उशीर
आठवतात का सख्या तुला
कॉलेज चे ते दिवस?
बेधुंद,मनोहर,प्रांजळ तरी
तुझ्याविना नीरस
कित्येक तास अन घटका तेंव्हा
वाट तुझी पहायच्या
तुझ्या एका हास्यासाठी
मनोमनी झुरायाच्या
आल्या आल्या नजर माझी
शोध तुझा घ्यायची
तू आलास की तुझी पावले
दुसरीकडेच वळायची
कित्येकदा तर बोलता बोलता
शांत मी व्हायचे
जागेपणी उघड्या डोळ्यांनी
स्वप्ने तुझी पाहायचे
तुला मात्र डोळ्यामध्ये
कधी भावना दिसल्या नाहीत
माझ्या मनी उमललेल्या
कळ्या कधी गवसल्या नाहीत
दिवस येता शेवटचा तो
तू आलास माझ्या जवळी
शांत तू ही अन शांत मी ही
पण हृदयामध्ये हुरहुरी
"जीव जडला माझा सखे
हृद्यातुनी जळतो आहे
रूप साठवुनी नजरे मध्ये
होकार साठी झुरतो आहे"
बोल ऐकता तुझे सख्या ते
मनी उमटले इंद्रधनु
शब्द तुझे रे पाऊसधारा
अन् ह्द्य माझे मयुर जणु
"अन्नपाणी मज गोड न लागे
झोप ही रात्रीची उडली
या दुखण्याला एकच औषध
तूच माझी आशा एकली "
"निरोप दे हा तुझ्या सखीला
आयुष्यभर मानीन ऋण"
ऐकून तुझे हे शब्द साजणा
जीवन गेले अंधारून
खरच सांगते राजा तेंव्हा
मनाचा माझ्या खेळ झाला
तरीही दिली साथ तुला मी
अन तुझा प्रेमाशी मेळ झाला
थोडक्यात चुकली वेळ म्हणायची
तू दुसरीसाठीच अधीर झाला
असेच प्रेम ही मी केलेले
फ़क़्त थोडा "उशीर" झाला
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
उशीर कुठला, उलट शहाणपणा लौकर
उशीर कुठला, उलट शहाणपणा लौकर आला.
कविता मात्र छान.
धन्यवाद प्रद्युम्नजी
धन्यवाद प्रद्युम्नजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'कुछ कुछ होता है' मधला 'तो'
'कुछ कुछ होता है' मधला 'तो' सीन जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला...
काजोल आणि शाहरूखने अप्रतिम उभा केलाय तो... (वैम :))
अरे हो रे नचिकेत मेरे को तो
अरे हो रे नचिकेत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेरे को तो वो सिन आठव्याईच नै
आता तु म्हणल्यावर मी विचार केला नक्की कुठला सिन ते आणि मग आठवला
धन्यु रे
माझ मोस्ट फेवरेट हिरो आणि मोस्ट फेवरेट सिनेमा आहे तो
कविता छानच आहे. किसीकी याद आ
कविता छानच आहे.
किसीकी याद आ गई रे......
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता छानच आहे. किसीकी याद आ
कविता छानच आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किसीकी याद आ गई रे......
>>
धन्यु
धन्स स्मितुतै![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली. वेलकम बॅक.
आवडली. वेलकम बॅक.
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स भुंगा,रतन
धन्स भुंगा,रतन
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"उशीर"..??? बेस्ट ऑफ लक फॉर
"उशीर"..???
बेस्ट ऑफ लक फॉर नेक्श्ट टाईम![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहे !
छान आहे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
आभार टवाळ मंदार दादा :
आभार टवाळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदार दादा :
"जीव जडला माझा सखे हृद्यातुनी
"जीव जडला माझा सखे
हृद्यातुनी जळतो आहे
रूप साठवुनी नजरे मध्ये
होकार साठी झुरतो आहे">>>>> वाह छान आहे
शुभचिंतकाचे 'आभार' मानायचा
शुभचिंतकाचे 'आभार' मानायचा रिवाज नाहीय का??![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
.
.
.
.
.
.
.
.
.
मनात मानला असेल तर ठिकै....
आभार केदार चातका हितचिंतक कोण
आभार केदार
चातका हितचिंतक कोण ते दिसेना इथे
कुठे
कुठे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
इथेच
इथेच
'कुछ कुछ होता है' मधला 'तो'
'कुछ कुछ होता है' मधला 'तो' सीन जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
अरे, मी पण इथे हाच प्रतिसाद द्यायला आले.
कविता छान.
बोल ऐकता तुझे सख्या ते
आनंदाची झाली रिमझिम
शहारले रे अंग अंग
मोर होऊनी नाचले मन
>>>
इथे बाकीच्या कडव्यांसारखं नीट यमक जुळत नाहीये. त्यामुळे बदलता आले तर बघ ना.
कविता आवडली.
कविता आवडली.
त्या ओळी आठवल्या...... खता हो
त्या ओळी आठवल्या......
खता हो गई मुझसे
कहा कुछ नही तुम से,
इकरार जो तुम कर पाते
तो दुर कभी ना जाते,
कोई समझे ना पिर पराई
कोई समझे ना पिर पराई...किसी से अब क्या कहना
तुझे याद न मेरी आई
किसी से अब क्या कहना......
कितीतरी वर्ष्यापुर्वीची माझी
कितीतरी वर्ष्यापुर्वीची माझी प्रेम कहाणी डोळ्यासमोर आली
धन्स निंबु बघते ग नन्ना
धन्स निंबु
बघते ग
नन्ना ठ्यँक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चातक आभार
अनिलजी :धन्स
बहुतेक प्रेमकहाण्या अश्याच असतात नाही??
आठवतात का सख्या तुला कॉलेज चे
आठवतात का सख्या तुला
कॉलेज चे ते दिवस? (स्मृतीभ्रंशाचा अटॅक येते काय बाप्पा त्याले?)
बेधुंद,मनोहर,प्रांजळ तरी
तुझ्याविना नीरस
कित्येक तास अन घटका तेंव्हा
वाट तुझी पहायच्या (लय जनी पहायच्या का बयना वाट?)
तुझ्या एका हास्यासाठी
मनोमनी झुरायाच्या (कामुन बाप्पा? थोबाडालेपन इस्तरी कराचा का तो?)
आल्या आल्या नजर माझी
शोध तुझा घ्यायची
तू आलास की तुझी पावले
दुसरीकडेच वळायची (भूत होता का बाप्पा तो; पाउले उल्टी वळवाले?)
कित्येकदा तर बोलता बोलता
शांत मी व्हायचे (आकडी यायची का बाप्पा?)
जागेपणी उघड्या डोळ्यांनी
स्वप्ने तुझी पाहायचे (इची भनं, ते कसं?)
तुला मात्र डोळ्यामध्ये
कधी भावना दिसल्या नाहीत (फुटका होता का माय तो?)
माझ्या मनी उमललेल्या
कळ्या कधी गवसल्या नाहीत (हात बांधले असन बनियनआड शोलेतल्या ठाकूरसारखे)
दिवस येता शेवटचा तो (हे राSSSSSSSSम; हे राSSSSSSSSSSम)
तू आलास माझ्या जवळी
शांत तू ही अन शांत मी ही (वा रे वा; शांतेचं कार्ट; मॅटच हाये ते)
पण हृदयामध्ये हुरहुरी
"जीव जडला माझा सखे
हृद्यातुनी जळतो आहे (हृद्यातुनी....हा कोन्ता नवीन अवयव काळ्ळा बापा?)
रूप साठवुनी नजरे मध्ये
होकार साठी झुरतो आहे"
बोल ऐकता तुझे सख्या ते
आनंदाची झाली रिमझिम
शहारले रे अंग अंग
मोर होऊनी नाचले मन (नसते यमक जथी, अन कविता मारत माथी?)
"अन्नपाणी मज गोड न लागे
झोप ही रात्रीची उडली (चेंडूवानी उडली असन माय)
या दुखण्याला एकच औषध(नवरतन तेल)
तूच माझी आशा एकली " (आशा? बाई झाला वाट्टे तो)
"निरोप दे हा तुझ्या सखीला(आस्स, सखीले निरोप..म्हंजी तू काजोल,सखी रानी भल्तीच व्हती..हातिच्या मारी)
आयुष्यभर मानीन ऋण"
ऐकून तुझे हे शब्द साजणा
जीवन गेले अंधारून
खरच सांगते राजा तेंव्हा
मनाचा माझ्या खेळ झाला
तरीही दिली साथ तुला मी (अस काउन गा? ममता बॅनर्जीवानी)
अन तुझा प्रेमाशी मेळ झाला
थोडक्यात चुकली वेळ म्हणायची (काळ आला होता)
तू दुसरीसाठीच अधीर झाला (आर आर, पिसाटा, कुटं फेडशील हे........ पापाच धोतर)
असेच प्रेम ही मी केलेले (डोंट वरी बाई, कायीतरी खाउन घे, केले ले)
फ़क़्त थोडा "उशीर" झाला
सहिये.. खुप छान लिहलीस कवीता
सहिये.. खुप छान लिहलीस कवीता
(No subject)
आधीच्या कवितांप्रमाणे कवितेची
आधीच्या कवितांप्रमाणे कवितेची लांबी (मला तरी) अधिक वाटली.
कविता हलकीफुलकी आहे, मात्र वर्णनात्मक ओळी फार आहेत असे वाटले.
प्रत्येक ओळीत काही ना काही वजनदार पंच येईल असे बघता येईल का असे म्हणावेसे वाटले.
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा
धन्यु किश्या भुषण दादा :
धन्यु किश्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भुषण दादा : सुचना अमलात आणल्या जातील
पाटीलबुवा :कविता आवडली की
पाटीलबुवा :कविता आवडली की नाही आणि अपेक्षित बदल इतकच लिहा
जमत नसल्यास प्रतिक्रिया दिली नाही तरी चालेल
संदर्भासहीत स्पष्टीकरण आणि रसग्रहण अपणास विचारले नाही कुणी
Pages