासंबंधी, साखर-रिफाइण्ड तेल कसे बनते? त्यांत रसायने मिसळतात कां? त्यांचा शरीरावरील परिणाम वगैरे माहिती.
आपले पी एच शरीर स्वतःच सतत
आपले पी एच शरीर स्वतःच सतत नियंत्रित करत राहते.
पण ही कसरत शरीराला सतत करावयास लावणे कितपत योग्य ह्याचा विचार आपण करायला हवा. शरीरात इन्फ्लमेशन होत राहते, जे आपले खाणेपिणे व दिनचर्येवर अवलंबुन आहे. बहुतांशी आजाराचे मुळ ह्या इन्फ्लमेशनमध्ये आहे.
जोश्यांच्या एका घरगुती कार्यक्रमात मी सहभागी होते. तसेही मी आधीपासुनच रिफाईंड तेल, मैदा, साखर (शक्य तितकी), बेकरी (शक्य तितकी) वापरणे बंदच केले होते. लेक्चर ऐकुन अजुन दृढ्निश्चय झाला.
त्यात त्यांनी एक विधान केले होते जे कायम लक्षात राहिले. आजार झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो आणि उपचार करुन घेतो, आजारमुक्त होतो किंवा ते शक्य नसल्यास आजार आटोक्यात आणतो. आजारावर ठोस, विज्ञानसिद्ध उपचार डॉक्टरकडे असतात पण हे आजार मला का झाले ह्या प्रश्नाचे ठोस उत्तर नसते. बहुसंख्य लोक हा प्रश्न विचारतही नाही. आजारांचे कारण काय या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरे असतात त्यातले महत्वाचे म्हणजे आपला आहार व विहार. त्यावर नियंत्रण आणले तर बरेच आजार कमी होतील. बाह्य कारणांमुळे होणार्या आजारांवर आपले नियंत्रण नाही. आपली प्रतिकारशक्ती वाढबणे आपल्या हातात आहे.
विकतच्या लोणच्यात मिठ जास्त
विकतच्या लोणच्यात मिठ जास्त असते, खातानाही चव लागते. पापडात पापडखार असतो जो बेकिंग सोड्याचे रुप आहे.
जोशींनी बेकिंग सोडा शरिरातील पेशींना अपाय करतो असे एक विधान केले होते. त्यामुळे बेकिंग सोडा घातलेले सगळे पदार्थ हद्दपार करा असे ते म्हणाले. यात बेकरी पदार्थ प्रामुख्याने येतात. त्यांचे हे मत होते की हे सगळे अपायकारक पदार्थ हद्दपार करुनही आपण उत्तम सैपाक व इतर चमचमीत पदार्थ बनवु शकतो. त्यांचे या पदार्थांचे नाशिकला दुकानही आहे/होते.
बेकिंग पावडर/सोडा नसेल तर केक कसा बनेल हा प्रश्न मी विचारला, ते म्हणाले यिस्ट वापरा. मग तो पाव होईल, केक नाही हे मनात आले पण मी गप्प बसले
मानव पृथ्वीकर - धन्यवाद .
मानव पृथ्वीकर - धन्यवाद .
मला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे , त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ बंद आहेत .
तिखटाने माझ्या पोटाला त्रास होतो म्हणून तिखट पदार्थ बंद आहेत .
बाहेरचे पदार्थ वरील दोन व स्वच्छतेच्या कारणास्तव बंद आहेत .
साखर , बेकरी चे पदार्थ , डीप फ्राईड पदार्थ आरोग्याच्या कारणास्तव बंद आहेत .
शॉलो फ्राय पदार्थ, फोडणीतले तेल , चपातीला लावलेले तेल हे अजून चालू आहे. ते बंद करायचा विचार करतोय. आता मग काय खायचे हा प्रश्न पडलाय ?
धाग्याच्या प्रतिसादात हेम व
धाग्याच्या प्रतिसादात हेम व माधवदादा ह्या आयडींनी काय खायचे यावर उपयुक्त माहिती दिलीय ती पाहा.
माबोवाचक, दह्या मध्ये आणि
माबोवाचक, दह्या मध्ये आणि हार्ड चीज मध्ये लॅक्टोजचे प्रमाण कमी असते. त्याने सहसा त्रास व्हायला नको. तसेच पनीर मध्ये सुद्धा दुधाच्या तुलनेत कमी असते. त्यानेही त्रास होतो का?
फोडणी (भाज्यांसाठी), चपातीला लावलेले थेंबभर तेल बंद करण्याची खरंच गरज आहे का? शॅलो फ्राय अधुन मधून खाता येईल/कमी प्रमाणात खायचे.
गेली काही वर्षे मी लाकडी घाणीतले (समोर काढलेले) तेल वापरतो. ऍसिडिटी होण्याबाबतीत हे तेल रिफाईंड तेलाएवढेच परिणामकारक आहे असा माझा तरी अनुभव आहे. जरा जास्त झाले की होते ऍसिडिटी. त्याचे इतर फायदे असतील (रिफाईनिंग प्रोसेस टळल्याने) म्हणुन वापरतो.
मी स्वतः कधी कधी शून्य तेलातल्या भाज्या करतो. रस्सा भाजी, कोरडी नाही. (कोरडी करणे जास्त क्लिष्ट वाटले मला.) सांगितल्या शिवाय ही बिनातेलाची भाजी आहे हे कळणार नाही. पण अशी भाजी करणे वेळ खाऊ आहे, रोज करणे जिकरीचे तसेच तेवढी आवश्यकता वाटत नाही. झणझणीत खावेसे वाटले (पण तेल नको) त्यावेळेस करतो कधीतरी.
@मापृ, पोस्टबद्दल चन्यवाद.
@मापृ, पोस्टबद्दल चन्यवाद.
मी व्यवस्थित (नाश्ता, जेवण) खाल्ले असल्याशिवाय चहा घेत नाही >>> सकाळचा पहिला चहा सोडला तर मी ही हेच करते. मला अजूनतरी चहाने अॅसिडिटी होते आहे असं वाटलं नाहीये.
तेलामुळे नाही बहुधा, पण नुसतेच खूप गोड काही खाल्ले किंवा रात्री तिखट / आंबट काही खाल्ले तर अॅसिडिटी होते मला. तुम्ही म्हणताय तशी ती चहामुळे अजून अॅग्रवेट होत असेल तर कल्पना नाही. तसे फेरफार करून पहायला पाहिजेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की मला चहा प्रचंड आवडतो
त्यामुळे तो कमी करणे / सोडणे याव्यतिरिक्त काही करता येईल का ते पहात होते.
स्ट्राँग चहाचा मात्र माझा अनुभव वाईट आहे. त्यामुळे मी खूप लाईट चहा पिते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे - शांत झोप! या गोष्टीवर काम करावंच लागणार आहे मला. बहुतेक सगळ्याचं मूळ तिथेच असणार आहे.
रमड तू रात्री चहा पीतेस?
रमड तू रात्री चहा पीतेस?
माझ्याकरता, दुपारी ३ नंतर चहा = सकाळी ५ पर्यंत डोळ्यास डोळा न लागणे.
तू रात्री चहा पीतेस? >>> नाही
तू रात्री चहा पीतेस? >>> नाही. आणि कधी प्यायलेच तर मला बेटर झोप लागते
>>>>>कधी प्यायलेच तर मला बेटर
>>>>>कधी प्यायलेच तर मला बेटर झोप लागते
ह्म्म्म!! मला कॉफी ने लगेच झोप येते रात्री पण चहा एकदम निद्रानाश म्हणजे आख्खी रात्र डोळ्याला डोळा लागत नाही.
मानव पृथ्वीकर, धन्यवाद .
मानव पृथ्वीकर, धन्यवाद .
लॅक्टोस हे पाण्यात विरघळते . त्यामुळे दह्यातले पाणी काढून टाकून घट्ट दही खाल्ले तर कदाचित समस्या येणार नाही , पण ते पाणी काढण्याचे सोपस्कार कोण करणार ? असो .
याचा अर्थ ग्रीक योगर्ट
>>>>>>>>लॅक्टोस हे पाण्यात विरघळते . त्यामुळे दह्यातले पाणी काढून टाकून घट्ट दही खाल्ले तर कदाचित समस्या येणार नाही
याचा अर्थ ग्रीक योगर्ट लॅक्टॉस फ्री असते का मग? कारण फार घट्ट असते. अगदी चक्काच.
मानव पृथ्वीकर, डाएटिशियनने
मानव पृथ्वीकर, डाएटिशियनने मला अॅसिड रिफ्लक्ससाठी डाएट प्लान बनवून दिला होता. त्यात राजगिराच्या लाह्या, मखाणे आणि कुरमुरे यांचा समावेश होता. काय खायचं नाही तेही सांगितलं - विकतचं प्रोसेस्ड फूड - यात बेकरी प्रॉडक्ट्स आणि तळलेले आणि मसालेदार पदार्थ आले.
ग्रीक योगर्ट बद्दल माहित नाही
ग्रीक योगर्ट बद्दल माहित नाही. कधी खाल्ले नाही. पण एकदा खाऊन पाहायला हरकत नाही.
भरत, अच्छा. इकडे दक्षिण
भरत, अच्छा. इकडे दक्षिण भारतीय डॉक ना राजगिऱ्याच्या लाह्या, कुरमुरे माहित नसावेत बहुतेक. कुरमुरे अशा वेळी मी खातो पण त्याने मदत होते हे माहीत नव्हते, चालतात म्हणुन थेंबभर तेल, चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर घालुन खातो.
राजगिऱ्याच्या लाह्या इकडे मिळत नाहीत सहसा, बिग बास्केट किंवा ऍमेझॉनवर बघतो. तुम्ही कसे खाता?
राजगिर्याचे लाडू मिळतात. ते
राजगिर्याचे लाडू मिळतात. ते नुसतेही खाता येतात, पण मी दुधात कुस्करून खातो. वाटीत लाडू ठेवून त्यावर दूध ओततो. तो आपोआप विरघळतो.
मखाणे आयत्यावेळी एखाद मिनिट मायक्रोवेव्ह करून, कुरकुरीत करून.
राजगिर्याच्या लाडवावर असं
राजगिर्याच्या लाडवावर असं दूध घालून खायला मस्त लागतो. पण त्यात भयंकर गूळ खातोय असं खाताना वाटतं. त्यात थोड्या लाह्या मिळाल्या तर त्या घालून गिल्ट थोडा कमी होईल.
राजगिराच्या लाह्या, मखाणे आणि
राजगिराच्या लाह्या, मखाणे आणि कुरमुरे >> रिफ्लक्स साठी ह्याचा उपयोग होतो हे माहीत नव्हतं.
राजगिर्याच्या लाडवावर असं
राजगिर्याच्या लाडवावर असं दूध घालून खायला मस्त लागतो >>> +१ मलाही तसाच आवडतो. पण इथे नुसत्या लाह्या मिळतात का बघायला हवे. लाडू जरा जास्त गोड वाटतो हे खरंय.
राजगिऱ्याचे लाडु मिळतात इथे.
राजगिऱ्याचे लाडु मिळतात इथे. पण ते लाह्यांचे नाही, राजगिरा दाणे भाजुन केलेले असतात. साखर टाळण्यासाठी मी सुद्धा लाह्या मागवेन, त्याचे काहीतरी करता येईल.
मखाणे मावेत करता येतात हे माहीत नव्हते. सोयीस्कर आहे हे.
मानव, इथल्या डॉक्टरांनीही मला
मानव, इथल्या डॉक्टरांनीही मला आहाराबद्दल काही सांगितलं नाही. त्यांचा भर फक्त औषधांवर . फक्त मसालेदार, तेलकट टाळा एवढंच. हे डाएटिशियनने सांगितलं.
राजगिरा लाह्या टाकत मिसळून ,
राजगिरा लाह्या टाकत मिसळून , मीठ घालून वरून मिरचीची फोडणी अशाही खाता येतात. किंवा चिवड्यासारख्या दाणे वगैरे घालून, फोडणी देऊन. पण हा चिवडा खाताना जरा जड जाते, लाह्या हवेत इतस्ततः उडतात, चमच्याने खाताना नीट मॅनेज करता आले नाही तर..

लाह्या हवेत इतस्ततः उडतात >>>
लाह्या हवेत इतस्ततः उडतात >>>
मी इथे हा असला चिवडा खाते आहे मग श्वास सोडताना सगळीकडे लाह्या उडतायत आणि कार्पेट मधे दडून बसल्या आहेत वगैरे इमॅजिन करतेय ऑलरेडी.
रा.लाह्या माझं कम्फर्ट फूड
रा.लाह्या माझं कम्फर्ट फूड आहे. साळीच्या लाह्या पण. रात्री बहुतेक लाह्याच खाते. राला दूधात, दह्यात मीठ तिखट, दाकू टाकून. तश्याच साळीच्या लाह्या आणि तिसरा प्रकार म्हणजे गाजर, कांदा टोमॅटो, काकडी, भा. शेगदाणे घालून भेळ
लाह्या दुधात वगैरे घालुन
लाह्या दुधात वगैरे घालुन खाताना खुप कचकच येते दाताखाली. आधी पाण्यातुन काढुन घ्याव्या काय?
दूध घातलं आणि ढवळलं की खाली
दूध घातलं आणि ढवळलं की खाली बसते कचकच. लाडवातली बसते असं वाटतं.
राजगिऱ्याच्या लाह्या तीन
राजगिऱ्याच्या लाह्या तीन दिवस दूधात घालुन खाल्ल्या. त्यात दूध किती पटकन ऍब्सार्ब होतं. पण हे खाऊन काही फायदा जाणवला नाही. त्रासही नाही. मध्ये दोन दिवस वेगळे काही खाल्ले संध्याकाळी.
काल आणि आज राजगिऱ्याच्या लाह्या कोरड्या खाल्या, किंचित तेल, मीठ घालुन. खाताना आधी तोंड कोरडं झाल्यासारखं वाटत मग लाळ सुटते. असं प्रत्येक घासाला जाणवतं. अशा खाल्ल्या की खाल्यावर अन्ननलिकेत बरं वाटतं बराच वेळ- शांत. लाळे मुळे सुद्धा ऍसिड रिफ्लक्सला आराम मिळतो असे वाचले आहे आणि काही चावून चावून खाल्ले (जे असे चावून चावून खाण्यासारखे असते) की रिफ्लक्स साठी बरे वाटते असा अनुभव आहे. (प्लासीबो / खरंच जे काय ते, पण खाल्ल्यानंतर बरे वाटते.) तर असा विचार आला की यामुळेच तर या लाह्या व कुरमुरे खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स/ जळजळ यावर आराम मिळत नसेल? यात लाळ ऍब्सॉर्ब होते पटकन आणि कदाचित त्यामुळे जास्तीची सिक्रिट होत असेल? आणि म्हणुन फायदा?
लाळ नेहमी अल्कलाईन असतेच असे नाही, त्यामुळे फायदा कसा होतो, आणि वर मी लिहिले ते होऊ शकते का हे तज्ज्ञच सांगु शकतील.
मानव, राजगिर्याच्या लाह्या
मानव, राजगिर्याच्या लाह्या म्हणजे १००% कार्बोदके. त्या कोरड्या खाल्ल्या तेव्हा तोंडांत इतक्या वेळ राहिल्या कि लाळ त्यात मिसळली जाऊन कार्बोदकांच्या विघटनाला सुरुवात व्हावी. कार्बोदकांचे विघटन तोंडातच सुरु झाल्याने पोटात गेल्यानंतर कारबोदकांचे विघटन होण्यासाठी जठरातील आम्लांची गरज आहे असा संदेश मेंदुला जात नाही. पर्यायाने आम्ल जठरातुन वर अन्न नलिकेत जाणे पण टळले. त्यामुळे शांत वाटले.
पर्णीका, छान माहिती.
पर्णीका, छान माहिती.
१००% कार्ब्स हे काही मिळसले नाही या तुलनेत म्हटले आहे, की लाह्या बनवण्याच्या प्रोसेस मध्ये थोडे प्रथिन असते त्याचे सुद्धा कार्ब्स होते?
प्रथिनांचे रुपांतर
प्रथिनांचे रुपांतर कार्बोदकांत होते असे म्हणणे तांत्रिक दृष्ट्या बरोबर ठरणार नाही पण इन इफेक्ट तसंच काहीसं होतं. कार्बोदके आणि प्रथिने हे दोन्ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन च्या एकमेकांत गुंफलेल्या साखळ्यांपासुन तयार होतात. प्रथिनांमध्ये ह्या व्यतिरिक्त नायट्रोजन चे अणु असतात. राजगिर्याच्या धान्यापासून लाही होण्याच्या प्रक्रियेत उष्णतेमुळे किंवा दाबामुळे जर नायट्रोजन रेणु किंवा तो रेणु जोडला आहे ती साखळी प्रथिनापासुन वेगळी झाली तर प्रथिन रेणुका उरलेला भाग हा रासायनिक दृष्ट्या कार्बोदक रेणु प्रमाणेच असेल.
तसंही मुळात कुठल्याही तृणधान्यात प्रथिनांचे प्रमाण कार्बोदकांच्या तुलनेत फार कमी म्हणजे ~ १५% पेक्षा कमी असते. त्यात नायट्रोजन वेगळ्या झालेल्या रेणुंच प्रमाणाचा अंदाज केला तर ते आणखी कमी होईल. थोडक्यात पचनसंस्थेच्या दृष्टीने जवळ जवळ १००% कार्बोदकांचे प्रोसेसिंग.
उत्तम माहिती पर्णीका, धन्यवाद
उत्तम माहिती पर्णीका, धन्यवाद. याबद्दल अजिबात माहीत नव्हते.
Pages