शनिवारी शिजलेला कट : कोळंबी मसाला विथ कटाचा रस्सा (फोटोसहित)

Submitted by saakshi on 13 March, 2012 - 05:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोलंबी - १/२ कि. सोलून स्वच्छ केलेली.
हळद - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तिखट - ६ चमचे
तेल अंदाजे

मसाल्यासाठी :
ओले खोबरे(मी एका नारळाचे घेतले होते) - पातळ,बारीक काप करून
कांदे - २ मध्यम आकाराचे - बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
कोथिंबीर - बारीक चिरून १ वाटी किंवा जास्त

क्रमवार पाककृती: 

१. कोळंबी मीठ आणि हळद टाकून जरा मुरवत ठेवावी. तोपर्यंत मसाला करून घ्यावा.
२. मसाल्याचे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून त्याची फाईन पेस्ट करून घ्यावी. मसाल्याचे दोन भाग करून घ्यावे.
३. कोळंबी मसाला :
कुकरमध्ये मसाला तेलात परतून घ्यावा. त्यात मीठ, ३ चमचे तिखट टाकून चांगले परतावे.
मग कोळंबी घालून(४-५ कोळंब्या रश्श्यासाठी बाजूला काढून ठेवाव्यात) पुन्हा हलक्या हाताने परतावे अन्यथा कोळंबीचे तुकडे होण्याची शक्यता जास्त.
अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. ४ शिट्ट्यात कोळंबी मसाला तय्यार!!
४. कटाचा रस्सा :
एका पातेल्यात तेल घेऊन मसाला ३ चमचे तिखट, मीठ घालून परतून घ्यावा. मसाला बाजूने सुटला पाहिजे. मग पाणी घालावे. पाणी घालताना चर्रर्रर्र आवाज आला की ओळखावे, कट चांगला होणार.
मग रश्श्यात टाकायला ठेवलेली कोळंबी घालून मंद आचेवर रस्सा आटू द्यावा.

कोळंबी मसाला आणि कटाचा रस्सा, दोन्हीवर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे आणि खावे...

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी भरपूर....
अधिक टिपा: 

हा प्रकार करण्याचे मनात आणले की diet वै. गोष्टींना मनातून हद्दपार करावे....
कोळंबी चापावी....मस्त लालभडक रस्सा भुरके मारत प्यावा... तुडुंब भरलेल्या पोटाने आणि कोळंबीच्या चवीने आरामात ताणून झोप काढावी तर ही पाककृती संपूर्ण होते Happy

माहितीचा स्रोत: 
पप्पा...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काही फोटो...
हा तयार कोळंबी मसाला :

masala.jpg

आणि हा कटाचा रस्सा : रंग खूप लाल आहे पण तितका तिखट नसतो...

rassa.jpg

हे माझं जेवणाचं ताट :

dish.jpg

धन्यवाद बित्तुबंगा..
अंकुडी.... Happy

हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! काय सुचना बगा Happy

बित्तु, दोन चमच्यांनी उगाच तोंड चाळवलं असतं

त्यापेक्षा साक्षींना चालत असेल तर गटग करा

आपण तयार

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी........
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन चमचे चव घेण्याची पण सोय हवी होती >>> Happy
बित्तु, दोन चमच्यांनी उगाच तोंड चाळवलं असतं त्यापेक्षा साक्षींना चालत असेल तर गटग करा >>>
चालेल...... Happy

आता बकरा कुठून आणू ?
म्हणजे करुन बघावेसे तर वाटतेय, पण खायला कुणी बकरा नाही. >>> Happy

मी शाकाहारी पण हा कट करुन नवर्‍याला खायला घालायचा कट डोक्यात शिजतोय >>>>
लाजो, एक नंबर!!!!!!! कराच मग.... आणि कटाचं outcome (with फोटू) नक्की पोस्टा.... Happy

आहाहा!! कसला दिसतोय रस्सा!!! ताबोडतोब printout घेतलं. आता घरी फर्माईश..

>>> मी शाकाहारी पण हा कट करुन नवर्‍याला खायला घालायचा कट डोक्यात शिजतोय
बिच्चारा.. !!

वाss मस्त रेसिपी!!! रस्सा पाहुन तोंडाला अगदी पाणी सुटले. कधि एकदा करुन पाहते असे झाले आहे.
एक विचारायचे आहे कि... मसाल्यामधे कच्चा कांदा न घालता. कांदा तेलावर परतुन घेतला तर चालेल का? मला कच्या कांद्याचा वास आवडत नाही. मला माहित नाही, पण मी कच्चा कांदा वापरुन केलेली डिश (पंजाबी ) चांगली होत नाहि... कांद्याचा वास जात नाही. म्हणुन विचारते की कांदा शिजवला तर चालेल का?

मस्त्!!...पण दोन्हीचा मसाला एकच असल्यामुळे साधारण सारखीच चव वाटत नाही का?......यापेक्शा दोन्ही एका वेळी न करता वेग्वेगळे केले तर जास्त आनंद लुटता येईल प्र्यत्येक डीशचा ...बरोबर एखादी ड्राय डीश करायची......बाकी 'अधिक टीपा'..१००% मान्य!!

मायबोलीवर रेस्पीची एक-दोन चमचे चव घेण्याची पण सोय हवी होती >>>>>>>> अगदी अगदी.... नुस्तं बघण्यापेक्षा १-२ चमचे पण चालतील Happy

आता बकरा कुठून आणू ?>>>>>>>>> दिनेशदा, इकडे या.. इकडे भरपुर बकरे आहेत... Happy

रेसिपी एकदम भारी बरं का.... Happy

कोलंबी चार शिट्ट्या शिजवल्यावर वातड होत नाही का? >>> स्वाती२, नाही होत.... उलट मस्त मुरतो त्यात मसाला... एखादि शिट्टी कमी करून पाहू शकता... Happy

आहाहा!! कसला दिसतोय रस्सा!!! ताबोडतोब printout घेतलं. आता घरी फर्माईश..>>> धन्यवाद किरू.... Happy

धन्यवाद आशुतोष०७११,अश्विनीमामी... Happy

एक विचारायचे आहे कि... मसाल्यामधे कच्चा कांदा न घालता. कांदा तेलावर परतुन घेतला तर चालेल का? मला कच्या कांद्याचा वास आवडत नाही. मला माहित नाही, पण मी कच्चा कांदा वापरुन केलेली डिश (पंजाबी ) चांगली होत नाहि... कांद्याचा वास जात नाही. म्हणुन विचारते की कांदा शिजवला तर चालेल का?>>>> हो विद्याक, चालेल की.... त्या खरपूस परतलेल्या कांद्याची चव पण मस्त लागेल.. Happy

मस्त्!!...पण दोन्हीचा मसाला एकच असल्यामुळे साधारण सारखीच चव वाटत नाही का?......यापेक्शा दोन्ही एका वेळी न करता वेग्वेगळे केले तर जास्त आनंद लुटता येईल प्र्यत्येक डीशचा>>> हो फुलराणी, पण कोळंबी मसाला केला तेंव्हा या कटाची कल्पना डोक्यात आली, मग म्हटलं होऊनच जाऊ दे आता दोन्ही रेसिपीज..... Happy

कोलंबीला ४ शिट्ट्या? कोलंबी तर पटकन शिजते.>>> हो आर्च... त्या जास्त शिट्ट्या तो मसाला कोळंबीत मुरावा म्हणून केल्या होत्या.. Happy

रेसिपी एकदम भारी बरं का.... >>> धन्यवाद चिमुरी...

Pages