उशीर

Submitted by रीया on 20 March, 2012 - 12:38

उशीर

आठवतात का सख्या तुला
कॉलेज चे ते दिवस?
बेधुंद,मनोहर,प्रांजळ तरी
तुझ्याविना नीरस

कित्येक तास अन घटका तेंव्हा
वाट तुझी पहायच्या
तुझ्या एका हास्यासाठी
मनोमनी झुरायाच्या

आल्या आल्या नजर माझी
शोध तुझा घ्यायची
तू आलास की तुझी पावले
दुसरीकडेच वळायची

कित्येकदा तर बोलता बोलता
शांत मी व्हायचे
जागेपणी उघड्या डोळ्यांनी
स्वप्ने तुझी पाहायचे

तुला मात्र डोळ्यामध्ये
कधी भावना दिसल्या नाहीत
माझ्या मनी उमललेल्या
कळ्या कधी गवसल्या नाहीत

दिवस येता शेवटचा तो
तू आलास माझ्या जवळी
शांत तू ही अन शांत मी ही
पण हृदयामध्ये हुरहुरी

"जीव जडला माझा सखे
हृद्यातुनी जळतो आहे
रूप साठवुनी नजरे मध्ये
होकार साठी झुरतो आहे"

बोल ऐकता तुझे सख्या ते
मनी उमटले इंद्रधनु
शब्द तुझे रे पाऊसधारा
अन् ह्द्य माझे मयुर जणु

"अन्नपाणी मज गोड न लागे
झोप ही रात्रीची उडली
या दुखण्याला एकच औषध
तूच माझी आशा एकली "

"निरोप दे हा तुझ्या सखीला
आयुष्यभर मानीन ऋण"
ऐकून तुझे हे शब्द साजणा
जीवन गेले अंधारून

खरच सांगते राजा तेंव्हा
मनाचा माझ्या खेळ झाला
तरीही दिली साथ तुला मी
अन तुझा प्रेमाशी मेळ झाला

थोडक्यात चुकली वेळ म्हणायची
तू दुसरीसाठीच अधीर झाला
असेच प्रेम ही मी केलेले
फ़क़्त थोडा "उशीर" झाला

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

पाटीलबुवा :कविता आवडली की नाही आणि अपेक्षित बदल इतकच लिहा
जमत नसल्यास प्रतिक्रिया दिली नाही तरी चालेल
संदर्भासहीत स्पष्टीकरण आणि रसग्रहण अपणास विचारले नाही कुणी
>>

हे तुझे पहिलेच चिडणे मायबोलीवरचे

पोह्याचे वडे व मसाला चहा असे करून मला बोलावून आई बाबा तू व मी असे साजरे करूयात

Lol

(पाटील हा माझा ड्यु आय नाही )

(माझा एकच ड्यु आय आहे व तो सर्वज्ञात आहे)

अरारारा...बयना, तु तं घुस्सा झाली माय. म्या तं मजाकीत म्हनल हुतं! माफी करा बाप्पा एकडाव! आता तुयावाला राग जासाठी काय करू बाप्पा? दुसरी कविता कल्तो...

पोह्यांचे वडे आनि पोह्यांचा चिवडा
कविता शिकवते दादा मले बेवडा

लिहिलं किडामाकोडा, कविता झाली
फोटो पाहून समद्यान्नि डोई कलर केली

मसाल्याचा चहा केला, कुनी येत नायी
कवा येईल म्हातारं? अर्थ नायी कायी

मायबोलीवर माझे पहिलेच चिडने
कच्चं खाउ? भाजुन खाउ? प्रश्न मला पडने

सांजच्या पारी फोन केला, दादा 'बंभोला'
मले फोन कराले 'उशीर'च झाला

बोल ऐकता तुझे सख्या ते
आनंदाची झाली रिमझिम
शहारले रे अंग अंग
मोर होऊनी नाचले मन
>>>
इथे बाकीच्या कडव्यांसारखं नीट यमक जुळत नाहीये. त्यामुळे बदलता आले तर बघ ना.

>>>>>>>>>>>
निंबु बघ ग आता ठिकेय का??

बोल ऐकता तुझे सख्या ते
मनी उमटले इंद्रधनु
शब्द तुझे रे पाऊसधारा
ह्द्य माझे मयुर जणु

मस्त.....

पोह्यांचे वडे आनि पोह्यांचा चिवडा
कविता शिकवते दादा मले बेवडा

लिहिलं किडामाकोडा, कविता झाली
फोटो पाहून समद्यान्नि डोई कलर केली

मसाल्याचा चहा केला, कुनी येत नायी
कवा येईल म्हातारं? अर्थ नायी कायी

मायबोलीवर माझे पहिलेच चिडने
कच्चं खाउ? भाजुन खाउ? प्रश्न मला पडने

सांजच्या पारी फोन केला, दादा 'बंभोला'
मले फोन कराले 'उशीर'च झाला>>>>>

जबरदस्त..........

Pages