विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका
मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835
अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग? (ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
“सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या ‘धारे’कडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित ‘विज्ञान’ उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून ‘खोटे विज्ञान’ म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.”
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.”
- या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे .... व अन्य मजकूर
- .... शिवाय
- सादर अर्पण
- अनुक्रमणिका
- मुखपृष्ठावरील चित्र
- प्रकाशक
माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर
येथे वाचा
उत्तर हो असल्यास दुसरा प्रश्न
उत्तर हो असल्यास दुसरा प्रश्न उद्भवतो. तो म्हणजे वरील सर्व कृत्ये कुकृत्ये म्हणून गणली जातात. याऐवजी एखादे निरुपद्रवी कृत्याचा पुरावा चालेल का? उदा. : मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे?
जरूर, अंनिसने लाखाचे बक्षीस लावले आहे. ते कमी असतील तर जेम्स रँडी दहा लाख डॉलर्स द्यायला तयार आहेत.
याऐवजी एखादे निरुपद्रवी
याऐवजी एखादे निरुपद्रवी कृत्याचा पुरावा चालेल का? उदा. : मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे?
----- पुरावा चालेल, जरुर दाखवा.
हे (किंवा अशा कुठल्याही घटना) सर्वांना करता येण्याजोगे हवे. `क्ष` ने मुंबईला मंत्र म्हटल्यास अग्नी प्रज्वलित होत असेल तर तोच अग्नी `य` ने सिडनी मधे मंत्र म्हटल्यास निर्माण व्हायला हवा. त्या आणि त्याच वातावराणांत मंत्र म्हणूयांत...
मंत्राने असे काही होत असते यावर माझा काडीचाही विष्वास पण गैरसमज दुर करण्यासाठी मदत करु शकतो.
बा द वे, भानामती हा प्रकार
बा द वे, भानामती हा प्रकार खरा की खोटा हे मला नाही माहिती.
पण कोणी खात्रीशीर करुन देत असेल तर चीन आणि पाकिस्तानवर भानामती करण्याची माझी इच्छा आहे. खर्च मी सोसेन
------ भानामती किंवा काळी, पिवळी, जांभळी जादू असा प्रकार खरोखरीच अस्तित्वात असता तर... बिर्याणी चाखणारे श्री. कसाब ३ वर्षे सुखाने मुंबईत राहिले नसते... मंत्रोच्चाराने त्याला ढगांत पाठवले असते.
मास्तुरे, आता असं बघा की, जर
मास्तुरे,
आता असं बघा की, जर एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीने जादूटोणा इत्यादि गोष्टी पहिल्या असतील तर? स्वामी विवेकानंद भारतभ्रमण करीत असतांना तामिळनाडूत त्यांना एक अघोर साधक भेटला होता. तो हवेतून अनेक गोष्टी काढून दाखवत असे. एकदा त्याने रिकाम्या हंड्यात हात घालून एव्हढी फळे काढली की ती भरण्यासाठी त्यासारख्या अनेक हंड्या लागल्या असत्या. एव्हढं करूनही ती हंडी साधीसुधीच होती (हंडीचा पत्रा सलग होता).
मात्र त्या साधकाने यापासून मुक्ती हवी आहे असं सांगितलं. तेव्हा स्वामीजींनी त्याला उपदेश केला. त्याच्या भावामुळे त्याची अघोरी विद्या अक्षरश: पाच मिनिटांत नष्ट झाली. हे स्वामीजींनीच लिहून ठेवलं आहे.
समर्थ रामदासही म्हणतात मणा सज्जना भक्तिपंथेचि जावे. अनेक संतांनी जादूटोण्याचा मार्ग टाळावा असं सांगितलं आहे.
मंत्राने अग्नी पेटवायचे अनेक प्रयोग डॉक्टर प.वि. वर्तक यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात केले होते असं स्मरतं. तपशील सध्यातरी माझ्याकडे नाहीत. मिळाल्यावर टाकीन.
आ.न.,
-गा.पै.
उदय, >> पण कोणी खात्रीशीर
उदय,
>> पण कोणी खात्रीशीर करुन देत असेल तर चीन आणि पाकिस्तानवर भानामती करण्याची माझी इच्छा आहे.
>> खर्च मी सोसेन
देशभरात कोट्यावधी लोक अब्जावधी वेळा दूरनियंत्रक (रिमोट कंट्रोल) वापरून दूरचित्रकाच्या (टीव्ही) वाहिन्या बदलतात. मात्र हेच तंत्र वापरून मुंबईतले १९९३ सारखे स्फोट घडवून आणायला वेगळ्याच प्रकारचे नियोजन लागते.
म्हणूनच भानामती हा प्रकार युद्धात वापरता येईल ही कल्पनाच न केलेली बरी.
आ.न.,
-गा.पै.
मनुष्याला भविष्याची जाणिव होऊ
मनुष्याला भविष्याची जाणिव होऊ शकते असे काही वैज्ञानिक म्हणतात. हा विडीयो बघा .
www.youtube.com/watch?gl=US&hl=en-GB&client=mv-google&v=7N1KgVFbm84
बॉंड, जेम्स बॉंड, आपण दिलेली
बॉंड,
जेम्स बॉंड,
आपण दिलेली लिंक पाहिली..
विविध तऱ्हेने असे भविष्य कथन केले जाऊ शकते याचे आणखी एक उदाहरण मिळाले.
नाडी ग्रंथ ही असाच एक प्रकार आहे.
Pages