चरे

Submitted by मिल्या on 15 March, 2012 - 01:50

"बापरे किती खराब झालायंस?" मी आरश्यात डोकावत म्हणालो

"तुज्यामुळेच की रे, पाहतोयस ना किती चरे पाडलेस तू माझ्यावर?" तो विषण्ण होऊन उत्तरला

"खरेच की आता मला आठवत सुद्धा नाही ... कधी अन केव्हा इतके चरे पडले ते... " मी खांद्यावरची झोळी सावरत उद्गारलो
"हा पण तो बघ तो पहिला चरा आठवतोय...
’आईविना पोर’ च्या वेळचाच ना तो... अरे पण केवढ्या टाळ्या, केवढे कौतुक...

तुला नाही कळणार ते...

तेव्हा फेसबुक असते तर निदान १०० तरी लाईक्स मिळाले असते... जाऊदे"

तो जोरजोरात हसायला लागला

"अरे आणि हा बघ..." त्याच्याकडॆ दुर्लक्ष करत मी म्हणालो
"हा किल्लारी भूकंपाचा, हा गुजरात दंगलेचा आणि तो त्सुनामीच्या वेळचा आणि तो.. तो जरा जास्तीच मोट्ठा असलेला मुंबईवरील अतिरेकी हल्याचा आणि शेजारीच तो जर्मन बेकरीचा आणि हा बघ अगदी ताजा ताजा संतोष मानेचा बहुतेक..."

"आणि तो एवढा मोट्ठा तडा कसला रे? तो रे तो डाव्या बाजूला अगदी छातीजवळ?
आज्जी गेली तेव्हाचा वाटते... अरे पण ह्या ट्रॉफ्या बघितल्यास आणि ती फॅन मेल्स?...

...जाऊदे तुला नाहीच कळणार? आणि एवढे करूनही साला प्रकाशक म्हणतो ४ कमीच पडताहेत छापायला..."

"अरे फिकर नॉट्ट" आरसा छद्मी हसत म्हणाला

"तू भविष्य नाही वाचलेस २०१२ चे .. कितीतरी नैसर्गिक आपत्ती येणार आहेत म्हणे आणि समजा नाहीच आल्या तर अजून एक तडा मी झेलू शकतोच की...

... तुझा बाप तर अजून जिवंत आहे..."

.
.
.
.
.
.
.
.
.
(चला आता फक्त ३ राहिल्या)

गुलमोहर: 

विचार करायला लावणारा वास्तववादी आशय.

स्वतंत्र स्फुट विभाग नसल्यामुळे कविता विभागात टाकावे लागले असावे असे वाटले.

प्रशासनाने विचार करायला हरकत नाही, स्फुट विभाग सुरू करण्याबाबत.

Happy

धन्यवाद मित्रांनो

चिमुरी : आवडली नाही की वाचून सुन्न व्हायला झाले Happy

सत्या : नुसताच काय हसतोस? प्रतिक्रिया दे की

नन्ना :सॉरी Sad

अनिल : बरोबर आहे पण अजूनही बरेच काही आहेच त्यात

विदिपा : खरे तर कविता म्हणूनच लिहिली होती पण स्फूट वाटत असेल तर फसलीच म्हणायची... मांडणी जमली नसावी मला... इथल्या इतर कवींना मत वाचायला आवडेल... विषेशतः मुक्तछंदात जे लिहितात त्यांचे

कवितांच्या फंदात मी जास्त पडत नाही (बरेच सुटकेच निश्वास ऐकू येत आहेत) त्यामुळे असे झाले असावे

बेफी, विशाल : धन्यवाद

बरेच सुटकेच निश्वास ऐकू येत आहेत>> Proud

नाही नाही , असे काही नाही, उलट तुम्ही पडायला पाहिजेत कवितेच्या फंदात

इथल्या इतर कवींना मत वाचायला आवडेल... विषेशतः मुक्तछंदात जे लिहितात त्यांचे>>>

झालं

भारी मिल्या...!!!
सुंदर आणि Abstract
बाजारी किंमत मिळावी म्हणून काय काय सहन करावे आणि त्यातल्या कशाकशाचा बाजार मांडावा......!
Abstract ला मराठीत काय म्हणावे??

कविता नाही वाटली मलाही.
स्फुट/विचार/मुक्तक म्हणून चांगले वाटले. Happy

चिमुरी : आवडली नाही की वाचून सुन्न व्हायला झाले>>>>>>>>>>>> सुन्न व्हायला झालं...

मिल्या आशय भावला पण कविता अजिबात वाटली नाही रे...पण हे स्फूट वाटत आहे मला तरी>>>>>>>> +१

धन्यवाद सर्वांनाच...

तुमच्या प्रतिकिर्यांची दखल घेतली आहे... पुढच्या वेळी सुधारणा करायचा जरूर प्रयत्न करेन