कोलंबी - १/२ कि. सोलून स्वच्छ केलेली.
हळद - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तिखट - ६ चमचे
तेल अंदाजे
मसाल्यासाठी :
ओले खोबरे(मी एका नारळाचे घेतले होते) - पातळ,बारीक काप करून
कांदे - २ मध्यम आकाराचे - बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
कोथिंबीर - बारीक चिरून १ वाटी किंवा जास्त
१. कोळंबी मीठ आणि हळद टाकून जरा मुरवत ठेवावी. तोपर्यंत मसाला करून घ्यावा.
२. मसाल्याचे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून त्याची फाईन पेस्ट करून घ्यावी. मसाल्याचे दोन भाग करून घ्यावे.
३. कोळंबी मसाला :
कुकरमध्ये मसाला तेलात परतून घ्यावा. त्यात मीठ, ३ चमचे तिखट टाकून चांगले परतावे.
मग कोळंबी घालून(४-५ कोळंब्या रश्श्यासाठी बाजूला काढून ठेवाव्यात) पुन्हा हलक्या हाताने परतावे अन्यथा कोळंबीचे तुकडे होण्याची शक्यता जास्त.
अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. ४ शिट्ट्यात कोळंबी मसाला तय्यार!!
४. कटाचा रस्सा :
एका पातेल्यात तेल घेऊन मसाला ३ चमचे तिखट, मीठ घालून परतून घ्यावा. मसाला बाजूने सुटला पाहिजे. मग पाणी घालावे. पाणी घालताना चर्रर्रर्र आवाज आला की ओळखावे, कट चांगला होणार.
मग रश्श्यात टाकायला ठेवलेली कोळंबी घालून मंद आचेवर रस्सा आटू द्यावा.
कोळंबी मसाला आणि कटाचा रस्सा, दोन्हीवर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे आणि खावे...
हा प्रकार करण्याचे मनात आणले की diet वै. गोष्टींना मनातून हद्दपार करावे....
कोळंबी चापावी....मस्त लालभडक रस्सा भुरके मारत प्यावा... तुडुंब भरलेल्या पोटाने आणि कोळंबीच्या चवीने आरामात ताणून झोप काढावी तर ही पाककृती संपूर्ण होते
....भुक लागली मला आता
:)....भुक लागली मला आता
हे काही फोटो... हा तयार
हे काही फोटो...
हा तयार कोळंबी मसाला :
आणि हा कटाचा रस्सा : रंग खूप लाल आहे पण तितका तिखट नसतो...
हे माझं जेवणाचं ताट :
मस्त
मस्त
धन्यवाद
धन्यवाद बित्तुबंगा..
अंकुडी....
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
हायला
हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! काय सुचना बगा
छान...
छान...
स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्
स्लर्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
वॉव.. सुपर्ब!!!
वॉव.. सुपर्ब!!!
यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्
यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्मीईईईईईईईईई
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन चमचे चव घेण्याची पण सोय हवी होती
अहाहा तोपासु आहे अगदी
अहाहा तोपासु आहे अगदी
बित्तु, दोन चमच्यांनी उगाच
बित्तु, दोन चमच्यांनी उगाच तोंड चाळवलं असतं
त्यापेक्षा साक्षींना चालत असेल तर गटग करा
आपण तयार
बित्तु
बित्तु
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी........
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन चमचे चव घेण्याची पण सोय हवी होती >>>
बित्तु, दोन चमच्यांनी उगाच तोंड चाळवलं असतं त्यापेक्षा साक्षींना चालत असेल तर गटग करा >>>
चालेल......
लय भारी....
लय भारी....
थांकू टोकुरिका....
थांकू टोकुरिका....
आता बकरा कुठून आणू ? म्हणजे
आता बकरा कुठून आणू ?
म्हणजे करुन बघावेसे तर वाटतेय, पण खायला कुणी बकरा नाही.
पुण्यात यायचं अन श्रेयसला
पुण्यात यायचं अन श्रेयसला जेवायचं, मग हे प्रश्न पडणारच
चांगलाच रचलाय की हा कट!!!! मी
चांगलाच रचलाय की हा कट!!!!
मी शाकाहारी पण हा कट करुन नवर्याला खायला घालायचा कट डोक्यात शिजतोय
आता बकरा कुठून आणू ? म्हणजे
आता बकरा कुठून आणू ?
म्हणजे करुन बघावेसे तर वाटतेय, पण खायला कुणी बकरा नाही. >>>
मी शाकाहारी पण हा कट करुन नवर्याला खायला घालायचा कट डोक्यात शिजतोय >>>>
लाजो, एक नंबर!!!!!!! कराच मग.... आणि कटाचं outcome (with फोटू) नक्की पोस्टा....
मस्त फोटो! कोलंबी चार
मस्त फोटो!
कोलंबी चार शिट्ट्या शिजवल्यावर वातड होत नाही का?
आहाहा!! कसला दिसतोय रस्सा!!!
आहाहा!! कसला दिसतोय रस्सा!!! ताबोडतोब printout घेतलं. आता घरी फर्माईश..
>>> मी शाकाहारी पण हा कट करुन नवर्याला खायला घालायचा कट डोक्यात शिजतोय
बिच्चारा.. !!
तोंपासु
तोंपासु
मस्त आहे कि रेश्पी. करणेत
मस्त आहे कि रेश्पी. करणेत येइल.
वाss मस्त रेसिपी!!! रस्सा
वाss मस्त रेसिपी!!! रस्सा पाहुन तोंडाला अगदी पाणी सुटले. कधि एकदा करुन पाहते असे झाले आहे.
एक विचारायचे आहे कि... मसाल्यामधे कच्चा कांदा न घालता. कांदा तेलावर परतुन घेतला तर चालेल का? मला कच्या कांद्याचा वास आवडत नाही. मला माहित नाही, पण मी कच्चा कांदा वापरुन केलेली डिश (पंजाबी ) चांगली होत नाहि... कांद्याचा वास जात नाही. म्हणुन विचारते की कांदा शिजवला तर चालेल का?
मस्त्!!...पण दोन्हीचा मसाला
मस्त्!!...पण दोन्हीचा मसाला एकच असल्यामुळे साधारण सारखीच चव वाटत नाही का?......यापेक्शा दोन्ही एका वेळी न करता वेग्वेगळे केले तर जास्त आनंद लुटता येईल प्र्यत्येक डीशचा ...बरोबर एखादी ड्राय डीश करायची......बाकी 'अधिक टीपा'..१००% मान्य!!
कोलंबीला ४ शिट्ट्या? कोलंबी
कोलंबीला ४ शिट्ट्या? कोलंबी तर पटकन शिजते.
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन
मायबोलीवर रेस्पीची एक-दोन चमचे चव घेण्याची पण सोय हवी होती >>>>>>>> अगदी अगदी.... नुस्तं बघण्यापेक्षा १-२ चमचे पण चालतील
आता बकरा कुठून आणू ?>>>>>>>>> दिनेशदा, इकडे या.. इकडे भरपुर बकरे आहेत...
रेसिपी एकदम भारी बरं का....
कोलंबी चार शिट्ट्या
कोलंबी चार शिट्ट्या शिजवल्यावर वातड होत नाही का? >>> स्वाती२, नाही होत.... उलट मस्त मुरतो त्यात मसाला... एखादि शिट्टी कमी करून पाहू शकता...
आहाहा!! कसला दिसतोय रस्सा!!! ताबोडतोब printout घेतलं. आता घरी फर्माईश..>>> धन्यवाद किरू....
धन्यवाद आशुतोष०७११,अश्विनीमामी...
एक विचारायचे आहे कि... मसाल्यामधे कच्चा कांदा न घालता. कांदा तेलावर परतुन घेतला तर चालेल का? मला कच्या कांद्याचा वास आवडत नाही. मला माहित नाही, पण मी कच्चा कांदा वापरुन केलेली डिश (पंजाबी ) चांगली होत नाहि... कांद्याचा वास जात नाही. म्हणुन विचारते की कांदा शिजवला तर चालेल का?>>>> हो विद्याक, चालेल की.... त्या खरपूस परतलेल्या कांद्याची चव पण मस्त लागेल..
मस्त्!!...पण दोन्हीचा मसाला एकच असल्यामुळे साधारण सारखीच चव वाटत नाही का?......यापेक्शा दोन्ही एका वेळी न करता वेग्वेगळे केले तर जास्त आनंद लुटता येईल प्र्यत्येक डीशचा>>> हो फुलराणी, पण कोळंबी मसाला केला तेंव्हा या कटाची कल्पना डोक्यात आली, मग म्हटलं होऊनच जाऊ दे आता दोन्ही रेसिपीज.....
कोलंबीला ४ शिट्ट्या? कोलंबी तर पटकन शिजते.>>> हो आर्च... त्या जास्त शिट्ट्या तो मसाला कोळंबीत मुरावा म्हणून केल्या होत्या..
रेसिपी एकदम भारी बरं का.... >>> धन्यवाद चिमुरी...
Pages